JEE Advanced 2026 Response Sheet Live – Answer Key, Result Date

Published On: May 22, 2026
Follow Us
JEE Advanced 2026 Response Sheet

JEE Advanced 2026 Response Sheet: विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही यावर्षीची Joint Entrance Examination (JEE) दिली असेल, तर तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. Indian Institute of Technology (IIT) Roorkee अधिकृत वेबसाईटवर विद्यार्थ्यांच्या JEE Advanced response sheets 2026 उपलब्ध करून दिल्या आहेत.

विद्यार्थी त्यांच्या कँडिडेट पोर्टलवर लॉग इन करून या शीट्स सहज पाहू शकतात. यामध्ये तुम्ही पेपर १ आणि पेपर २ मध्ये नोंदवलेली सर्व उत्तरे दिलेली असतात. डायरेक्ट लिंक आर्टिकल मध्ये दिलेली आहे.

JEE Advanced Provisional Answer key Result

परीक्षा संपल्यानंतर लगेचच IIT Roorkee ने दोन्ही पेपरच्या प्रश्नपत्रिका इंग्रजी आणि हिंदी माध्यमात अपलोड केल्या होत्या. आता अधिकृत वेळापत्रकानुसार, येत्या २५ मे रोजी सकाळी १० वाजता Provisional Answer key की जाहीर केली जाईल. या Answer key सोबत तुमच्या उत्तरांची तुलना करून तुम्ही निकालाआधीच तुमच्या संभाव्य गुणांचा अंदाज लावू शकता.

जर तुम्हाला या प्रोव्हिजनल Answer key मध्ये काही त्रुटी किंवा चुका वाटल्या, तर तुम्हाला आक्षेप नोंदवण्याची संधी दिली जाईल.

तुम्ही २५ मे ते २६ मे (संध्याकाळी ५ वाजेपर्यंत) तुमचे आक्षेप आणि फीडबॅक सबमिट करू शकता. विद्यार्थ्यांनी नोंदवलेल्या सर्व आक्षेपांची पडताळणी केल्यानंतर, संस्था १ जून रोजी सकाळी १० वाजता Final Answer key आणि JEE Advanced Result जाहीर करेल.

JEE Advanced response sheets 2026 डाउनलोड करण्याची सोपी पद्धत

तुम्हाला तुमची रिस्पॉन्स शीट पाहायची असेल किंवा डाउनलोड करायची असेल, तर सर्वात आधी jeeadv.ac.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

वेबसाईट ओपन झाल्यानंतर होमपेजवरच तुम्हाला JEE Advanced response sheets 2026 ची लिंक शोधायची आहे आणि त्यावर क्लिक करायचे आहे.

लिंकवर क्लिक केल्यानंतर जे नवीन लॉगिन पेज ओपन होईल, तिथे तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर, जन्मतारीख आणि इतर विचारलेली लॉगिन माहिती अचूक भरायची आहे. ही सर्व माहिती सबमिट करताच तुमची रिस्पॉन्स शीट स्क्रीनवर दिसेल.

JEE Advanced 2026 Response Sheet

तुम्ही ती त्वरित डाउनलोड करून भविष्यातील संदर्भासाठी तुमच्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरमध्ये सेव्ह करून ठेवू शकता. पुढील सर्व ताज्या अपडेट्ससाठी विद्यार्थ्यांनी अधिकृत वेबसाईटच्या संपर्कात राहावे.

JEE Advanced Official Website : https://jeemain.nta.nic.in/

Check Here JEE Advanced 2026 Response Sheet

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment