Polytechnic Admission 2025 उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घोषणा केली आहे की, पॉलिटेक्निकच्या प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया 20 मे 2025 पासून सुरू होत आहे. दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी अभियंता बनण्याचा हा एक उत्तम मार्ग असून, नोकरी आणि व्यवसायासाठी हे अभ्यासक्रम खूप फायदेशीर असल्याचे त्यांनी सांगितले.
Polytechnic Admission 2025
पॉलिटेक्निक का आहे महत्त्वाचे?
चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, पॉलिटेक्निक पदविका अभ्यासक्रम कमी वेळात तांत्रिक कौशल्ये शिकवून विद्यार्थ्यांना लगेच रोजगार मिळवण्यास किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यास मदत करतात. आजच्या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात स्पर्धेत टिकून राहण्यासाठी विद्यार्थ्यांना तयार करण्यासाठी हे अभ्यासक्रम खूप महत्त्वाचे आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी यामध्ये प्रवेश घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
दहावी नंतरच्या डिप्लोमा अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू – २०२५-२६ शैक्षणिक वर्ष
Polytechnic Admission 2025 महाराष्ट्र शासनाच्या तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी दहावी नंतरच्या डिप्लोमा अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. या प्रक्रियेअंतर्गत अभियांत्रिकी, तंत्रज्ञान आणि वाहतूक या क्षेत्रांतील डिप्लोमा अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश दिला जाणार आहे.
महत्त्वाच्या तारखा:
क्र. | प्रक्रिया | सुरुवात | शेवट |
---|---|---|---|
1 | ऑनलाइन नोंदणी व अर्ज सादर | 20 मे 2025 | 26 जून 2025 |
2 | कागदपत्र पडताळणी व अर्ज निश्चिती (ई-सक्रूटनी किंवा प्रत्यक्ष सक्रूटनी) | 20 मे 2025 | 16 जून 2025 |
3 | तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध | 18 जून 2025 | — |
4 | तात्पुरती यादीवरील दावे व दुरुस्ती | 19 जून 2025 | 21 जून 2025 |
5 | अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध | 23 जून 2025 | — |
नोंदणीचे दोन पर्याय:
- ई-सक्रूटनी (E-Scrutiny):
उमेदवार स्वतः मोबाईल/संगणकाद्वारे अर्ज भरून कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करू शकतात. अर्जाची पडताळणी सुविधाकेंद्रामार्फत ऑनलाइन होईल. - प्रत्यक्ष सक्रूटनी (Physical Scrutiny):
ज्यांच्याकडे इंटरनेट सुविधा नाही, त्यांनी जवळच्या सुविधाकेंद्रात जाऊन अर्ज भरावा, कागदपत्रे अपलोड करावीत आणि प्रत्यक्ष उपस्थित राहून पडताळणी करून घ्यावी.
अर्ज शुल्क:
- सर्वसामान्य व इतर राज्यांतील उमेदवार: ₹400/-
- महाराष्ट्रातील राखीव वर्ग (SC, ST, NT, OBC, EWS): ₹300/-
शुल्क केवळ ऑनलाइन पद्धतीनेच भरावे (UPI, कार्ड, नेटबँकिंग).
Polytechnic Admission 2025 पात्रता:
- भारताचा नागरिक असणे आवश्यक.
- किमान 35% गुणांसह दहावी (SSC) किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.
- महाराष्ट्राबाहेरील उमेदवारांना केवळ संस्थास्तरावरील जागांसाठी प्रवेश दिला जाईल.
- NRI/OCI/FN/CIWGC उमेदवारांसाठी यावर्षी प्रवेशासाठी जागा उपलब्ध नाहीत.
महत्त्वाच्या सूचना:
- उमेदवारांनी अर्जात दिलेल्या वर्गाच्या दाव्यांची पूर्तता करण्यासाठी सुसंगत व वैध कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
- जर दावे सिद्ध करणारी कागदपत्रे सादर केली नाहीत, तर उमेदवार सर्वसामान्य प्रवर्गात समाविष्ट केला जाईल.
- ईडब्ल्यूएस (EWS) उमेदवारांनी ३१ मार्च २०२६ पर्यंत वैध असलेले प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे आहे.
अधिक माहिती व अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ: https://poly25.dtemaharashtra.gov.in
महाविद्यालयांना आवाहन तंत्र शिक्षण संचालनालयाने पदविका अभ्यासक्रमांमध्ये १००% प्रवेश सुनिश्चित करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी सर्व महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमांकडे आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे पाटील यांनी सांगितले. दहावी उत्तीर्ण झाल्यावर अभियांत्रिकी, तंत्रज्ञान आणि वास्तुकला यांसारख्या विषयांमध्ये तीन वर्षांच्या पदविका अभ्यासक्रमांमधून विद्यार्थी कुशल तंत्रज्ञ, अभियंता किंवा यशस्वी उद्योजक बनू शकतात.
अधिक माहितीसाठी शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेची सविस्तर माहिती, वेळापत्रक, तसेच नाव नोंदणी आणि अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांनी https://dte.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी, असे आवाहन विभागामार्फत करण्यात आले आहे.