12th Class Results alert announcement: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्यातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता १२ वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. राज्यातील नऊ विभागीय मंडळांचा (पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण) निकाल उद्या शनिवार, २ मे २०२६ रोजी जाहीर होणार आहे.
शिक्षण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांनी दिलेली ही परीक्षा आता निकालाच्या उंबरठ्यावर असून, बोर्डाच्या विहित कार्यपद्धतीनुसार ऑनलाइन पद्धतीने हा निकाल दुपारी १:०० वाजता प्रसिद्ध केला जाईल.
Maharashtra Board HSC 12th Result 2026 LIVE
12th Class Results Coming Soon : निकाल पाहण्यासाठी अधिकृत वेबसाइट
विद्यार्थी आणि पालकांना खालीलपैकी कोणत्याही अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपला निकाल पाहता येईल:
३. https://results.digilocker.gov.in
४. https://results.navneet.com
५. https://results.targetpublications.org
७. https://education.indianexpress.com/boards-exam/maharashtra-hsc-12-results
असा तपासा तुमचा बारावीचा निकाल डायरेक्ट लिंक
निकाल पाहण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी ठेवण्यात आली आहे. सर्वात आधी तुम्हाला https://mahahsscboard.in/ किंवा hscresult.mkcl.org या वेबसाइटला भेट द्यावी लागेल. तसेच तुम्ही 12th निकाल https://www.digilocker.gov.in/ व https://results.digilocker.gov.in/ या वेबसाईट वर देखील पाहू शकता.
तिथे गेल्यावर ‘Results’ या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर विचारलेल्या रकान्यात तुमचा सीट नंबर (Roll Number) आणि आईचे नाव अचूक भरा. ‘View Result’ या बटणावर क्लिक करताच तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल. भविष्यातील उपयोगासाठी या निकालाची प्रिंट किंवा डिजिटल प्रत जतन करून ठेवणे सोयीचे ठरेल.








