MHT CET PCM Group Result 2025 महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष (CET Cell) ने आज MHT-CET 2025 (PCM ग्रुप) परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. या परीक्षेत एकूण २२ विद्यार्थ्यांनी १०० पर्सेंटाईल गुण मिळवून विशेष यश संपादन केले आहे.
MHT CET PCM Group Result 2025
MHT-CET 2025 (PCM ग्रुप) परीक्षा १९ एप्रिल, २०२५ ते २७ एप्रिल, २०२५ दरम्यान आणि अतिरिक्त परीक्षा ०५ मे, २०२५ रोजी घेण्यात आली होती. ही परीक्षा महाराष्ट्रातील २०७ केंद्रांवर आणि महाराष्ट्राबाहेरील १७ केंद्रांवर घेण्यात आली.
परीक्षेची आकडेवारी:
- नोंदणीकृत उमेदवार: ४,६४,२६३
- उपस्थित उमेदवार: ४,२२,६६३
- उपस्थितीचे प्रमाण: ९१.०४%
१०० पर्सेंटाईल मिळवणारे विद्यार्थी (PCM ग्रुप):एकूण २२ विद्यार्थ्यांनी १०० पर्सेंटाईल गुण मिळवले आहेत. यामध्ये MEER VIPUL BHUVA, SIDDHANT DHEERAJ PATANKAR, PAGAR ANUJ SHIVPRASAD, NATU DHRUV AMOL, ATHARV BHALCHANDRA SAHASRABUDHE, SHRISH NILESH PATTEWAR, WAGH PARTH KISHOR, VAISHNAVI VITTHALRAO SARJE, GANDHAR VIVEK VARTAK, ANIRUDH IYER, SIDDHANT SUNIL GHATE, RAI PRAJWAL RAVI, ANIL BALAJI PATIL, PRANAV MINTRI, CHINMAY VIKAS CHAVAN, AMIT KUMAR SINGH, AAYUSH ARVIND KUMAR DUBEY, MUHAMMAD ALRAZA HANIF SHAIKH, TANAY CHETAN GADGIL, ARNAV NIGAM, UTKARSH MISHRA, आणि SHREYA ROY यांचा समावेश आहे.
जिल्हानिहाय आणि प्रवर्गनिहाय टॉपर:
- जनरल (Open) प्रवर्ग: गोंदिया, जयपूर, मुंबई उपनगर, पुणे, सांगली, आणि ठाणे येथील विद्यार्थ्यांनी १०० पर्सेंटाईल गुण मिळवले आहेत.
- OBC प्रवर्ग: कोल्हापूर, मुंबई उपनगर, नांदेड, आणि पुणे येथील विद्यार्थी टॉपर ठरले आहेत.
- SC प्रवर्ग: भंडारा जिल्ह्यातील PARISHEEL ASHISH TIRPUDE या विद्यार्थ्याने ९९.९८६१०८२ पर्सेंटाईल मिळवले आहेत.
- ST प्रवर्ग: वर्धा जिल्ह्यातील KOLI PRANITA SANJAY या विद्यार्थ्याने ९९.९२५९९९० पर्सेंटाईल मिळवले आहेत.
- SBC प्रवर्ग: नांदेड जिल्ह्यातील ANISH RAJESHWAR MACHEWAR या विद्यार्थ्याने ९९.९९६३१९२ पर्सेंटाईल मिळवले आहेत.
- SEBC प्रवर्ग: भंडारा जिल्ह्यातील CHINMAY VIKAS CHAVAN आणि नांदेड जिल्ह्यातील VAISHNAVI VITTHALRAO SARJE या दोघांनी १०० पर्सेंटाईल गुण मिळवले आहेत.
- DT/VJ प्रवर्ग: कोल्हापूर जिल्ह्यातील SARTHAK BABURAO KHOT या विद्यार्थ्याने ९९.९९३०२७७ पर्सेंटाईल मिळवले आहेत.
- NT 2 (NT-C) प्रवर्ग: पुणे जिल्ह्यातील PRUTHVIRAJ SANJAY WAGHMODE आणि सोलापूर जिल्ह्यातील APOORV SACHIN BANDICHHODE या दोघांनी ९९.९९६३७५१ पर्सेंटाईल मिळवले आहेत.
- NT 3 (NT-D) प्रवर्ग: मुंबई उपनगर जिल्ह्यातील PATIL DWEEP JATIN या विद्यार्थ्याने ९९.९६६८४९६ पर्सेंटाईल मिळवले आहेत.
- OMS प्रवर्ग: कोलकाता, नवी दिल्ली, आणि ठाणे येथील विद्यार्थ्यांनी १०० पर्सेंटाईल गुण मिळवले आहेत.
हा निकाल महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष, मुंबई यांच्या संकेतस्थळावर (www.mahacet.org) उपलब्ध आहे.
संपूर्ण निकाल येथे डाउनलोड करा
