मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेबाबत महत्त्वाचे स्पष्टीकरण: 5 वर्षांचा कालावधी असलेला शासन निर्णय खोटा Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana New Update

Published On: July 16, 2025
Follow Us
Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana New Update

Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana New Update सध्या व्हॉट्सअॅपवर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा कालावधी ५ वर्षांसाठी वाढवण्यात आल्याची एक बातमी मोठ्या प्रमाणात फिरत आहे. मात्र, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाने यासंबंधी एक महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले असून, हा व्हायरल होत असलेला शासन निर्णय पूर्णपणे खोटा आणि जनतेची फसवणूक करणारा आहे. शासनाने असा कोणताही निर्णय घेतलेला नाही. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत युवकांना सध्या केवळ ११ महिन्यांसाठीच कार्यप्रशिक्षणाची संधी उपलब्ध आहे.

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील तरुणांना शिक्षण पूर्ण झाल्यावर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची रोजगार मिळवण्याची क्षमता वाढवण्यासाठी ९ जुलै २०२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना‘ सुरू करण्यात आली आहे.

या योजनेत सुरुवातीला प्रशिक्षणाचा कालावधी सहा महिन्यांचा होता, तो आता वाढवून ११ महिने करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत प्रशिक्षणार्थींना मासिक विद्यावेतन (स्टायपेंड) देखील दिले जाते, जे थेट त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा होते.

मिळणारे विद्यावेतन असे आहे:

  • १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना: प्रतिमाह रु. ६,०००
  • आयटीआय किंवा पदविका प्राप्त प्रशिक्षणार्थींना: प्रतिमाह रु. ८,०००
  • पदवी व पदव्युत्तर पदवी प्राप्त प्रशिक्षणार्थींना: प्रतिमाह रु. १०,०००

त्यामुळे, नागरिकांनी व्हॉट्सअॅपवर फिरणाऱ्या खोट्या माहितीवर विश्वास ठेवू नये आणि अधिकृत माहितीसाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Posts

pa-system-for-schools

मोठा निर्णय! राज्यातील 16 हजार शाळांमध्ये बसणार स्पीकर सेट PA सिस्टीम; शासन निर्णय निर्गमित

July 29, 2026
MBBS internship latest news Maharashtra

एमबीबीएस विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! एक वर्षाची सामाजिक दायित्व सेवा सक्ती रद्द; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

July 26, 2026
Pavitra Portal shikshak bharti

पवित्र पोर्टल शिक्षक भरतीच्या कार्यपद्धतीत सुधारणा; शासन निर्णय निर्गमित (24 जुलै 2026)

July 25, 2026
samagra-shiksha-funds-increase

‘समग्र शिक्षा’च्या निधीत वाढ करण्यात यावी; केंद्रीय परिषदेत शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांची मागणी

July 23, 2026
PM YASASVI Scholarship 2026

पीएम-यशस्वी शिष्यवृत्ती योजना 2026-27: ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन; या पात्र विद्यार्थ्यांना 1.25 लाखांपर्यंत आर्थिक मदत

July 22, 2026
kendra stariy shikshan parishad

केंद्रस्तरीय शिक्षण परिषद 2026-27: जुलै विषय सूची, सुधारित मार्गदर्शिका PDF डाउनलोड

July 20, 2026

Leave a Comment