Samagra Shiksha Employee Salary Increase GR : महाराष्ट्रातील समग्र शिक्षा (Samagra Shiksha) अंतर्गत करार पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा मिळाला आहे. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या त्यांच्या मानधनातील वाढीला अखेर राज्य सरकारने हिरवा कंदील दाखवला असून, दीपावलीच्या आधीच या कर्मचाऱ्यांना मोठे गिफ्ट मिळाले आहे. या कर्मचाऱ्यांच्या १०% वाढीसाठी १९ कोटींहून अधिक निधी वितरित करण्यात आला आहे. याबाबतचा शासन निर्णय दिनांक ३० सप्टेंबर २०२५ रोजी निर्गमित करण्यात आला आहे.
Samagra Shiksha Employee Salary Increase GR
समग्र शिक्षा ही योजना पूर्वीच्या सर्व शिक्षा अभियान, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान आणि शिक्षक शिक्षण या तीन महत्त्वाच्या योजनांचे एकत्रित रूप आहे. ही योजना १ एप्रिल २०११ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीसाठी पुढे सुरू ठेवण्यात आली आहे. या योजनेतील कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या पगारात झालेली १० टक्के वाढीचा शासन निर्णय आला असून, ६ महिन्याचा फरक कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
कर्मचाऱ्यांच्या मानधनात 10 टक्के वाढ करण्याचा निर्णय!
या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधन वाढीच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मान्यता दिलेली नाही. त्यामुळे, कर्मचाऱ्यांवर कायमस्वरूपी आर्थिक दायित्व (Permanent Financial Liability) येऊ नये, या दृष्टीने हा वाढीव खर्च महाराष्ट्र शासनाला स्वतःच्या हिश्शातून करावा लागत आहे. यापूर्वी, १८ सप्टेंबर २०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये कर्मचाऱ्यांच्या मानधनात १० टक्के वाढ करण्यास तत्वतः मान्यता देण्यात आली होती. आता ३० सप्टेंबर २०२५ रोजी Samagra Shiksha Employee Salary Increase GR काढून निधी वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
किती कर्मचाऱ्यांना मिळणार थेट लाभ?
सध्या समग्र शिक्षा अंतर्गत व्यवस्थापन आणि कार्यक्रमांतर्गत करार पद्धतीने सुमारे ५५३० कर्मचारी कार्यरत आहेत. या निर्णयामुळे या सर्व ५,५३० कर्मचाऱ्यांना त्यांच्या मानधनातील १०% वाढीचा फरक थेट त्यांच्या खात्यात मिळणार आहे. Samagra Shiksha Employee Salary Increase GR मध्ये या सर्व कर्मचाऱ्यांच्या यादीचा उल्लेख नाही, परंतु निधीची तरतूद याच कर्मचाऱ्यांसाठी करण्यात आली आहे.
पगारात कितीने होणार वाढ?
सध्या राज्यामध्ये समग्र शिक्षा अंतर्गत राज्य स्तर ते जिल्हा, तालुका, केंद्र स्तरावर कार्यरत असणारया कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या मासिक वेतनात १० टक्के वाढ मिळणार असून, एप्रिल २०२५ पासून ते सप्टेंबर २०२५ पर्यंत चे ६ महिन्याचे फरक कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.
पगार वाढ कॅल्क्युलेटर
सध्याचा पगार टाका आणि “गणना करा” बटण दाबा. तुम्हाला ५%, १०% आणि २०% वाढीनंतरचा नवा पगार (मासिक) आणि १०% वाढसाठी ६ महिन्याचा फरक दाखवला जाईल.
| वर्णन | रक्कम (₹) |
|---|---|
| सध्याचा मासिक पगार | – |
| ५% वाढ — वाढलेली रक्कम (मासिक) | – |
| ५% वाढ — एकूण पगार (मासिक) | – |
| १०% वाढ — वाढलेली रक्कम (मासिक) | – |
| १०% वाढ — एकूण पगार (मासिक) | – |
| २०% वाढ — वाढलेली रक्कम (मासिक) | – |
| २०% वाढ — एकूण पगार (मासिक) | – |
| १०% वाढ — मासिक फरक | – |
| १०% वाढ — ६ महिन्यांचा फरक (₹) | – |
नवीन गणना करण्यासाठी पगार बदलून पुन्हा “गणना करा” दाबा.
या कालावधीसाठी 10 टक्के वाढीचा निधी वितरित
Samagra Shiksha Employee Salary Increase GR (शासन निर्णय) नुसार, कर्मचाऱ्यांच्या मानधनात झालेल्या १० टक्के वाढीची रक्कम देण्यासाठी एकूण ₹१९,८२,९७,६००/- (एकोणीस कोटी ब्याऐंशी लक्ष सत्याण्णव हजार सहाशे फक्त) इतका मोठा निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. हा निधी एप्रिल २०२५ ते मार्च २०२६ या १२ महिन्यांच्या कालावधीसाठी आहे.
निधी वितरणाची प्रशासकीय प्रक्रिया
वितरित करण्यात आलेला हा ₹१९ कोटींहून अधिक निधी ‘महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई’ यांच्या राज्य प्रकल्प संचालकांकडे सोपवला जाईल. हा खर्च ‘समग्र शिक्षा अभियान (सर्वसाधारण) (राज्य हिस्सा ४० टक्के)’ या अर्थसंकल्पीय तरतुदीतून केला जाईल. अवर सचिव (महाराष्ट्र शासन) हे आहरण व संवितरण अधिकारी (DDO) म्हणून काम पाहतील आणि निधी कोषागारातून (Treasury) काढून समग्र शिक्षा योजनेच्या SNA खात्यात (Single Nodal Agency Account) जमा केला जाईल. या त्वरित वितरणाने, Samagra Shiksha Employee Salary Increase GR ची अंमलबजावणी वेगाने होईल, अशी अपेक्षा आहे.
अधिक माहितीसाठी: शासन निर्णय वाचा




