महिलांसाठी खुशखबर! ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ आणि ‘लेक लाडकी’ योजनेत मोठी घोषणा, जाणून घ्या संपूर्ण माहिती! Ladki Bahin Yojana Budget

By Marathi Alert

Updated on:

Ladki Bahin Yojana Budget: महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा आणि समाजातील सर्व घटकांना न्याय देणारा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. विशेषतः महिला, बालके आणि ग्रामीण भागातील वंचित घटकांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तसेच लेक लाडकी योजनांसाठी या अर्थसंकल्पात अनेक महत्त्वाच्या योजनांची घोषणा करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना Ladki Bahin Yojana Budget

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री आ. श्री. अजितदादा पवार यांनी अर्थसंकल्पाच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणासाठी मोठी तरतूद केली आहे, जी महिलांच्या प्रगतीला नवी गती देणारी ठरेल.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

लाडकी बहीण योजना सन २०२५-२६ साठी ३६ हजार कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित असून, महिला बचतगटांच्या सहाय्याने क्रेडिट सोसायट्या सुरू करण्यावर भर दिला जाणार आहे. सर्व वैयक्तिक लाभार्थी योजनांसाठी डीबीटी प्रणाली लागू करण्यात येणार आहे, ज्यामुळे प्रक्रिया गतीमान, पारदर्शक आणि प्रभावी होईल.

लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता मिळणार?

या सर्वसमावेशक अर्थसंकल्पामुळे महिला उद्योजकता, शिक्षण, आर्थिक स्वावलंबन आणि सामाजिक सक्षमीकरणाला भक्कम आधार मिळणार आहे. महाराष्ट्रातील सर्व माता-भगिनींसाठी हा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना: आता ११ महिन्यांपर्यंत प्रशिक्षण व ₹10,000 मानधन!

‘रूपे कार्ड’ : लाडक्या बहिणींना मिळणार खास सुविधा! Ladki Bahin Yojana Rupay Card

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या छायाचित्रासह ‘रूपे कार्ड’ (Ladki Bahin Yojana Rupay Card) जारी होणार आहे. या कार्डद्वारे मल्टि-मोडल ट्रान्सपोर्ट एक्सेस, डिजिटल सुरक्षा, इन्शुरन्स आणि क्यूआर कोड पेमेंट सुविधा मिळेल. रूपे कार्ड’ लाभार्थ्यांना देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे! अधिक सविस्तर वाचा..

खुशखबर! 300 युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्यांसाठी सरकारची मोठी योजना!

लाडक्या बहिणीसाठी राज्यस्तरीय क्रेडिट संस्था State Level Credit Institution For Ladki Bahin Yojana

महिलांच्या शिक्षण आणि सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र सरकार ‘लेक लाडकी’, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ यांसारख्या योजना प्रभावीपणे राबवत आहे. नागपूरच्या महिलांनी पुढाकार घेत नागपूर महिला सन्मान क्रेडिट सोसायटी सुरू केली आहे, ज्याद्वारे महिला स्वतःचा व्यवसाय उभारून इतर महिलांनाही सहकार्य करत आहेत. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या मदतीने राज्यस्तरीय क्रेडिट सोसायटी (State Level Credit Institution For Ladki Bahin Yojana) स्थापन केली जाणार आहे, जी महिला उद्योजकतेला चालना देईल.

अंगणवाडी सेविका, मदतनिसांसाठी खुशखबर! मोठी पगारवाढ आणि १८,००० जागांसाठी नवीन भरती!

महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प २०२५ २६ पीडीएफ येथे पाहा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अधिकृत वेबसाईट: https://ladakibahin.maharashtra.gov.in/

लेक लाडकी योजना Lek Ladki Yojana

मुलींचा जन्मदर वाढविणे, शिक्षणास चालना देणे आणि बालविवाह रोखण्यासाठी महत्त्वाची पावले उचलण्यात येत आहेत. आतापर्यंत या योजनेतून आतापर्यंत १ लाख १७ हजार ३९० मुलींना लाभ मिळाला असून, ५० कोटी ५५ लाख रुपये निधीची (Ladki Bahin Yojana Total Budget In Maharashtra) तरतूद करण्यात आली आहे. या योजनेची अधिक माहिती वाचा..

HSRP नंबर प्लेट नोंदणी, स्टेट्स चेक करा- संपूर्ण माहिती येथे पाहा

महिलांसाठी विशेष योजना

  • सावित्रीबाई फुले स्मारक व प्रशिक्षण केंद्र – आद्य शिक्षिका ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगाव नायगाव (ता. खंडाळा, जि. सातारा) येथे त्यांच्या कार्यास साजेसे स्मारक आणि महिला प्रशिक्षण केंद्र उभारले जाणार आहे.
  • महिला व बालकांच्या अन्न सुरक्षा, निवारा, पिण्याचे पाणी, आरोग्य, शिक्षण आणि रोजगार यांसाठी राज्याचे आरोग्य धोरण लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

लाडकी बहीण योजना: ‘रूपे कार्ड’ लाँच आणि ₹3000 जमा होण्याची नवीन तारीख पाहा

अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे

  • महिला आणि बालकांच्या विकासावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
  • ग्रामीण आणि वंचित घटकांना न्याय देण्यासाठी अनेक योजनांची घोषणा करण्यात आली आहे.
  • योजनांच्या अंमलबजावणीत पारदर्शकता आणि गतिमानता आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.

लाडक्या बहिणींसाठी सरकारचं डबल गिफ्ट! पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात ३००० रुपये जमा!

महिलांचे सशक्तीकरण, बालकांचा उज्ज्वल भविष्य आणि सामाजिक समता यासाठी हा अर्थसंकल्प मोठा टप्पा ठरणार आहे!

महाराष्ट्राचा ऐतिहासिक अर्थसंकल्प! संपूर्ण विभागाचे ठळक मुद्दे येथे पाहा

निष्कर्ष

महाराष्ट्र राज्याच्या २०२५ २६ या अर्थसंकल्पात महिला, बालक आणि ग्रामीण भागातील वंचित घटकांच्या सशक्तीकरणावर विशेष भर देण्यात आला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ आणि ‘लेक लाडकी’ योजना यांसारख्या उपक्रमांद्वारे महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. राज्यस्तरीय क्रेडिट सोसायटी, रूपे कार्ड सुविधा, तसेच महिला आणि बालकांसाठी विशेष आरोग्य व शिक्षण धोरणे यामुळे समाजाच्या सर्व स्तरांना आधार मिळेल. (Ladki Bahin Yojana Budget)

योजनांच्या अंमलबजावणीत पारदर्शकता आणि वेग आणण्यासाठी डीबीटी प्रणालीचा वापर, तसेच महिला बचतगटांच्या माध्यमातून क्रेडिट सोसायट्यांचे जाळे निर्माण करण्याचा निर्णय क्रांतिकारी ठरणार आहे. महिलांचे सशक्तीकरण, बालकांचे उज्ज्वल भविष्य आणि सामाजिक समता या उद्दिष्टांसह महाराष्ट्र सरकारने विकासाला नवी दिशा दिली आहे.

महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षा (एमएचटी-सीईटी) जाहीर सूचना!

Leave a Comment

error: Content is protected !!