Swadhar Yojana 2025 26 : उच्च शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना काही मर्यादित जागांमुळे शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळत नाही, यासाठी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण (Higher Education) घेता यावे यासाठी सामाजिक न्याय विभागा मार्फेत Dr Babasaheb Ambedkar Swadhar Yojana सुरु करण्यात आली आहे. या योजनेतून जिल्ह्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा स्वत: उपलब्ध करून घेण्यासाठी व सोबतच शैक्षणिक साहित्यासाठी अर्थसहाय्य दिले जाते. या सरकारी योजनेची सविस्तर माहिती पाहूया.
Table of Contents
स्वाधार योजना नेमकी काय आहे?
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना (Dr Babasaheb Ambedkar Swadhar Yojana) ही जिल्ह्याच्या ठिकाणी इयत्ता 10 वी व 12 वी नंतरच्या व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या परंतु सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश (Hostel Management) न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी आहे. या योजनेत भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा स्वत: उपलब्ध करून घेण्यासाठी त्यांचे आधार क्रमांक संलग्न असलेल्या बँक खात्यात थेट रक्कम वितरित करण्यात येते.
महिला दिन विशेष: महाराष्ट्र सरकारचे महिलांसाठी ‘5’ मोठे निर्णय!
स्वाधार योजनेच्या शिष्यवृत्तीची रक्कम किती आहे? Swadhar Yojana Scholarship Amount
स्वाधार योजनेच्या पात्र अनु.जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांना रु. 51000/– हजार दोन हप्त्यांमध्ये दिले जातात. (भारत सरकार शिष्यवृत्ती अंतर्गत मिळणारा निर्वाह भत्ता वजा करुन) या व्यतिरिक्त वैद्यकिय व अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना रु. 5000/- व इतर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना रु. 2000/- शैक्षणिक साहित्यासाठी दिले जातात. सदरचा लाभ हा आधार क्रमांक संलग्न असलेल्या बँक खात्यात थेट रक्कम (Swadhar Yojana Scholarship Amount) जमा केली जाते.
महाराष्ट्रातील शाळांमध्ये सीबीएसईसारखा अभ्यासक्रम – शैक्षणिक वर्ष आणि अभ्यासक्रमात मोठा बदल!
स्वाधार योजनेच्या अटी व शर्ती
- विद्यार्थी अनु. जाती व नवबौद्ध प्रवर्गातील असावा
- विद्यार्थी ग्रामीण भागातील रहिवासी असावा.
- विद्यार्थी स्थानिक रहिवासी नसावा.
- विद्यार्थ्यांने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या ठिकाणी आहे, अशा ठिकाणचा तो रहिवासी नसावा.
- महानगरपालिकेच्या हद्दीपासून 05 किमी. पर्यंतच्या शैक्षणिक संस्थेत प्रवेशित असावा.
- विद्यार्थी इयत्ता 11 वी व 12 वी आणि त्यानंतरचे उच्च शिक्षण (Higher Education) घेणारा असावा.
- इयत्ता 11 वी नंतर पदविका, पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणारा अभ्यासक्रम हा दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीचा नसावा.
- इयत्ता 11 वी मध्ये विद्यार्थ्यास किमान 50 % (उत्तीर्ण) गुण असावेत./
- या योजनेमध्ये अनु. जाती व नवबौद्ध दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीची टक्केवारी 40 % इतकी असेल.
आरटीई 25% प्रवेशासाठी मुदतवाढ! ‘या’ तारखेपर्यंत पर्यंत प्रवेश निश्चित करा – महत्त्वाच्या सूचना
मान्यताप्राप्त महाविद्यालय व मान्यताप्राप्त अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला असावा. विद्यार्थ्यांची निवड गुणवत्तेनुसार करण्यात येते. निवडलेला विद्यार्थी संबंधित अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत लाभास पात्र राहतो. या योजनेमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी 3 टक्के आरक्षण आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तेची किमान टक्केवारी 40 टक्के इतकी आहे.
मुलींच्या मोफत शिक्षणाचा अधिकृत शासन निर्णय जाहीर
स्वाधार योजनेसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत? Swadhar Yojana Documents List In Marathi
स्वाधार योजनेसाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत.
- मार्कशीट
- जातीचा दाखला
- रहिवासी दाखला
- आधार कार्ड
- विद्यार्थ्यांचा आधार क्रमांक बॅंक खात्याशी संलग्न असावा.
CBSE चा मोठा निर्णय! दहावी बोर्ड परीक्षा आता दोनदा!
स्वाधार योजना फॉर्म – अर्ज कुठे करावा? | Swadhar Yojana Form
विद्यार्थी ज्या जिल्ह्यामध्ये शिक्षण घेत आहे, त्या जिल्ह्याच्या सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांच्याकडे योजनेसाठी अर्ज करावा लागतो. विद्यार्थ्यांची महाविद्यालय, शालेय उपस्थिती 75 टक्के असणे आवश्यक आहे.
स्वाधार योजना फॉर्म – अर्जSwadhar Yojana Official Websiteअधिक माहितीसाठी संपर्क : संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण. (https://syl.mahasamajkalyan.in/)
MHT CET 2025 : प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करण्याची अंतिम संधी!
निष्कर्ष
स्वाधार योजना 2025-26 ही उच्च शिक्षण घेणाऱ्या परंतु शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची योजना आहे. सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना भोजन, निवास व शैक्षणिक साहित्याकरिता आर्थिक मदत दिली जाते. (Swadhar Yojana 2025 26)
योजनेत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील पात्र विद्यार्थ्यांना वार्षिक ₹51,000 ची शिष्यवृत्ती मिळते, जी थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. वैद्यकीय व अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना अतिरिक्त ₹5,000 तर इतर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना ₹2,000 शैक्षणिक साहित्याकरिता दिले जातात. अधिक माहितीसाठी विद्यार्थी अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात किंवा महाविद्यालयाच्या प्राचार्य व समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधू शकतात.