Anganwadi Sevika Salary Update राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे मार्च २०२५ या महिन्याचे मानधन अखेर वितरीत करण्यात आले असून, लाखो अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना दिलासा मिळाला आहे. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित केला असून, तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर डाउनलोड करू शकता.
Anganwadi Sevika Salary Update
अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना मार्च 2025 महिन्याचे मानधन देण्यासाठी एकूण 218 कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यात आले आहे. हा निधी एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत विविध आर्थिक वाटपांच्या टप्प्यांवरून देण्यात येणार आहे.
यामध्ये केंद्र सरकारचा हिस्सा (60%), राज्य सरकारचा हिस्सा (40%), व 100% राज्य हिस्सा यांचा समावेश आहे.
अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे मानधन वेळेवर मिळावे म्हणून, केंद्रीय सहाय्य मिळण्यापूर्वीच हा निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे आयुक्त, नवी मुंबई यांना निधीचे योग्य प्रकारे वितरण व खर्च करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.