MSEDCL Income Tax Circular 2025 26 साठी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड द्वारे सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी आयकर कपात संदर्भात नवीन परिपत्रक जारी केले आहे. नवीन आर्थिक वर्ष २०२५-२६ साठीच्या आयकर कपाती संदर्भात हे महत्त्वाचे परिपत्रक काढण्यात आले आहे. या वर्षासाठी नवीन कर प्रणाली काय आहे? आणि त्या नुसार तुम्हाला किती टॅक्स बसणार? सविस्तर जाणून घ्या.
Table of Contents
MSEDCL Income Tax Circular 2025
आयकर कायद्याच्या कलम १९२ नुसार कर्मचाऱ्यांच्या वेतनातून नियमानुसार आयकर कपात केली जाईल. एप्रिल २०२५ पासून सुधारित दरांनुसार ही कपात लागू होणार आहे. असे कंपनीने स्पष्ट केले आहे.
परिपत्रकानुसार, सर्व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या आयकर कपातीची गणना करून ती १५ मे २०२५ पर्यंत सादर करणे अनिवार्य आहे. जे कर्मचारी निर्धारित वेळेत ही माहिती सादर करणार नाही, त्यांची आयकर कपात नवीन कर प्रणालीनुसार केली जाईल, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
ज्या कर्मचाऱ्यांनी जुनी कर प्रणाली निवडली आहे, त्यांना त्यांच्या गुंतवणुकीची कागदपत्रे वेळेत सादर करणे आवश्यक आहे. गुंतवणुकीच्या पुराव्यानुसारच त्यांना आयकर कपातीत सूट मिळेल. कागदपत्रे वेळेवर न दिल्यास, त्यांचीही कपात नवीन कर प्रणालीनुसार होईल.
याव्यतिरिक्त, प्रत्येक कर्मचाऱ्याला त्यांच्या अंदाजित वार्षिक उत्पन्न आणि संभाव्य आयकर दायित्वाची घोषणा सादर करावी लागेल. एलटीए (LTA) आणि वैद्यकीय प्रतिपूर्ती दाव्यांची कागदपत्रे ३१ जुलै २०२५ पर्यंत सादर करणे बंधनकारक आहे. त्यानंतर आलेल्या दाव्यांवर विचार केला जाणार नाही, असेही कंपनीने स्पष्ट केले आहे.
कंपनीच्या व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांनी या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. अधिक माहितीसाठी हे परिपत्रक MSEDCL च्या ई-कार्यालयावर उपलब्ध आहे.
Tax calculator – Budget 2025 इन्कम टॅक्स नवीन स्लॅब जाणून घ्या
केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 मध्ये मध्यमवर्गासाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. नव्या कररचनेत 12 लाख रुपयांपर्यंतचे वार्षिक उत्पन्न करमुक्त करण्यात आले आहे.
संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना, केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी करपात्र उत्पन्नाच्या स्तरात आमूलाग्र बदल आणि करदात्यांना लाभ देणारे दर सुचवले आहे.
- 12 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त: नव्या कररचनेत 12 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही प्राप्तिकर लागू होणार नाही.
- नोकरदारांसाठी 12.75 लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त: नोकरदार करदात्यांसाठी 75,000 रुपयांची स्टँडर्ड डिडक्शन असल्यामुळे 12.75 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त असेल.
नव्या कररचनेत अर्थमंत्र्यांनी कर आकारणीच्या दरातील संरचनेत खालीलप्रमाणे बदल सुचवले आहेत. करपात्र स्तरातील बदलांचे करविषयक लाभ आणि विविध उत्पन्न स्तरावरील सवलत खालील तक्त्यात दर्शवली आहे.


तुम्हाला किती टॅक्स बसेल? येथे चेक करा
एकूण वार्षिक उत्पन्नातून 75000 वजा करून उरलेली रक्कम टाका व आपला टॅक्स किती बसेल जुना आणि नवा दोन्ही पद्धतीने तपासा.
तुम्हाला किती टॅक्स बसेल? येथे चेक करा
अधिकृत माहितीसाठी: https://www.incometax.gov.in/
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
