YCMOU Admission Date Extend 2025: यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ

Published On: September 18, 2025
Follow Us
YCMOU Admission Date Extend 2025

YCMOU Admission Date Extend 2025: यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या जुलै २०२५ सत्रासाठी प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ. जाणून घ्या अर्ज करण्याची नवीन अंतिम तारीख आणि इतर महत्त्वाची माहिती.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने (YCMOU) जुलै २०२५ सत्रातील विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ दिली आहे. कृषी शिक्षणक्रम, बी.एड. (सेवांतर्गत), आणि बी.एड. (विशेष) या अभ्यासक्रमांव्यतिरिक्त इतर सर्व अभ्यासक्रमांसाठी ही मुदत वाढवण्यात आली आहे. यामुळे ज्या विद्यार्थ्यांना आतापर्यंत प्रवेश घेता आला नाही, त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

विद्यापीठाने जाहीर केलेल्या नव्या वेळापत्रकानुसार, ऑनलाइन प्रवेश अर्ज भरण्याची आणि शुल्क जमा करण्याची अंतिम तारीख आता

30 सप्टेंबर 2025 15 ऑक्टोबर पर्यंत वाढवण्यात आली आहे. विद्यार्थी रात्री ११.५९ वाजेपर्यंत अर्ज सादर करू शकतात.

माहितीपुस्तिका व ऑनलाईन अर्ज डायरेक्ट लिंक

प्रवेशासाठी महत्त्वाची माहिती:

  • अंतिम तारीख: ऑनलाइन अर्ज भरण्याची आणि शुल्क भरण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर 2025 आहे.
  • अर्ज प्रक्रिया: प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी ycmou.digitaluniversity.ac या विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. होमपेजवर ‘Admission’ टॅबमध्ये ‘Prospectus’ (माहितीपुस्तिका) उपलब्ध आहेत, ज्यात विविध अभ्यासक्रमांची माहिती दिली आहे.
  • अर्ज सादर करणे: विद्यार्थ्यांनी विहित मुदतीत ऑनलाइन पद्धतीने अचूक आणि पूर्ण भरलेला प्रवेश अर्ज तसेच प्रवेश शुल्क ऑनलाइन भरावे. यामुळे प्रवेश निश्चित होईल.

तांत्रिक अडचणींसाठी संपर्क:

अर्ज भरताना किंवा शुल्क जमा करताना काही तांत्रिक अडचण आल्यास, विद्यार्थी विद्यापीठाच्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधू शकतात.

हेल्पलाईन क्रमांक (सकाळी १०.३० ते सायंकाळी ५.३०):

  • ०२५३-२२३०५८०, २२३०१०६, २२३०७१४, २२३१७१५
  • मोबाईल क्रमांक: ९३०७५७९८७४, ९३०७५६७११८२, ९२७२०४६७२५

टीप: रविवार, सार्वजनिक सुट्ट्या तसेच महिन्यातील पहिला आणि तिसरा शनिवार वगळून इतर दिवशी या क्रमांकांवर संपर्क साधावा.

ज्या विद्यार्थ्यांना यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात प्रवेश घ्यायचा आहे, त्यांनी लवकरात लवकर अर्ज करून या संधीचा फायदा घ्यावा. ही वाढलेली मुदत प्रवेशाची शेवटची संधी असू शकते. त्यामुळे वेळेवर अर्ज करणे महत्त्वाचे आहे.

माहितीपुस्तिका व ऑनलाईन अर्ज डायरेक्ट लिंक

अधिक माहितीसाठी : https://ycmou.digitaluniversity.ac/

Ycmou Admission Date Extended
YCMOU Admission Date Extend 2025

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Posts

JNV Admission 2026

नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाईन फॉर्म सुरू, डायरेक्ट लिंक

July 31, 2026
pa-system-for-schools

मोठा निर्णय! राज्यातील 16 हजार शाळांमध्ये बसणार स्पीकर सेट PA सिस्टीम; शासन निर्णय निर्गमित

July 29, 2026
MBBS internship latest news Maharashtra

एमबीबीएस विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! एक वर्षाची सामाजिक दायित्व सेवा सक्ती रद्द; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

July 26, 2026
Pavitra Portal shikshak bharti

पवित्र पोर्टल शिक्षक भरतीच्या कार्यपद्धतीत सुधारणा; शासन निर्णय निर्गमित (24 जुलै 2026)

July 25, 2026
samagra-shiksha-funds-increase

‘समग्र शिक्षा’च्या निधीत वाढ करण्यात यावी; केंद्रीय परिषदेत शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांची मागणी

July 23, 2026
PM YASASVI Scholarship 2026

पीएम-यशस्वी शिष्यवृत्ती योजना 2026-27: ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन; या पात्र विद्यार्थ्यांना 1.25 लाखांपर्यंत आर्थिक मदत

July 22, 2026

Leave a Comment