DMER Bharti 2025 वैद्यकीय शिक्षण विभागात 1 हजार 107 पदांची मोठी भरती! मूळ जाहिरात ऑनलाईन अर्ज डायरेक्ट लिंक

Published On: July 7, 2025
Follow Us
DMER Bharti 2025

DMER Bharti 2025 महाराष्ट्र शासन, वैद्यकीय शिक्षण, संशोधन व आयुष विभागाने गट-क तांत्रिक/अतांत्रिक संवर्गातील रिक्त पदे सरळसेवा भरती प्रक्रियेद्वारे भरण्यासाठी ‘स्पर्धा परीक्षा-२०२५’ ची घोषणा केली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया गुरुवार, १९ जून २०२५ पासून med-edu.in या अधिकृत संकेतस्थळावर सुरू झाली आहे.

DMER Bharti 2025 रिक्त पदांचा तपशील

DMER Bharti 2025: ही भरती वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, मंत्रालय आणि वैद्यकीय शिक्षण, संशोधन व आयुष यांच्या अखत्यारीतील शासकीय वैद्यकीय/दंत महाविद्यालये व संलग्न रुग्णालयांमधील गट-क तांत्रिक/अतांत्रिक संवर्गातील रिक्त पदांसाठी आहे.

तांत्रिक पदे (1058 पदे)

पदाचे नावएकूण पदेवेतनश्रेणी
औषधनिर्माता (Pharmacist)207₹29,200 – ₹92,300
प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Lab Technician)181₹35,400 – ₹1,12,400
ECG तंत्रज्ञ84₹35,400 – ₹1,12,400
क्ष किरण तंत्रज्ञ94₹35,400 – ₹1,12,400
ग्रंथपाल5₹38,600 – ₹1,22,800
सहाय्यक ग्रंथपाल17₹29,200 – ₹92,300
ग्रंथालय सहाय्यक13₹19,900 – ₹63,200
फिजिओथेरपिस्ट17₹38,600 – ₹1,22,800
सामाजिक सेवा अधीक्षक (MSW)135₹38,600 – ₹1,22,800
आहारतज्ञ18₹38,600 – ₹1,22,800
दंत तंत्रज्ञ9₹29,200 – ₹92,300
ड्रायव्हर (वाहनचालक)37₹19,900 – ₹63,200

अ-तांत्रिक पदे (49 पदे – केवळ मुंबईसाठी)

पदाचे नावपदेवेतनश्रेणी
उच्च श्रेणी लघुलेखक12₹44,900 – ₹1,42,400
निम्न श्रेणी लघुलेखक37₹41,800 – ₹1,32,300

आवश्यक शैक्षणिक पात्रता

तांत्रिक संवर्ग (Technical Cadre):

क्र.पदाचे नावशैक्षणिक पात्रता
1प्रयोगशाळा सहाय्यक (Laboratory Assistant)B.Sc (Physics/Chemistry/Biology) + लॅब डिप्लोमा/सर्टिफिकेट किंवा Paramedical Tech (Lab) डिग्री + महाराष्ट्र पॅरामेडिकल कौन्सिल रजिस्ट्रेशन
2प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Lab Technician)वरीलप्रमाणेच + 1 वर्ष अनुभव असल्यास प्राधान्य
3ग्रंथपाल (Librarian)Post Graduate (Arts/Science/Commerce) + Library Science डिग्री
4ग्रंथालय सहाय्यक (Library Assistant)SSC + 6 महिन्यांचा Library Science सर्टिफिकेट कोर्स
5सहाय्यक ग्रंथपाल (Assistant Librarian)B.A./B.Sc./B.Com + 6 महिन्यांचा Library Science सर्टिफिकेट (Preferably B.Sc. Biology/Zoology)
6ECG तंत्रज्ञB.Sc (Physics/Chemistry/Biology) + ECG Diploma/Certificate किंवा Paramedical Tech (Cardiology) डिग्री + रजिस्ट्रेशन
7आहारतज्ज्ञ (Dietician)B.Sc (Home Science) (इतर कोर्स चालणार नाही)
8औषधनिर्माता (Pharmacist)12वी + फार्मसी डिप्लोमा/डिग्री + Pharmacy Act अंतर्गत वैध रजिस्ट्रेशन
9प्रलेखक / ग्रंथसुचीकार (Documentalist / Cataloguer)SSC + 6 महिन्यांचा Library Science कोर्स
10सामाजिक सेवा अधीक्षक (MSW)पूर्णवेळ MSW पदवी (Field Work सहित) + UGC मान्यता असलेली
11X-Ray तंत्रज्ञB.Sc (Physics/Chemistry/Biology) + Radiography Diploma/Certificate किंवा Paramedical Tech (Radiography) डिग्री + रजिस्ट्रेशन
12X-Ray सहाय्यकवरीलप्रमाणेच + 1 वर्षाचा अनुभव असल्यास प्राधान्य
13फिजिओथेरपिस्ट12वी (सायन्स) + Bachelor of Physiotherapy + वैध रजिस्ट्रेशन (Occupational Therapy & Physiotherapy Council)
14दंत तंत्रज्ञ (Dental Technician)12वी + Dental Mechanics कोर्स (DCI मान्य) + महाराष्ट्र डेंटल कौन्सिल रजिस्ट्रेशन
15वाहनचालक (Driver)SSC + LMV/MPV/HPV Driving License + 3 वर्ष अनुभव + वाहन दुरुस्तीचे प्राथमिक ज्ञान + स्वच्छ ड्रायविंग रेकॉर्ड + मराठी/हिंदी बोलता/वाचता यायला हवे

अ-तांत्रिक संवर्ग (Non-Technical – मुंबईसाठी मर्यादित):

क्र.पदाचे नावशैक्षणिक पात्रता
16उच्च श्रेणी लघुलेखकSSC + 120 WPM शॉर्टहँड + इंग्रजी 40 WPM / मराठी 30 WPM टायपिंग
17निम्न श्रेणी लघुलेखकSSC + 100 WPM शॉर्टहँड + इंग्रजी 40 WPM / मराठी 30 WPM टायपिंग

DMER Bharti 2025 – भरती परीक्षेचे स्वरूप

  • परीक्षेचा प्रकार: संगणक आधारित ऑनलाइन परीक्षा (CBT)
  • प्रश्नसंख्या: 60 किंवा 100 MCQ प्रश्न (पदावर अवलंबून)
  • भाषा: मराठी आणि इंग्रजी दोन्हीमध्ये
  • नकारात्मक गुण नाहीत
  • टेक्निकल पदांसाठी परीक्षा 90 मिनिटांची (100 गुण)
  • ड्रायव्हर व लघुलेखक पदांसाठी 60 मिनिटांची परीक्षा व 80 गुणांची व्यावसायिक चाचणी

योमर्यादा (09.07.2025 रोजी आधारित)

  • सामान्य प्रवर्ग: 18 ते 38 वर्षे
  • मागासवर्गीय प्रवर्ग: 18 ते 43 वर्षे
  • इतर प्रवर्ग (खेळाडू, अनाथ, माजी सैनिक वगैरे) साठी सवलती लागू

परीक्षा शुल्क

  • खुला वर्ग: ₹1000/-
  • मागासवर्गीय: ₹900/-
  • शुल्क परत मिळणार नाही.

ऑनलाइन अर्ज भरण्याचे वेळापत्रक

क्र.तपशीलतारीख / वेळ
1अर्ज नोंदणी सुरू होण्याची तारीख19 जून 2025, सायंकाळी 5:00 वाजता
2अर्ज भरण्याची अंतिम तारीख9 जुलै 2025, रात्री 11:55 वाजेपर्यंत
3परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख9 जुलै 2025, रात्री 11:55 वाजेपर्यंत
4प्रवेशपत्र (Hall Ticket) डाउनलोडची तारीखनंतर www.med-edu.in वर जाहीर केली जाईल
5तांत्रिक अडचणी व मदतीसाठी ईमेलdmercot2025@gmail.com
6हेल्पलाईन नंबर022-61087518 (कार्यालयीन वेळेत)

महत्त्वाची सूचना: उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचणे अनिवार्य आहे. केवळ ऑनलाईन पद्धतीने भरलेले अर्ज आणि ऑनलाईन भरलेले परीक्षा शुल्कच ग्राह्य धरले जाईल.

महत्त्वाच्या लिंक:

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Posts

arogya sevika bharti new gr

आरोग्य सेविका भरतीसाठी मोठा बदल; पात्रता गुणांची मर्यादा 45 वरून 35 टक्के – शासन निर्णय

August 13, 2026
shikshaketar-padbharti-GR

राज्यातील या शाळांमध्ये शिक्षकेतर पदभरतीला शासनाची मंजुरी; 80 टक्के पदे भरता येणार

August 12, 2026
Pavitra Portal Teacher Recruitment

पवित्र पोर्टलवर प्राधान्यक्रम लॉक करण्यास या तारखेपर्यंत मुदतवाढ; 30 हजारांहून अधिक शिक्षक पदांची भरती प्रक्रिया सुरू

August 11, 2026
maharojgar melava 2026-27

राज्यात 1 हजार रोजगार मेळावे; युवकांना नोकरीसाठी दोन आठवड्यांचे विशेष प्रशिक्षण मिळणार

August 5, 2026
talathi bharti notification 2026

तलाठी पदांच्या 1539 जागांसह MPSC गट क पदांची सुधारित जाहिरात प्रसिद्ध, डाउनलोड डायरेक्ट लिंक

August 3, 2026
public-exam-malpractice-bill-2026

लोकसभेत सार्वजनिक परीक्षा (गैरप्रकार प्रतिबंधक) सुधारणा विधेयक 2026 मंजूर; पेपरफुटी प्रकरणांत 10 वर्षांपर्यंत कारावासाची तरतूद

August 2, 2026

Leave a Comment