RTE Lottery Result 2026 27: राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकातील मुलांसाठी ‘शिक्षण हक्क कायद्या’ (RTE) अंतर्गत होणाऱ्या २५ टक्के राखीव जागांच्या प्रवेश प्रक्रियेचा महत्त्वाचा टप्पा आता जवळ आला आहे. सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी राबविण्यात येत असलेल्या या RTE ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची लॉटरी निकाल दिनांक ६ एप्रिल २०२६ रोजी जाहीर करण्यात आला आहे. लॉटरी निकाल PDF यादी किंवा Application No टाकून निकाल कसा व कोठे चेक करायचा संपूर्ण माहिती पाहूया.
आरटीई २५ टक्के ऑनलाईन प्रवेश लॉटरी निकाल | RTE Admission Lottery Result
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार, दरवर्षीप्रमाणे २५ टक्के प्रवेश प्रक्रिया संपूर्ण राज्यात ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत आहे.
त्यानुसार RTE Lottery Result 2026 27 या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची सोडत (लॉटरी) सोमवार दि. ६ एप्रिल २०२६, रोजी सकाळी ११.०० वाजता महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण) पुणे येथे काढण्यात आला आहे. सदर सोडतीचे थेट प्रक्षेपण युटयुबद्वारे करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे लाईव्ह प्रेक्षपण SCERT YouTube चॅनेल वरून करण्यात आले.
दरवर्षीप्रमाणे ही प्रक्रिया अत्यंत पारदर्शक आणि संगणकीय पद्धतीने राबवली जाणार असून, यामुळे पात्र बालकांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित शाळांमध्ये मोफत प्रवेश मिळण्याचा मार्ग मोकळा होईल
विशेष म्हणजे, या सोडतीचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) करण्याची व्यवस्था देखील प्रशासनाकडून करण्यात आली आहे. जे पालक किंवा नागरिक या कार्यक्रमाला प्रत्यक्ष उपस्थित राहू शकत नाहीत, त्यांना ‘SCERT‘ च्या अधिकृत युट्युब चॅनेलवर हा सोहळा घरबसल्या थेट पाहता येणार आहे. यामुळे लॉटरी काढण्याच्या प्रक्रियेत पूर्णपणे पारदर्शकता राहील आणि पालकांना निकाल पाहण्यासाठी कोणावरही अवलंबून राहावे लागणार नाही.
आरटीई २५ टक्के प्रवेशाची लॉटरी निकाल मोबाईल क्रमांकावर मिळणार
सोडत निघाल्यानंतर ज्या बालकांची निवड होईल, त्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एसएमएसद्वारे (SMS) माहिती दिली जाईल. मात्र, केवळ एसएमएसवर अवलंबून न राहता पालकांनी आरटीई पोर्टलवर जाऊन आपल्या अर्जाची स्थिती तपासणे आवश्यक आहे. निवड झालेल्या बालकांच्या पालकांना त्यानंतर विहित मुदतीत संबंधित शाळेत जाऊन कागदपत्रांची पडताळणी करून आपला प्रवेश निश्चित करावा लागणार आहे.
यंदाच्या वर्षी राज्यभरातून लाखो अर्ज प्राप्त झाले असल्याने या लॉटरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ज्या पालकांनी आपल्या पाल्यांचे अर्ज भरले आहेत, त्यांनी ६ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता लाईव्ह प्रक्षेपणाद्वारे या प्रक्रियेचा भाग व्हावे, असे आवाहन शिक्षण विभागामार्फत करण्यात आले आहे. निवड यादी जाहीर झाल्यानंतर पुढील प्रवेशाचे वेळापत्रक देखील पोर्टलवर प्रसिद्ध केले जाईल.
आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी १ लाखाहून अधिक रिक्त जागा
राज्यातील शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (RTE) होणाऱ्या प्रवेशासाठी यंदा मोठ्या प्रमाणावर अर्ज प्राप्त झाले आहेत. उपलब्ध आकडेवारीनुसार, संपूर्ण महाराष्ट्रात एकूण ८,७०१ शाळांनी या प्रक्रियेत सहभाग नोंदवला असून, त्यामध्ये १,१४,८२६ रिक्त जागा उपलब्ध आहेत. या जागांसाठी राज्यभरातून आतापर्यंत २,८९,५१६ पालकांनी अर्ज केले आहेत, ज्यावरून या प्रवेश प्रक्रियेतील मोठी स्पर्धा दिसून येते.
जिल्हावार विचार केला असता, पुणे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक ९१६ शाळा असून तिथे १८,०६० जागांसाठी ५४,७०७ विक्रमी अर्ज आले आहेत. त्याखालोखाल नागपूर (२५,४१५ अर्ज) आणि ठाणे (२५,०३२ अर्ज) या जिल्ह्यांमध्ये अर्जांची संख्या मोठी आहे. नाशिकमध्ये १७,५६७ तर छत्रपती संभाजीनगरमध्ये १७,२०० अर्ज प्राप्त झाले आहेत. मुंबईचा विचार केल्यास दोन वेगवेगळ्या विभागांत मिळून एकूण ३२५ शाळांमध्ये ६,०२३ जागा उपलब्ध आहेत, ज्यासाठी १०,३९२ हून अधिक अर्ज आले आहेत.

दुसरीकडे, सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजेच अवघे १६७ अर्ज प्राप्त झाले आहेत. गडचिरोली, नंदुरबार आणि रत्नागिरी यांसारख्या जिल्ह्यांमध्येही अर्जांची संख्या इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कमी आहे. अहिल्यानगर, जळगाव, कोल्हापूर आणि लातूर यांसारख्या प्रमुख जिल्ह्यांमध्येही हजारो पालकांनी आपल्या पाल्यांच्या प्रवेशासाठी या पोर्टलवर नोंदणी केली आहे. या आकडेवारीवरून हे स्पष्ट होते की, शहरी भागांत आरटीई प्रवेशासाठी ग्रामीण भागाच्या तुलनेत अधिक ओढा दिसून येत आहे.
अधिक माहितीसाठी: https://student.maharashtra.gov.in/
SCERTMaharashtra YouTube Channel Link : https://www.youtube.com/@SCERTMaharashtra
How to Check Maharashtra RTE Admission Result 2026
Step 1: https://student.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rte_index_new ला भेट द्या.
Step 2: त्यानंतर तिथे Selected मूळ निवड यादी (RTE Lottery Result PDF Download 2026 27)वर क्लिक करून तुमचा जिल्हा निवडा आणि RTE लिस्ट डाउनलोड करा.
किंवा Application Wise Details / अर्जाची स्थिती या टॅब वर Application No. टाका आणि चेक करा

Step 3: लॉगिन करून चेक करण्यासाठी https://student.maharashtra.gov.in/adm_portal/users/login येथे तुमचा अर्ज क्रमांक, जन्मतारीख आवश्यक इतर तपशील प्रविष्ट करा
Step 4: RTE Lottery Result PDF Download 2025 26 निकाल पहा.










