राज्यातील सर्व शाळांना उन्हाळी सुट्टी जाहीर – नवीन शैक्षणिक वर्ष कधी सुरू होणार? शिक्षक व कर्मचाऱ्यांसाठी नवे कामकाज आदेश Summer School Holiday 2025

By MarathiAlert Team

Published on:

Summer School Holiday 2025 राज्यातील विद्यार्थ्यांना, पालकांना आणि शिक्षकांना ज्याची आतुरतेने वाट होती, ती उन्हाळी सुट्टी अखेर जाहीर झाली आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण संचालनालयाने 29 एप्रिल 2025 रोजी यासंदर्भातील अधिकृत परिपत्रक प्रसिद्ध केले आहे.

Summer School Holiday 2025

उन्हाळी सुट्टी कधीपासून?

राज्यातील सर्व राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना शुक्रवार, 2 मे 2025 पासून उन्हाळी सुट्टी लागणार आहे.

काही शाळांना वेगळा निर्णय घेण्याची मुभा

राज्य मंडळाखेरीज इतर बोर्डांच्या शाळा किंवा ज्या शाळांमध्ये महत्त्वाचे शैक्षणिक उपक्रम सुरू आहेत, त्या शाळांनी सुट्टीबाबत निर्णय स्थानिक पातळीवर घ्यावा, असेही परिपत्रकात नमूद आहे.

यंदा एकूण 45 दिवसांची उन्हाळी सुट्टी मिळणार आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी ही सुट्टी आनंदाने घालवावी आणि नव्या शैक्षणिक वर्षाची तयारी करावी!

शाळा पुन्हा कधी सुरू होणार?

  • 30 जून 2025 पासून विदर्भातील शाळाही नेहमीप्रमाणे वेळेनुसार सुरू होतील.
  • विदर्भ वगळता इतर सर्व भागांतील शाळा सोमवार, 16 जून 2025 पासून सुरू होतील.
  • विदर्भातील शाळा तापमान लक्षात घेता 23 जून ते 28 जून दरम्यान सकाळी 7.00 ते 11.45 या वेळेत सुरू होतील.

उन्हाळी सुट्टीतील कामकाजाबाबत शिक्षण संचालनालय कार्यालयाकडून सूचना जाहीर

माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या उन्हाळी सुट्टीतील कामकाजाबाबत शिक्षण संचालनालय कार्यालयाकडून दिनांक 28 एप्रिल 2025 रोजी परिपत्रक काढण्यात आले आहे.

माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक, लिपिक व इतर शिक्षकेत्तर कर्मचारी यांना उन्हाळी सुट्टीत खालील कामकाजासाठी शालेय कार्यालयात उपस्थित राहणं आवश्यक असल्याचे परिपत्राकात म्हंटले आहे.

  • ११ वी ऑनलाईन कामकाज.
  • आधार / अपार आयडी कामकाज.
  • स्कूल मॅपिंग कामकाज.
  • संचमान्यता दुरुस्ती व इतर अनुगिक महत्वाचे कामकाज.

वरील सर्व कामकाज करणेसाठी उन्हाळी सुट्टीत शाळेतील मुख्याध्यापक, लिपिक व इतर शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी शाळेत उपस्थित राहून कामकाज करणेबाबत आदेशित करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत.

अधिक माहितीसाठी : परिपत्रक | परिपत्रक येथे पाहा

Summer School letter
school holiday rules
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Read more

Leave a Comment

error: Content is protected !!