या 3 वर्षांच्या सेवाकाळात कोणती रजा मिळेल? परिवीक्षाधीन कर्मचाऱ्यांच्या रजांबाबत शिक्षण विभागाचे स्पष्टीकरण

Published On: September 29, 2025
Follow Us
Provisional Teacher Leave Rules Circuler

Provisional Teacher Leave Rules Circuler: अस्थायी (परिवीक्षाधीन) ३ वर्षाच्या काळातील शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या रजांबाबत मुंबई विभागीय उपसंचालक कार्यालयाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. याबाबतची सविस्तर माहिती पाहूया.

Provisional Teacher Leave Rules Circuler

मुंबई विभागाचे विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी सर्व मान्यताप्राप्त उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये आणि स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालये यांना एक परिपत्रक (Circular) पाठवले आहे. या पत्राचा मुख्य विषय आहे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या रजेबाबत (Provisional Teacher Leave Rules Circuler) या परिपत्रकात खालील दोन महत्त्वाच्या गोष्टी स्पष्ट करण्यात आल्या आहेत:

परिवीक्षाधीन (Provisional) कर्मचाऱ्यांसाठी रजेचे नियम

जे शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचारी अजूनही परिवीक्षाधीन (Provisional) शिक्षण सेवक आहेत, म्हणजेच ज्यांची सेवा अजून कायम (Permanent) झालेली नाही, त्यांच्यासाठी रजेचे नियम खालीलप्रमाणे स्पष्ट करण्यात आले आहे.

तीन वर्षांचा परिवीक्षा कालावधी: महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) विनियमन अधिनियम, १९७७ नुसार, सहायक शिक्षक म्हणून नेमणूक झालेली प्रत्येक व्यक्ती तीन वर्षांच्या कालावधीसाठी परिविक्षाधीन असेल.

नैमित्तिक (Casual) आणि प्रसूती रजा (Maternity Leave) फक्त: महाराष्ट्र खाजगी शाळा सेवेच्या शर्ती (नियमावली) १९८१ नुसार, अस्थायी (परिवीक्षाधीन) कर्मचाऱ्याला नैमित्तिक रजा (CL) आणि प्रसूती रजा याव्यतिरिक्त अन्य कोणतीही रजा सेवेतून मिळण्याचा हक्क असणार नाही.

कायम झाल्यावर मागील रजा: महत्त्वाचं म्हणजे, जेव्हा अस्थायी कर्मचाऱ्याची स्थायी (Permanent) पदावर नियुक्ती होईल, तेव्हा त्याची मागील सलग सेवा जर स्थायी कर्मचारी म्हणून धरली गेली असती, तर जी रजा मिळण्यास तो पात्र झाला असता, ती रजा मिळण्याचा हक्क त्याला मिळेल. याचा अर्थ, स्थायी झाल्यावर पूर्वीची पात्रता लक्षात घेऊन काही रजांचा लाभ मिळू शकतो!

स्थायी कर्मचाऱ्यांसाठी सर्व रजा लागू!

हा मुद्दा स्थायी कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा आहे. शालेय शिक्षण विभागाने वेळोवेळी जे शासन निर्णय (Government Resolutions) जारी केले आहेत, त्या निर्णयानुसार खाजगी शाळेतील कर्मचाऱ्यांसाठी लागू असलेल्या सर्व रजा लागू राहतील.

यात खालील महत्त्वपूर्ण रजांचा समावेश आहे:

  1. अर्जित रजा (Earned Leave)
  2. वैद्यकीय रजा (Medical Leave)
  3. बालसंगोपन रजा (Child Care Leave – CCL)
  4. इतर विशेष रजा

याचा अर्थ, कायम झालेल्या कर्मचाऱ्यांच्या हक्कांवर कोणताही परिणाम होणार नाही आणि त्यांना शासनाच्या नियमानुसार सर्व रजा मिळणार आहेत. अधिक माहितीसाठी खालील परिपत्रक वाचा.

Provisional Teacher Leave Rules Circuler

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment