NEET Exam Notice 2025 : NEET (UG) परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा!

Published On: May 3, 2025
Follow Us
NEET Exam Notice 2025

NEET Exam Notice 2025 राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा NEET (UG) 2025 साठी प्रवेशपत्र (Admit Card) आता अधिकृत वेबसाईटवर जाहीर करण्यात आले आहे. National Testing Agency (NTA) कडून ही परीक्षा 4 मे 2025 (रविवार) रोजी दुपारी 2:00 ते 5:00 दरम्यान घेण्यात येणार आहे. त्यानुषंगाने, रेल्वे प्रशासनाने 4 मे 2025 रोजी सेंट्रल, हार्बर व वेस्टर्न रेल्वे या तीन मार्गांवर कोणताही Mega Block नसल्याचे कळविलेले आहे.

NEET परीक्षेच्या पार्श्वभूमीवर 4 मे रोजी मेगा ब्लॉक नाही

राष्ट्रीय परिक्षा एजेंसी, नवी दिल्ली यांचेमार्फत रविवारी दि. 4 मे 2025 रोजी National Eligibility cum Entrance Test (UG) – 2025 ही परिक्षा आयोजित करण्यात आलेली आहे. या परीक्षेसाठी मोठ्या संख्येने उमेदवार मुंबईच्या बाहेरील भागातील आहेत आणि त्यांना त्यांच्या परिक्षा केंद्रावर विना अडथळा पोहोचण्यासाठी जिल्हा प्रशासन, मुंबई शहर यांनी रेल्वे प्रशासनास रविवार दि. 4 मे 2025 रोजी कोणताही Mega Block ठेऊ नये असे कळविले होते.

त्यानुषंगाने, रेल्वे प्रशासनाने दि. 4 मे 2025 रोजी सेंट्रल, हार्बर व वेस्टर्न रेल्वे या तीन मार्गांवर कोणताही Mega Block नसल्याचे कळविलेले आहे. तरी यांची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे निवासी उपजिल्हाधिकारी मुंबई शहर यांनी कळविले आहे.

MHT CET 2025 PCM Group Re Examination Eligible Candidates List Download

NEET Exam 2025 Admit Card कसे डाऊनलोड करावे?

उमेदवारांना 30 एप्रिल 2025 पासून https://neet.nta.nic.in/ या अधिकृत वेबसाईटवर प्रवेशपत्र (Admit Card) उपलब्ध झाले आहे.

लॉगिन करताना आवश्यक तपशील:

  • अर्ज क्रमांक (Application Number)
  • पासवर्ड (Password)
  • Captcha Code
NEET Exam 2025 Hall Ticket Download Here Direct Link

प्रवेशपत्रात काय माहिती आहे?

  • परीक्षेचे केंद्र (Exam Centre)
  • परीक्षेची वेळ आणि दिनांक
  • उमेदवाराचे तपशील
  • महत्त्वाच्या सूचना

उमेदवारांनी प्रवेशपत्रावरील सर्व सूचना आणि Information Bulletin मधील माहिती नीट वाचावी.

NEET Exam 2025 Hall Ticket Download Here Direct Link

अधिकृत वेबसाईटसाठी भेट द्या:

उमेदवारांनी परीक्षेला नियोजित वेळेआधी केंद्रावर हजर राहावे आणि ओळखपत्र, प्रवेशपत्र इत्यादी आवश्यक कागदपत्रे सोबत आणावीत.

NEET (UG) 2025 साठी सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा!

NEET Exam 2025  Notice

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Posts

pa-system-for-schools

मोठा निर्णय! राज्यातील 16 हजार शाळांमध्ये बसणार स्पीकर सेट PA सिस्टीम; शासन निर्णय निर्गमित

July 29, 2026
MBBS internship latest news Maharashtra

एमबीबीएस विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! एक वर्षाची सामाजिक दायित्व सेवा सक्ती रद्द; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

July 26, 2026
Pavitra Portal shikshak bharti

पवित्र पोर्टल शिक्षक भरतीच्या कार्यपद्धतीत सुधारणा; शासन निर्णय निर्गमित (24 जुलै 2026)

July 25, 2026
samagra-shiksha-funds-increase

‘समग्र शिक्षा’च्या निधीत वाढ करण्यात यावी; केंद्रीय परिषदेत शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांची मागणी

July 23, 2026
PM YASASVI Scholarship 2026

पीएम-यशस्वी शिष्यवृत्ती योजना 2026-27: ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन; या पात्र विद्यार्थ्यांना 1.25 लाखांपर्यंत आर्थिक मदत

July 22, 2026
kendra stariy shikshan parishad

केंद्रस्तरीय शिक्षण परिषद 2026-27: जुलै विषय सूची, सुधारित मार्गदर्शिका PDF डाउनलोड

July 20, 2026

Leave a Comment