Ladki Bahin Yojana Maharashtra News: राज्य सरकारने आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ मिळतो. या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात दर महिन्याला 1500 रुपये जमा करण्यात येतात.
Table of Contents
Ladki Bahin योजनेचे नऊ हप्ते वितरित
गेल्या जुलै 2024 मध्ये या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली होती. आतापर्यंत एकूण 9 हप्ते दरमहा 1,500 रुपये प्रमाणे 13,500 रुपये पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत. मात्र, योजनेमुळे राज्याच्या अर्थसंकल्पावर ताण येत असल्याचे बोलले जात आहे.
2100 रुपये कधी मिळणार?
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुती सरकारने महिलांना दरमहा 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या वाढीव रकमेबाबत घोषणा होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, सध्या यावर कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे लाभार्थी महिलांचे लक्ष 2100 रुपये प्रतिमहिना कधी मिळणार याकडे लागले आहे.
Ladki Bahin Yojana Maharashtra News
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “राज्याची आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर योग्यवेळी निर्णय घेतला जाईल.” यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केली. “लाडक्या बहिणींनी सरकारला पाठबळ दिलं, त्यामुळे राज्याची आर्थिक ताकद वाढली की आम्ही त्यांना 2100 रुपये देणार,” असे शिंदे यांनी स्पष्ट केले.
विरोधकांचा सरकारवर निशाणा
विरोधकांनी सरकारवर टीका करताना म्हटले की, इतर योजनांचे निधी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी वळवले जात आहेत. तसेच, सरकार केवळ घोषणा करत आहे, पण प्रत्यक्षात महिलांना वाढीव रक्कम मिळणार की नाही, याबाबत स्पष्टता नाही.
लाभार्थी महिलांचे काय मत?
राज्यातील अनेक महिलांनी सरकारकडे 2100 रुपयांची अंमलबजावणी लवकरात लवकर करण्याची मागणी केली आहे. सरकारने दिलेले आश्वासन पूर्ण करणार का? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अधिकृत वेबसाईट: https://ladakibahin.maharashtra.gov.in/