अंगणवाडी सेविकांची मेहनत आणि ‘लाडकी बहीण’ योजनेचे यश – महिला व बालविकास विभाग ठरला सर्वोत्तम! 100 Days Programme Maharashtra Report

Published On: May 2, 2025
Follow Us
100 Days Programme Maharashtra Report

100 Days Programme Maharashtra Report मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून राबवलेल्या 100 दिवसांच्या अभियानात महिला व बालविकास विभागाने सर्वोत्तम कामगिरी करून महाराष्ट्र शासनातील ‘सर्वोत्तम विभाग’ म्हणून मान्यता मिळवली आहे. ही माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. त्या म्हणाल्या की, “या यशामागे महाराष्ट्रातील प्रत्येक अंगणवाडी सेविका, लाडकी बहीण व इतर योजनेतील लाभार्थी, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे समर्पित योगदान आहे.” राज्य शासनाने 100 दिवसांचा कार्यक्रम विभागनिहाय सविस्तर प्रगती अहवाल www.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाहीर केला आहे. सविस्तर जाणून घ्या.

काय आहे 100 दिवसांचा कार्यक्रम?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासन-प्रशासन आणि नागरिकांमधील विश्वास वाढावा यासाठी 100 दिवसांचा कार्यक्षमतेचा कार्यक्रम सुरू केला. या मोहिमेचा पहिला टप्पा संपल्यावर, विविध मंत्रालयांच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्यात आले.

10 महत्त्वाच्या निकषांवर मूल्यांकन

भारतीय गुणवत्ता परिषदेमार्फत खालील निकषांवर मूल्यांकन झाले:

  • कार्यालयीन सोयी-सुविधा
  • नागरिकांसाठी सेवा-सुलभता
  • वेबसाईट कार्यक्षमता
  • तक्रार निवारण प्रणाली
  • गुंतवणूक अनुकूलता
  • तंत्रज्ञानाचा वापर
  • माहितीचा अधिकार
  • सेवा वितरण
  • स्वच्छता
  • कार्यसंस्कृती

महिला व बालविकास विभागाने यामध्ये 80 टक्के गुण मिळवून सर्वोत्तम विभाग म्हणून स्थान मिळवले.

100 Days Programme Maharashtra Report – सविस्तर अहवाल

राज्यात नवीन महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर शासनाच्या सर्व 48 विभागांनी 100 दिवसांचा धोरणात्मक बाबींचा कार्यक्रम हाती घेऊन महत्त्वाची नवीन धोरणे, दूरगामी निर्णय व लोकाभिमुख उपक्रमांची आखणी सुरू केली.

गेल्या 100 दिवसात या सर्व विभागांनी निश्चित केलेल्या 902 धोरणात्मक उद्दिष्टांपैकी 706 उद्दिष्टे (78%) पूर्णतः साध्य केली आहेत तर उर्वरित 196 उद्दिष्टे पूर्ण होईपर्यंत संबंधित विभाग आपले काम चालूच ठेवतील.

एकूण 48 विभागांपैकी 12 विभागांनी आपली 100% उद्दिष्ट पूर्तता केली आहे तर आणखी 18 विभागांनी 80% पेक्षा जास्त उद्दिष्टे साध्य केली आहेत.

उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कार्यालय, अधिकारी यादी

या मूल्यमापनात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कार्यालय, अधिकारी यादी पुढीलप्रमाणे, कंसात टक्केवारी दिली आहे.

सर्वोत्तम जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी

ठाणे (९२.००), नागपूर (७५.८३), नाशिक (७४.७३), पुणे (७४.६७), वाशिम (७२.००)

सर्वोत्तम महापालिका आयुक्त

उल्हासनगर (६५.२१), पिंपरी-चिंचवड (६५.१३), पनवेल (६४.७३), नवी मुंबई (६४.५७)

सर्वोत्तम पोलिस आयुक्त

मीरा भाईंदर (६८.४९), ठाणे (६५.४९), मुंबई रेल्वे (६३.४५)

सर्वोत्तम विभागीय आयुक्त

कोकण (७५.४३), नाशिक (६२.२१), नागपूर (६२.१९)

सर्वोत्तम पोलिस परिक्षेत्र महानिरीक्षक/उपमहानिरीक्षक

कोकण (७८.६८), नांदेड (६९.८७)

सर्वोत्तम मंत्रालयीन विभाग

महिला व बाल विकास (८०.००),  सार्वजनिक बांधकाम विभाग (७७.९४), कृषी (६६.५४), ग्रामविकास (६३.५८), परिवहन व बंदरे (६२.२६)

सर्वोत्तम आयुक्त / संचालक

संचालक, तंत्र शिक्षण (७७.१३), आयुक्त, जमाबंदी (७२.६६), आदिवासी विकास (७२.४९), राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (७०.२८), वैद्यकीय शिक्षण (६८.५३)

सर्वोत्तम जिल्हाधिकारी

चंद्रपूर (६८.२९), कोल्हापूर (६२.४५), जळगाव (६०.६५), अकोला (६०.५८), नांदेड (५६.६६)

सर्वोत्तम पोलिस अधीक्षक

पालघर (७०.२१), जळगाव (६०.००), नागपूर ग्रामीण (६०.००), गोंदिया (५६.४९), सोलापूर ग्रामीण (५६.००)

या यादीत चंद्रपूर, ठाणे, पुणे, उल्हासनगर, मीरा भाईंदर, पालघर, गोंदिया, नांदेड, कोल्हापूर, अकोला यांसारख्या जिल्ह्यांतील कार्यालयांनी लक्षणीय गुण मिळवत इतरांसमोर उत्तम आदर्श ठेवला आहे.

100 days programme maharashtra report 2025
100 days programme maharashtra report

या परिवर्तनशील व सर्वंकष विकासाच्या वाटचालीच्या मोहिमेत सर्व विभागांनी केलेल्या अतिशय प्रभावी कामगिरीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून, त्यांनी भविष्यात सुद्धा अशीच चांगली कामगिरी करावी, यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा दिल्या.

100 Days Programme Maharashtra Report अधिक माहितीसाठी : 100 दिवस कार्यक्रमाचे अहवाल येथे पाहा

महिला व बालविकास विभाग ठरला सर्वोत्तम!

अंगणवाडी सेवांमध्ये मोठी सुधारणा

या यशामध्ये एकात्मिक बाल विकास सेवा योजना (ICDS) आणि महिला व बालविकास विभागाच्या पुढील प्रयत्नांचा मोलाचा वाटा आहे:

केलेले महत्त्वाचे बदल

  • 13,011 मिनी अंगणवाड्यांचे अपग्रेडेशन
  • 9,664 अंगणवाड्यांना शौचालयांची सुविधा
  • 17,254 केंद्रांमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय
  • 13,595 केंद्रांचे ‘सक्षम अंगणवाडीत’ रूपांतर
  • 537 बालकांची कायदेशीर दत्तक प्रक्रिया – देशात प्रथम
  • 37,000 सेविकांना ‘पोषण भी, पढाई भी’ आणि FSSAI प्रशिक्षण
  • 10 नवीन One Stop Centre ला मान्यता

देशपातळीवरील मान्यता

महिला व बालविकास विभागाच्या कामगिरीमुळे:

  • पोषण पंधरवाडा अभियानात महाराष्ट्राला देशात पहिला क्रमांक मिळाला.
  • दत्तक प्रक्रियेतील उत्कृष्टतेसाठी देशात अग्रक्रम प्राप्त.

नाविन्यपूर्ण उपक्रम

मंत्रालयाने काही नवीन आणि प्रभावी योजना सुरू केल्या, जसे की:

  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना – लोकप्रिय आणि महिलांसाठी लाभदायक ठरणारी योजना यशस्वी झाली.
  • UCDC आणि महिला व बालविकास भवन – महिला सक्षमीकरणासाठी केंद्र
  • महिला बचतगटांना आर्थिक मदत आणि प्रशिक्षण

परिवर्तनशील व सर्वंकष विकासाच्या वाटचालीच्या मोहिमेत महाराष्ट्रातील प्रत्येक अंगणवाडी सेविका, प्रत्येक लाभार्थी आणि प्रत्येक कर्मचाऱ्याची कर्तव्यनिष्ठा आहे. सर्व सहकारी, महिला व बालविकास विभागाच्या राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे आयुक्त कैलास पगारे, महिला व बाल विकास आयुक्त नयना गुंडे, जिल्हा प्रशासन आणि महिला व बालविकास विभागाचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांच्या योगदानाने हे उद्दिष्ट गाठता आले असल्याचे महिला व बालविकास मंत्री तटकरे यांनी सांगितले.

महिला व बालविकास विभागाने केवळ आकडे नव्हे, तर प्रत्यक्ष सेवा सुधारून हजारो कुटुंबांचे जीवन बदलले आहे. हे यश ‘टीमवर्क’ आणि ‘जनसेवा’ याचे मूर्त उदाहरण आहे. शासनाच्या पुढील योजनांमध्ये देखील विभागाची भूमिकाही अधिक प्रभावी राहणार आहे.

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Posts

aasha gatparvartak meeting 2026

राज्यातील आशा गटप्रवर्तकांच्या विविध प्रश्नांबाबत बैठक संपन्न; बैठकीतील ठळक मुद्दे

August 12, 2026
anganwadi sevika salary july 2026

अंगणवाडी सेविका व मदतनीस जुलै 2026 चे मानधन व प्रोत्साहन भत्ता मंजूर, शासन निर्णय जारी

July 28, 2026
aarogya vibhag aadhava

आशा स्वयंसेविकांच्या कार्याचे विशेष कौतुक; आरोग्य विभागाची विभागीय आढावा बैठक संपन्न

July 25, 2026
asha-workers-online-data-entry-clarification

आशा स्वयंसेविका व इतर आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या ऑनलाईन कामाबाबत विधानसभेत महत्वाचे स्पष्टीकरण

July 8, 2026
anganwadi-sevika-promotion-age-limit-gr

अंगणवाडी सेविकांसाठी मोठा निर्णय! मुख्यसेविका पदोन्नतीसाठी वयोमर्यादेत बदल; नवीन शासन निर्णय जारी

July 3, 2026
panvel-viral-video-truth-anganwadi-sevika

त्या व्हायरल व्हिडिओ मधील अंगणवाडी सेविकांबाबत महिला व बालविकास विभागाचा मोठा खुलासा

June 27, 2026

Leave a Comment