6th Pay Commission Arrears महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ मर्यादित, नागपूर येथील १९५ कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक अपडेट आहे. १ एप्रिल २००६ ते २५ नोव्हेंबर २०१४ या कालावधीतील ६ व्या वेतन आयोगाची थकबाकी म्हणून ₹११,९०,६९,४६३/- (अकरा कोटी नव्वद लाख एकोणसत्तर हजार चारशे त्रेसष्ट रुपये) इतकी रक्कम देण्यास महाराष्ट्र शासनाने मान्यता दिली आहे. सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने दि ९ जून २०२५ रोजी यासंदर्भात शासन निर्णय जारी केला आहे.
6th Pay Commission Arrears
6th Pay Commission Arrears गेल्या काही काळापासून प्रलंबित असलेल्या या मागणीवर शासनाने मानवतेच्या दृष्टीकोनातून विशेष बाब म्हणून विचार केला आहे. उपमुख्यमंत्री (गृह) यांच्या अध्यक्षतेखाली ९ जुलै २०२४ रोजी झालेल्या बैठकीत यावर चर्चा झाली होती, ज्यात उपमुख्यमंत्री महोदयांनी कर्मचाऱ्यांना थकबाकी देण्याबाबत निर्देश दिले होते.
यानंतर, वस्त्रोद्योग आयुक्तालयाने, नागपूरने २८ ऑगस्ट २०२४, ५ सप्टेंबर २०२४ आणि १३ जानेवारी २०२५ रोजी पत्रव्यवहार करून याबाबतचा प्रस्ताव सादर केला होता. २७ मे २०२५ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या प्रस्तावाला अंतिम मान्यता देण्यात आली. यामुळे महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाच्या १९५ कर्मचाऱ्यांना त्यांच्या ६ व्या वेतन आयोगाची थकबाकी मिळणार आहे.
या थकबाकीच्या वितरणासाठी नवीन लेखाशीर्ष तयार करून वित्त विभागाकडून निधी उपलब्ध करून देण्याबाबत स्वतंत्रपणे कार्यवाही केली जाणार आहे. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
अधिक माहितीसाठी : शासन निर्णय डाउनलोड करा