Kendra Pramukh Bharti 2025: केंद्रप्रमुख भरती अधिसूचना, पात्रता, अभ्यासक्रम, जिल्हा निहाय रिक्त जागा, संपूर्ण माहिती

By MarathiAlert Team

Published on:

Kendra Pramukh Bharti 2025: राज्यातील केंद्रप्रमुख भरतीची अधिसूचना www.mscepune.in या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. केंद्रप्रमुख पदासाठी अर्ज कसा करावा, पात्रता, महत्त्वाच्या तारखा, जिल्हानिहाय रिक्त जागा, परीक्षा अभ्यासक्रम संपूर्ण माहिती पाहूया.

केंद्रप्रमुख भरती जाहिरात । Kendra Pramukh Bharti 2025 Advertisement

भरल्या जाणाऱ्या पदांचा तपशील (Kendra Pramukh Advertisement)

महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषदेमधील एकूण २४१० केंद्रप्रमुख पदे या भरतीद्वारे भरली जाणार आहेत.

  • पदनाम: समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख)
  • वेतन श्रेणी (Pay Scale): एस १५: ४१८०० – १३२३०० (kendra pramukh salary in maharashtra)
  • एकूण पदसंख्या: २४१० (या पदसंख्येमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.)

समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) जिल्हा निहाय रिक्त पदे 2025

अ. क्र.विभाग (Division)जिल्हा (District)विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे भरतीकरिता उपलब्ध पदे (दि. २९/०८/२०२५ रोजीची स्थिती)
1मुंबईठाणे51
2मुंबईपालघर75
3मुंबईरायगड114
4पुणेपुणे151
5पुणेसोलापूर99
6पुणेअहिल्यानगर123
7कोल्हापूरकोल्हापूर85
8कोल्हापूरसांगली68
9कोल्हापूरसातारा111
10कोल्हापूरसिंधुदूर्ग72
11कोल्हापूररत्नागिरी125
12अमरावतीअमरावती69
13अमरावतीयवतमाळ89
14अमरावतीवर्धा43
15अमरावतीअकोला42
16अमरावतीबुलढाणा65
17अमरावतीवाशिम35
18नागपूरनागपूर68
19नागपूरगडचिरोली50
20नागपूरगोंदिया42
21नागपूरभंडारा30
22छ. संभाजीनगरचंद्रपूर66
23छ. संभाजीनगरछ. संभाजीनगर64
24छ. संभाजीनगरपरभणी43
25छ. संभाजीनगरबीड78
26छ. संभाजीनगरहिंगोली34
27छ. संभाजीनगरजालना53
28नाशिकनाशिक122
29नाशिकजळगाव80
30नाशिकनंदुरबार45
31नाशिकधुळे41
32लातूरलातूर50
33लातूरधाराशिव40
34लातूरनांदेड87
एकूण पदे(संपूर्ण महाराष्ट्र)2410

‘केंद्रप्रमुख’ पदांच्या भरतीसाठी नवीन शासन निर्णय!

केंद्रप्रमुख भरती पात्रता

या परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी खालील अटी पूर्ण करणे आवश्यक आहे:

  1. सेवा आणि कार्यरत ठिकाण: फक्त संबंधित जिल्हा परिषदेमधील शाळेवर कार्यरत पात्र शिक्षकच या परीक्षेसाठी अर्ज करू शकतात. अन्य जिल्हा परिषद, नगर परिषद, महानगरपालिका किंवा खाजगी संस्थेमधील शिक्षक पात्र नाहीत.
  2. शैक्षणिक अर्हता: अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत उमेदवाराने कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची बी.ए./बी.कॉम./बी.एस.सी. ही पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  3. सेवेचा अनुभव: जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) किंवा प्रशिक्षित शिक्षक (प्राथमिक) या पदावर किमान सहा वर्षे अखंडित सेवा पूर्ण करणे आवश्यक आहे. यासाठी शिक्षण सेवक पदावरील सेवा देखील ग्राह्य धरण्यात येईल. दि. ०१/०१/२०२५ रोजी अखंड नियमित सेवेचा कालावधी विचारात घेतला जाईल.
  4. मर्यादा: उमेदवार ज्या जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत असेल, त्याच जिल्ह्यासाठी निवडीस पात्र राहील.
  5. TET पात्रता: माननीय न्यायालयाच्या निर्देशानुसार, वेळोवेळी शासन धोरण आणि निर्णयानुसार महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.

परीक्षा शुल्क (Examination Fee)

परीक्षेचे शुल्क ‘ना-परतावा’ (Non-refundable) आहे.

अ.क्र.संवर्गशुल्क
सर्व संवर्गातील उमेदवार₹ ९५०/-
दिव्यांग उमेदवार₹ ८५०/-

केंद्रप्रमुख भरती अभ्यासक्रम । Kendra Pramukh Bharti 2025 Syllabus

ही परीक्षा २०० गुणांची असेल, ज्यात २०० प्रश्न विचारले जातील. परीक्षेची निवड प्रक्रिया लेखी परीक्षेतील एकूण गुणांच्या आधारे गुणवत्ता यादीनुसार केली जाईल.

विभाग १: बुद्धिमत्ता व अभियोग्यता

  • उपघटक: अभियोग्यता, तार्किक क्षमता, भाषिक क्षमता (मराठी व इंग्रजी), कल, आवड, व्यक्तिमत्त्व, बुद्धिमत्ता, वर्गीकरणे, समसंबंध, तर्क व अनुमान इ.
  • प्रश्न संख्या : १००
  • गुण: १००

विभाग २: शालेय शिक्षणातील नियम, अधिनियम व शैक्षणिक नवविचार प्रवाह

  • उपघटक: भारतीय राज्यघटनेतील शिक्षणाविषयक तरतूदी, कायदे, योजना , शिक्षण क्षेत्रातील प्रमुख संस्था/संघटनेचे कार्य , माहिती तंत्रज्ञानाचा वापर (प्रात्यक्षिक) , अभ्यासक्रम व मूल्यमापन, अध्ययन-अध्यापन पद्धती , माहितीचे विश्लेषण व मूल्यमापन , विषयनिहाय आशयज्ञान आणि सामान्यज्ञान (विशेषतः इंग्रजी), संप्रेषण कौशल्य.
  • प्रश्न संख्या : १००
  • गुण: १००
  • एकूण प्रश्न संख्या: २००
  • एकूण गुण: २००

लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र

केंद्रप्रमुख पदावर नियुक्ती होणाऱ्या व्यक्तीने महाराष्ट्र नागरी सेवा (लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन) नियम, २००५ मधील तरतुदींनुसार किंवा शासनाच्या वेळोवेळीच्या नियमांनुसार नियुक्तीच्या वेळी लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन (Small Family Declaration) सादर करणे आवश्यक आहे. हे प्रतिज्ञापत्र उमेदवाराने स्वतःच्या हस्ताक्षरात लिहून त्याची स्कॅन प्रत अपलोड करणे आवश्यक आहे. टंकलिखित (Typed) केलेले किंवा दुसऱ्या व्यक्तीने लिहिलेले प्रतिज्ञापत्र आढळल्यास उमेदवारी रद्द करण्यात येईल.

Kendra Pramukh Bharti 2025 Online Application

Kendra Pramukh Bharti 2025 परीक्षेबाबतचे अधिसूचना, वेळापत्रक व ऑनलाईन आवेदनपत्राबाबतची माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत दि. १०/११/२०२५ होती, ती आता दि. ०१/०१/२०२६ पर्यंत वाढवण्यात आली आहे.

केंद्र प्रमुख (समूह साधन केंद्र समन्वयक) Kendra Pramukh Exam Date 2025

महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हापरिषद मधील कार्यरत प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे नियुक्ती देण्यासाठी “समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-२०२५” या परीक्षेचे ऑनलाईन पध्दतीने जानेवारी/ फेब्रुवारी 2026 मध्ये आयोजन करण्यात येणार आहे.

केंद्रप्रमुख भरती 2025 – महत्वाच्या लिंक

ही परीक्षा तुमच्या करिअरमधील एक मोठे पाऊल आहे. तुम्ही तुमच्या मेहनतीने आणि अनुभवाने या संधीसाठी निश्चितच पात्र आहात. सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Read more

Leave a Comment

error: Content is protected !!