वैद्यकीय शिक्षण विभागात ‘गट ड’ पदांसाठी मोठी भरती जाहीर! GMCJJH Recruitment 2025

Published On: September 6, 2025
Follow Us
GMCJJH Recruitment 2025

GMCJJH Recruitment 2025 महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने गट ड संवर्गातील 211 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. दहावी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी आहे.

वैद्यकीय शिक्षण विभागात ‘गट ड’ पदांची भरती सुरू; 211 पदांसाठी अर्ज मागवले

महाराष्ट्र शासन, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, मंत्रालय अंतर्गत विविध रुग्णालये आणि संस्थांमध्ये गट ड (वर्ग-४) संवर्गातील एकूण २११ रिक्त पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे.

दहावी पास असलेल्या उमेदवारांसाठी ही शासकीय नोकरी मिळवण्याची एक उत्तम संधी आहे. या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाइन (Computer Based Test) पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत.

ही भरती सरळसेवेने केली जाणार असून, उमेदवारांची निवड लेखी परीक्षेच्या आधारे होईल. या भरती प्रक्रियेचा सविस्तर तपशील खालीलप्रमाणे आहे.

GMCJJH Recruitment 2025

शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा

  • अर्ज करणारा उमेदवार मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किमान दहावी (एस.एस.सी.) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • उमेदवाराला मराठी भाषेचे ज्ञान असणे अनिवार्य आहे.
  • वयोमर्यादा (१ जुलै २०२५ पर्यंत):
    • खुला प्रवर्ग: किमान १८ ते कमाल ३८ वर्षे.
    • मागासवर्गीय: किमान १८ ते कमाल ४३ वर्षे.
    • खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, भूकंपग्रस्त आणि पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांसाठी शासनाच्या नियमांनुसार वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.

या संधीचा लाभ घेण्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. यासाठी सविस्तर मूळ जाहिरात वाचावी.

जाहिरात आणि ऑनलाईन अर्ज डायरेक्ट लिंकसाठी येथे क्लिक करा

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Posts

Maharashtra Anganwadi Bharti 2026

अंगणवाडी सेविका, मदतनीस भरतीची संपूर्ण माहिती

February 1, 2026
NHM Raigad Recruitment 2026

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), रायगड अंतर्गत रिक्त पदांसाठी मोठी भरती जाहीर

January 11, 2026
Maharashtra Shikshak Bharti

शिक्षक भरती प्रक्रियेत मोठा बदल! आता ‘ही’ संस्था राबवणार संपूर्ण प्रक्रिया; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

January 7, 2026
Maha CET Cell Recruitment 2026

राज्याच्या सीईटी सेलमध्ये मोठी भरती! आता आपल्याच जिल्ह्यात मिळणार काम! ‘या’ पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू, वाचा सविस्तर

December 28, 2025
MPSC Rajyaseva Notification 2026 PDF Download

MPSC Rajyaseva 2026: राज्यसेवा पूर्व परीक्षा नवीन जाहिरात प्रसिद्ध, सविस्तर माहिती जाणून घ्या 

December 26, 2025
University Professor Recruitment

मोठी बातमी! राज्यातील विद्यापीठांतील प्राध्यापक पदभरतीचा मार्ग मोकळा; ’60:40′ सूत्र निश्चित, गुणवत्तेवर भर – उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

December 14, 2025

Leave a Comment