महाराष्ट्रातील वाहनधारकांसाठी दिलासादायक बातमी! HSRP number plate New Update नुसार आता केवळ २५ किंवा त्याहून अधिक वाहनधारकांनी एकत्रितपणे HSRP बसविण्यासाठी बुकिंग केल्यास ही सेवा थेट तुमच्या सोसायटी, कार्यालय किंवा घरी घरपोच मिळणार आहे – तेही कोणतेही अतिरिक्त फिटमेंट शुल्क न आकारता. १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी केलेल्या सर्व जुन्या वाहनांवर HSRP लावणे बंधनकारक असून, ही प्रक्रिया आता आणखी सोपी व पारदर्शक करण्यात आली आहे.
Table of Contents
कोणती वाहने HSRP साठी पात्र आहेत?
राज्यात १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत सर्व वाहनांसाठी ही पाटी बंधनकारक करण्यात आली आहे. या अंतर्गत दोन चाकी, तीन चाकी, चार चाकी तसेच जड वाहने या सर्व वाहनांवर HSRP बसवणे गरजेचे आहे.
HSRP number plate New Update
HSRP च्या नवीन अपडेट नुसार या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या परिसरातील किंवा सोसायटीमधील २५ किंवा त्यापेक्षा जास्त वाहन मालकांना एकत्र आणून उत्पादकाशी संपर्क साधावा लागेल. तुम्ही तुमच्या निवासस्थानी, व्यवसायाच्या ठिकाणी किंवा सोसायटीमध्ये हे शिबिर आयोजित करण्याची विनंती करू शकता.
HSRP शुल्क किती? HSRP Number Plate Price In Maharashtra
उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (GST वगळून) बसवण्यासाठी खालीलप्रमाणे शुल्क आकारले जाते:
- दुचाकी व ट्रॅक्टर: ₹४५०
- तीनचाकी वाहने: ₹५००
- प्रवासी कार, हलकी वाहने: ₹७४५
- मध्यम व जड वाहने: ₹७४५
वैयक्तिक मागणी केल्यास काय?
जर तुम्ही वैयक्तिकरित्या तुमच्या घरी ‘एचएसआरपी’ बसवण्याची मागणी केली, तर तुम्हाला त्यासाठी अतिरिक्त शुल्क भरावे लागेल. त्यामुळे एकत्रित बुकिंग करणे अधिक फायद्याचे ठरू शकते.
हे ही वाचा: तुमच्या जिल्ह्याच्या RTO नुसार नंबर प्लेट बुकिंग, स्टेट्स चेक करण्यासाठी सविस्तर माहिती
तक्रार कुठे करावी?
जर तुमच्याकडून अतिरिक्त शुल्क आकारले गेले, तर तुम्ही ०२२- २०८२६४९८ या क्रमांकावर किंवा hsrpcomplaint.tco@gmail.com या ईमेल आयडीवर आपली तक्रार नोंदवू शकता, असे आवाहन सहपरिवहन आयुक्त शैलेश कामत यांनी केले आहे.
नोंदणी कुठे करावी?
तुम्ही तुमच्या वाहनावर HSRP Number Plat बसवण्यासाठी परिवहन विभागाच्या https://transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने Registration करून शुल्काचा भरणा करू शकता.
HSRP नंबर प्लेट: सुधारित नियम, किंमत आणि अर्ज प्रक्रिया – संपूर्ण माहिती
आता जुन्या वाहनांसाठी ‘उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी’ (HSRP) बसविण्याची प्रक्रिया अधिक सुलभ झाली आहे. जर एखाद्या सोसायटी, वसाहत, निवासी संघटना किंवा व्यवसायिक ठिकाणी २५ किंवा त्यापेक्षा अधिक वाहनधारकांनी एकत्रितपणे बुकिंग केलं, तर HSRP फिटमेंट सेवा घरपोच आणि कोणतेही अतिरिक्त शुल्क न घेता दिली जाणार आहे.