मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांसाठी नवीन भाषा धोरण जाहीर Maha School Hindi Language Policy Update 2025

Published On: June 18, 2025
Follow Us
Maha School Hindi Language Policy Update 2025

Maha School Hindi Language Policy Update 2025 महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक १७ जून रोजी एक महत्त्वपूर्ण शुद्धीपत्रक जारी केले आहे. या शुद्धीपत्रकानुसार, इयत्ता १ ली ते ५ वी मधील मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये हिंदी भाषेच्या अनिवार्यतेसंदर्भात पूर्वीच्या धोरणात बदल करण्यात आला आहे.

Maha School Hindi Language Policy Update 2025

पूर्वीचे धोरण काय होते? १६ एप्रिल, २०२५ रोजीच्या शासन निर्णयानुसार, ‘राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण २०२४’ नुसार इयत्ता १ ली ते ५ वी साठी मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये हिंदी भाषा तृतीय भाषा म्हणून अनिवार्य असेल असे नमूद करण्यात आले होते. अन्य माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते पाचवीसाठी माध्यम भाषा, मराठी व इंग्रजी अशा तीन भाषा अभ्यासल्या जातील असेही त्यात म्हटले होते.

आता काय बदल झाले आहेत? नवीन शुद्धीपत्रकानुसार, ‘राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण २०२४’ नुसार मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता १ ली ते ५ वी साठी हिंदी ही ‘सर्वसाधारणपणे’ तृतीय भाषा असेल. मात्र, महत्त्वाचा बदल असा आहे की, जर विद्यार्थ्यांनी हिंदीऐवजी इतर भारतीय भाषांपैकी कोणतीही एक भाषा तृतीय भाषा म्हणून शिकण्याची इच्छा व्यक्त केली, तर त्यांना ती भाषा शिकण्यास मान्यता देण्यात येईल.

इतर भाषा शिकण्यासाठीच्या अटी:

  • हिंदीऐवजी इतर कोणतीही भारतीय भाषा तृतीय भाषा म्हणून शिकण्यास इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांची इयत्तानिहाय संख्या किमान २० असणे आवश्यक आहे.
  • जर किमान २० विद्यार्थ्यांनी इतर भाषेसाठी इच्छुकता दर्शविली, तर त्या भाषेच्या अध्यापनासाठी शिक्षक उपलब्ध करून दिला जाईल.
  • जर २० विद्यार्थी उपलब्ध नसतील, तर ती भाषा ऑनलाइन पद्धतीने शिकविण्यात येईल.
  • सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य असेल.

इतर माध्यमांच्या शाळांसाठी भाषा धोरण: मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळांव्यतिरिक्त इतर माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते पाचवीसाठी माध्यम भाषा, मराठी व इंग्रजी अशा तीन भाषांचा अभ्यास केला जाईल.

इयत्ता ६ वी ते १० वी साठी भाषा धोरण: इयत्ता ६ वी ते १० वी करिता भाषा धोरण ‘राज्य अभ्यासक्रम आराखडा – शालेय शिक्षण’ प्रमाणेच असेल.

या सर्व बदलांशी संबंधित नियोजन तात्काळ आयुक्त (शिक्षण), शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या स्तरावरून करण्यात येईल.

अधिक माहितीसाठी : शासन निर्णय येथे डाउनलोड करा

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Posts

JNV Admission 2026

नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाईन फॉर्म सुरू, डायरेक्ट लिंक

July 31, 2026
pa-system-for-schools

मोठा निर्णय! राज्यातील 16 हजार शाळांमध्ये बसणार स्पीकर सेट PA सिस्टीम; शासन निर्णय निर्गमित

July 29, 2026
MBBS internship latest news Maharashtra

एमबीबीएस विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! एक वर्षाची सामाजिक दायित्व सेवा सक्ती रद्द; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

July 26, 2026
Pavitra Portal shikshak bharti

पवित्र पोर्टल शिक्षक भरतीच्या कार्यपद्धतीत सुधारणा; शासन निर्णय निर्गमित (24 जुलै 2026)

July 25, 2026
samagra-shiksha-funds-increase

‘समग्र शिक्षा’च्या निधीत वाढ करण्यात यावी; केंद्रीय परिषदेत शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांची मागणी

July 23, 2026
PM YASASVI Scholarship 2026

पीएम-यशस्वी शिष्यवृत्ती योजना 2026-27: ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन; या पात्र विद्यार्थ्यांना 1.25 लाखांपर्यंत आर्थिक मदत

July 22, 2026

Leave a Comment