अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पेन्शन आणि ग्रॅच्युईटी मिळणार? ‘लाडकी बहीण योजनेच्या प्रोत्साहन भत्त्याबाबत शासनाचे स्पष्टीकरण

Published On: March 5, 2026
Follow Us
anganwadi-sevika-pension-gratuity-protsahan-bhatta-update

राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या प्रलंबित मागण्या, पेन्शन, ग्रॅच्युईटी आणि ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेच्या कामाबद्दल मिळणाऱ्या प्रोत्साहन भत्त्याबाबत विधानसभेत महत्त्वाची चर्चा झाली. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी यावर शासनाची भूमिका स्पष्ट केली आहे.

विधानसभेत श्री. राजेश राठोड, श्री. सत्यजीत तांबे आणि इतर आमदारांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधले. ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना अर्ज भरणे, माहिती अपलोड करणे यांसारखी अतिरिक्त कामे करूनही अनेक ठिकाणी अंगणवाडी सेविकांना प्रोत्साहन भत्ता मिळाला नसल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला.

तसेच, अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगरमधील अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाचा संदर्भ देत त्यांच्या पेन्शन आणि ग्रॅच्युईटीबाबत शासनाकडून काय कार्यवाही सुरू आहे, असा सवाल विचारण्यात आला.

या प्रश्नांना उत्तर देताना महिला व बालविकास मंत्री कुमारी आदिती तटकरे यांनी खालील महत्त्वाची माहिती दिली आहे.

लाडकी बहीण योजनेत अर्ज भरणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता

मंत्री महोदयांनी स्पष्ट केले की, लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरण्याचे काम काही ठिकाणी अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिका यांना देण्यात आले होते. त्यांनी भरलेल्या पात्र लाभार्थ्यांच्या नोंदींनुसार प्रोत्साहन भत्ता देण्यासाठी महिला व बालविकास आयुक्त कार्यालयाला निधी वितरित करण्यात आला आहे. त्यानुसार संबंधित कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता अदा करण्यात आल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.

हे ही वाचा: अंगणवाडी सेविका व मदतनीस मानधन व प्रोत्साहन भत्ता मंजूर, सविस्तर वाचा

निवृत्तीवेतन आणि ग्रॅच्युईटी प्रस्तावावर शासनाचा विचार

अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना निवृत्तीवेतन आणि ग्रॅच्युईटी लागू करण्याबाबतचा प्रस्ताव वित्त विभागाकडे सादर करण्यात आला आहे. सध्या या प्रस्तावावर शासन स्तरावर विचारविनिमय सुरू असून अद्याप अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही.

अंगणवाडी सेविका व मदतनीसांना मिळणारा प्रोत्साहन भत्ता

शासनाच्या माहितीनुसार अंगणवाडी कर्मचाऱ्यांना त्यांच्या नियमित मानधनाव्यतिरिक्त कामाच्या आधारावर अतिरिक्त प्रोत्साहन भत्ता दिला जातो.

यामध्ये अंगणवाडी सेविकांना प्रतिमहिना सुमारे ₹2000 पर्यंत तर मदतनीसांना ₹1000 पर्यंत प्रोत्साहन भत्ता दिला जातो. तसेच POSHAN Abhiyaan अंतर्गत अंगणवाडी सेविकांना दरमहा ₹500 अतिरिक्त प्रोत्साहन भत्ता दिला जात असल्याची माहिती देण्यात आली.

हे ही वाचा : अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या प्रोत्साहन भत्त्याचे सुधारित निकष सविस्तर वाचा

anganwadi sevika magnya tarankit prashna
anganwadi sevika magnya tarankit prashna 2026

अधिक माहितीसाठी: तारांकित प्रश्नांची यादी – विधानपरिषद ( अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२६) डाउनलोड करा

तारांकित प्रश्न

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Posts

aasha gatparvartak meeting 2026

राज्यातील आशा गटप्रवर्तकांच्या विविध प्रश्नांबाबत बैठक संपन्न; बैठकीतील ठळक मुद्दे

August 12, 2026
anganwadi sevika salary july 2026

अंगणवाडी सेविका व मदतनीस जुलै 2026 चे मानधन व प्रोत्साहन भत्ता मंजूर, शासन निर्णय जारी

July 28, 2026
aarogya vibhag aadhava

आशा स्वयंसेविकांच्या कार्याचे विशेष कौतुक; आरोग्य विभागाची विभागीय आढावा बैठक संपन्न

July 25, 2026
asha-workers-online-data-entry-clarification

आशा स्वयंसेविका व इतर आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या ऑनलाईन कामाबाबत विधानसभेत महत्वाचे स्पष्टीकरण

July 8, 2026
anganwadi-sevika-promotion-age-limit-gr

अंगणवाडी सेविकांसाठी मोठा निर्णय! मुख्यसेविका पदोन्नतीसाठी वयोमर्यादेत बदल; नवीन शासन निर्णय जारी

July 3, 2026
panvel-viral-video-truth-anganwadi-sevika

त्या व्हायरल व्हिडिओ मधील अंगणवाडी सेविकांबाबत महिला व बालविकास विभागाचा मोठा खुलासा

June 27, 2026

Leave a Comment