शिष्यवृत्ती परीक्षा 2026: MSCE Hall Ticket Download Direct Link

Published On: March 28, 2026
Follow Us
MSCE Hall Ticket Download Direct Link

MSCE Hall Ticket Download Direct Link: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे मार्फत घेण्यात येणाऱ्या प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 4 थी) व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 7 वी) 2026 प्रवेशपत्र (Hall Ticket) प्रसिध्द करण्यात आले आहे.

शिष्यवृत्ती परीक्षा 26 एप्रिल 2026 रोजी होणार

प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 4 थी) व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 7 वी) ही दि. 26/04/2026 रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहे.

सदर परीक्षेचे प्रवेशपत्र दि. 27/03/2026 रोजी सा 5:00 वा. संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.

मुख्याध्यापकांनी प्रवेशपत्राची प्रिंट काढून तात्काळ सर्व परीक्षाध्यर्थ्यांना वितरीत करावे. सर्व परीक्षार्थी व पालक यांनी शाळा मुख्याध्यापकांकडून प्रवेशपत्र प्राप्त करून घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.

संलग्नता शुल्क भरण्याची आवश्यकता

इ. ४ थी व इ. ७ वी शिष्यवृत्ती परीक्षा एप्रिल २०२६ चे प्रवेशपत्र शाळेच्या लॉगीनमध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत. त्याची प्रिंट काढून तात्काळ सर्व परीक्षार्थ्याना वितरीत करावी.

इ. ५ वी व इ. ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ साठी ज्या शाळांनी शाळा संलग्नता शुल्क भरलेले असेल त्या शाळांना इ. ४ थी व इ. ७ वी साठी पुन्हा शाळा संलग्नता शुल्क भरण्याची आवश्यकता नाही.

MSCE Scholarship Examination Hall Ticket Download Direct Link

Primary Scholarship Examination Std. 4ᵗʰ (PSE) / Upper Primary Scholarship Examination Std. 7ᵗʰ (UPS) – 2026

MSCE Hall Ticket Download Direct Link

अधिकृत वेबसाईट: https://2026-2.puppssmsce.in/

Scholarship Examination

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment