MHT CET 2024 Answer Key: राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत ‘पुन्हा’ एकदा सुधारित उत्तरतालिका आणि प्रश्नपत्रिका उपलब्ध; वेळापत्रक पाहा

Published On: June 28, 2024
Follow Us

MHT CET 2024 Answer Key : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत पुन्हा एकदा प्रश्नपत्रिका, उमेदवारांनी प्रश्ननिहाय दिलेले उत्तर आणि सुधारीत उत्तरतालिका (Answer Key) उपलब्ध करून देण्यात आले असून, यासाठी (PCM/PCB Group) निहाय वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

MHT CET Exam 2024

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये एमएचटी-सीईटी २०२४ ही सामाईक प्रवेश परीक्षा ऑनलाईन पध्दतीने विविध सत्रात घेण्यात आलेली होती.

सदर परीक्षेनंतर उमेदवारांना त्यांच्या लॉगीनमध्ये ऑनलाईन पध्दतीने आक्षेप नोंदणी सुविधा PCB Group करीता दिनांक २२ मे, २०२४ ते २४ मे, २०२४ या कालावधीत तसेच PCM Group करीता दिनांक २४ मे, २०२४ ते २६ मे, २०२४ या कालावधीत उपलब्ध करुन देण्यात आलेली होती.

प्राप्त झालेल्या आक्षेपांचे विषयतज्ञाकडून निराकरण करण्यात आलेले असून याबाबतचा अहवाल या कार्यालयाच्या संकेतस्थळावर दिनांक ७ जून, २०२४ रोजी उमेदवार, पालक, संस्था यांच्या माहितीकरीता प्रसिध्द करण्यात आलेला होता.

MHT-CET 2024: पालक, विद्यार्थ्यांच्या तक्रारींवर राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून खुलासा!

सुवर्णसंधी! महाज्योती मोफत टॅबसाठी ऑनलाईन अर्ज येथे करा

MHT CET Exam Result 2024

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत दिनांक १७ एप्रिल, २०२४ रोजी संकेतस्थळावर प्रसिध्द केलेल्या निकाल प्रक्रिया पध्दतीचा वापर करुन आणि दिनांक ७ जून, २०२४ रोजी प्रसिध्द केलेल्या अहवालानुसार योग्य त्या सुधारणा करुन सुधारीत उत्तर तालिकेनुसार निकाल तयार करुन त्याची विशेष तज्ज्ञां करवी पडताळणी करुन दिनांक १६ जून, २०२४ रोजी घोषित करण्यात आलेला आहे.

Download score Card(PCM Group)
Download score Card(PCB Group)

सारथी उच्च शिक्षण देशांतर्गत शिष्यवृत्ती योजना 2024-25: सविस्तर तपशील

तथापि, या कार्यालयास भेट दिलेल्या उमेदवार, पालक यांच्याशी चर्चा केल्यानंतर काही उमेदवारांनी उपरोक्त कालावधीत प्रश्नपत्रिका, उत्तर तालिका यांचे अवलोकन केले नसल्याचे निदर्शनास आलेले आहे.

विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी! सरकारी नोकरीच्या स्पर्धा परीक्षांसाठी विनामूल्य प्रशिक्षण!

MHT CET Answer Key Time Table 2024

त्यामुळे आता उमेदवार, पालक यांच्या समाधानांसाठी पुन्हा एकदा प्रश्नपत्रिका, उमेदवारांनी प्रश्ननिहाय दिलेले उत्तर आणि सुधारीत उत्तर तालिकेनुसार अचुक उत्तर खालील वेळापत्रकानुसार उमेदवारांच्या लॉगीनमध्ये केवळ पाहण्याकरीता सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे, याची सर्व उमेदवार व पालकांनी नोंद घ्यावी. असे आयुक्त, राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी जाहीर केले आहे.

MHT CET Answer Key Time Table 2024

  1. PCM Group – 27/06/2024 to 28/06/2024
  2. PCB Group – 29/06/2024 to 30/06/2024

अधिक माहितीसाठी: राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाचे संकेतस्थळ – https://cetcell.mahacet.org/

जाहीर सूचना: येथे पाहा

‘आरटीई’ प्रवेशाची लॉटरीची यादी ‘कधी’ जाहीर होणार?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Posts

MBBS internship latest news Maharashtra

एमबीबीएस विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! एक वर्षाची सामाजिक दायित्व सेवा सक्ती रद्द; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

July 26, 2026
Pavitra Portal shikshak bharti

पवित्र पोर्टल शिक्षक भरतीच्या कार्यपद्धतीत सुधारणा; शासन निर्णय निर्गमित (24 जुलै 2026)

July 25, 2026
samagra-shiksha-funds-increase

‘समग्र शिक्षा’च्या निधीत वाढ करण्यात यावी; केंद्रीय परिषदेत शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांची मागणी

July 23, 2026
PM YASASVI Scholarship 2026

पीएम-यशस्वी शिष्यवृत्ती योजना 2026-27: ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन; या पात्र विद्यार्थ्यांना 1.25 लाखांपर्यंत आर्थिक मदत

July 22, 2026
kendra stariy shikshan parishad

केंद्रस्तरीय शिक्षण परिषद 2026-27: जुलै विषय सूची, सुधारित मार्गदर्शिका PDF डाउनलोड

July 20, 2026
Safety Audit letter

राज्यातील विद्यार्थी सुरक्षेच्या संदर्भात शिक्षण विभागाचा महत्वपूर्ण निर्णय!

July 18, 2026

Leave a Comment