अंगणवाडी सेविका व मदतनीस मानधन व प्रोत्साहन भत्ता मंजूर, शासन निर्णय

Published On: March 2, 2026
Follow Us
Anganwadi Workers February Salary

अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे माहे फेब्रुवारी 2026 चे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. याबाबतचा शासन निर्णय महिला व बालविकास विभागाने दिनांक 2 मार्च 2026 रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे.

अंगणवाडी सेविका व मदतनीस कर्मचाऱ्यांच्या मानधनासाठी 178 कोटींचा निधी मंजूर

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना माहे फेब्रुवारी २०२६ या महिन्याचे मानधन (Anganwadi Workers February Salary) देण्यासाठी एकूण १७८.७२ कोटी रुपये इतका अतिरिक्त राज्य हिश्याचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हा निधी आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, नवी मुंबई यांना वितरित करून खर्च करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे.

  • ​या निधीचे वितरण खालीलप्रमाणे करण्यात आले आहे.
  • ​लेखाशीर्ष: २२३६ – पोषण आहार.
  • ​उद्दिष्ट: मजुरी (मानधन आणि प्रोत्साहन भत्ता).
  • ​वितरित निधी: १७८.७२ कोटी रुपये.

हे ही वाचा: अंगणवाडी सेविका व मदतनीस कर्मचाऱ्यांच्या प्रोत्साहन व त्याचे सुधारित निकष येथे वाचा

अंगणवाडी सेविका मानधन आणि प्रोत्साहन भत्ता

राज्यातील अंगणवाडी सेविकांचे काम हे तळागाळातील बालकांचे पोषण आणि आरोग्य सुधारण्यासाठी अत्यंत मोलाचे असते. (Anganwadi Workers February Salary) या कामाची दखल घेऊन सरकारकडून दरमहा मानधन आणि प्रोत्साहन भत्ता दिला जातो.

२ मार्च २०२६ रोजी निर्गमित झालेल्या या शासन निर्णयानुसार, फेब्रुवारी महिन्याचे मानधन अदा करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांनी वित्त विभागाच्या सूचनांचे पालन करून सदर निधीचा विनियोग विहित पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यामुळे जिल्हा स्तरावर आणि प्रकल्प स्तरावर लवकरच निधी वर्ग होईल आणि अंगणवाडी सेविका मानधन थेट त्यांच्या खात्यात जमा होईल.

अधिक माहितीसाठी फेब्रुवारी 2026 अंगणवाडी सेविका व मदतनीस कर्मचाऱ्यांच्या मानधन व प्रोत्साहन भत्ता मंजुरीचा शासन निर्णय वाचा.

हे ही वाचा: अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांवर सरकारकडून स्पष्टीकरण

शासन निर्णय

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment