Kotwal Appointment New Rule महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने २ जून २०२५ रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार, महसूल सेवक (कोतवाल) पदावर नियुक्तीसाठी ‘लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र‘ (Small Family Declaration) सादर करणे ही एक आवश्यक अट असणार आहे.
या निर्णयामुळे, शासकीय सेवेतील गट-अ, ब, क आणि ड मधील पदांच्या नियुक्तीसाठी यापूर्वीच लागू असलेले ‘लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन’ सादर करण्याचे बंधन आता कोतवाल पदासाठी देखील लागू झाले आहे. सामान्य प्रशासन विभागाने २८ मार्च २००५ रोजी काढलेल्या अधिसूचनेनुसार हे बंधन विहित करण्यात आले होते.
Kotwal Appointment New Rule शासन निर्णयातील प्रमुख तरतुदी:
व्याख्या:
- प्रतिज्ञापन: महसूल सेवक (कोतवाल) पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने द्यायचे प्रतिज्ञापन.
- शासन: महाराष्ट्र शासन.
- सेवा: कोतवाल सेवा भरती नियम, १९५९ नुसार महाराष्ट्र शासनाच्या नियंत्रणाखालील महसूल विभागांतर्गत नियुक्त महसूल सेवक (कोतवाल) पदावरील सेवा.
- लहान कुटुंब: दोन मुले यांसह पत्नी व पती यांचा समावेश असलेले कुटुंब.
स्पष्टीकरण:
- या शासन निर्णयाच्या अंमलबजावणीच्या दिनांकाला किंवा त्यानंतर एखाद्या जोडप्याला केवळ एकच मूल असल्यास, त्यानंतर एकाच प्रसूतीत जन्माला आलेल्या एकापेक्षा अधिक मुलांना एकच अपत्य मानले जाईल.
- ‘मूल’ या व्याख्येत दत्तक घेतलेल्या मुलाचा किंवा मुलांचा समावेश होत नाही.
अटी व अपवाद:
- लहान कुटुंबाच्या प्रतिज्ञापनाची आवश्यकता महसूल सेवक (कोतवाल) पदावर नियुक्तीसाठी एक अतिरिक्त आणि अत्यावश्यक अट असेल.
- परंतु, हा शासन निर्णय अंमलात येण्याच्या दिनांकास ज्या व्यक्तींना दोनपेक्षा अधिक मुले आहेत, त्यांच्या मुलांच्या संख्येत वाढ होत नाही तोपर्यंत त्यांना या निर्णयानुसार नियुक्तीसाठी अनर्ह ठरवले जाणार नाही.
- तसेच, या शासन निर्णयाच्या अंमलबजावणीच्या दिनांकापासून एका वर्षाच्या कालावधीत एकाच प्रसूतीमध्ये जन्माला आलेले एक किंवा अधिक मुलांना अनर्हतेसाठी विचारात घेतले जाणार नाही.
प्रतिज्ञापन सादर करणे: महसूल सेवक (कोतवाल) पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला अर्जासोबत ‘नमुना-अ’ मध्ये दिलेले प्रतिज्ञापन सादर करावे लागेल.
निर्णय कधी लागू नाही: ज्या निवड प्रक्रिया या निर्णयाच्या अंमलबजावणीच्या दिनांकापूर्वीच सुरू झाल्या आहेत, त्यांना हा निर्णय लागू होणार नाही.
अधिक माहितीसाठी : शासन निर्णय डाउनलोड करा