महा-टीईटी परीक्षा सुरळीत; Maha TET Exam Answer Key अधिकृत येथे डाउनलोड करा

Published On: December 19, 2025
Follow Us
Maha TET Exam Answer Key

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे आयोजित करण्यात आलेली महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (महा-टीईटी) २०२५ रविवार, २३ नोव्हेंबर रोजी राज्यभरातील ३७ जिल्हा मुख्यालयांवर अत्यंत सुरळीत आणि यशस्वीपणे पार पडली. ही परीक्षा पार पाडण्यासाठी राज्यभरात एकूण १,४२३ परीक्षा केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती. आता या परीक्षेची अंतरिम उत्तरसूची जाहीर करण्यात आली आहे.

महा-टीईटी परीक्षा सुरळीत; ९३.९१ टक्के उपस्थिती

या महत्त्वाकांक्षी परीक्षेसाठी एकूण ४,७५,६६९ परीक्षार्थींनी नोंदणी केली होती. त्यापैकी ४,४६,७३० म्हणजेच ९३.९१ टक्के एवढे परीक्षार्थी उपस्थित होते.

राज्य तसेच जिल्हा नियंत्रण कक्षाच्या सक्षम देखरेखीखाली संपूर्ण परीक्षा कोणत्याही अडथळ्याशिवाय पार पडली असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत देण्यात आली आहे.

गैरप्रकार रोखण्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर

परीक्षा पारदर्शक आणि गैरप्रकारमुक्त ठेवण्यासाठी परिषदेने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला. यामध्ये सीसीटीव्ही (CCTV), बायोमेट्रिक आणि एआय (AI) तंत्रज्ञानाचा समावेश होता.

उमेदवारांचे फोटो व नावे यांची पडताळणी करण्याच्या प्रक्रियेत बदललेले फोटो, वेगवेगळी नावे किंवा बोगस उमेदवार ओळखण्याची प्रणाली अत्यंत प्रभावी ठरली.

सर्व परीक्षा केंद्रसंचालक, परीक्षा नियंत्रण कक्ष आणि महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे इंटरनेट फोनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. यामुळे परीक्षा केंद्रांना त्वरित सूचना देणे आणि त्यांचे काटेकोर पालन सुनिश्चित करणे शक्य झाले.

राज्याच्या कंट्रोल रूममधून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून तपासणी सुरू असताना नांदेड जिल्ह्यातील एका केंद्रावर दोन विद्यार्थी आणि बीड जिल्ह्यातील एका केंद्रावर सहा विद्यार्थी एकमेकांशी चर्चा करून उत्तरे लिहीत असल्याचे निदर्शनास आले.

या गैरप्रकाराची दखल घेत, समवेक्षकांद्वारे (Invigilators) संबंधित आठ विद्यार्थ्यांना तत्काळ परीक्षा केंद्रातून बाहेर पाठविण्यात आले. यासोबतच, गैरप्रकाराला आळा घालण्यात अपयशी ठरलेल्या समवेक्षकांवर रितसर चौकशी प्रस्तावित करण्यात आली आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी दिली आहे.

महाराष्ट्र शिक्षक पात्रता (महा-टीईटी) परीक्षा  उत्तर सूची 2025 । Maha TET Answer Key

परीक्षा दिलेल्या लाखो उमेदवारांचे लक्ष आता Maha TET Exam Answer Key कडे लागले आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे आयोजित महाराष्ट्र शिक्षक पात्रता (महा-टीईटी) परीक्षा २०२५ ची Maha TET Exam Answer Key प्रसिद्ध झाली आहे.

पेपर १ (इयत्ता १ ली ते ५ वी) आणि पेपर २ (इयत्ता ६ वी ते ८ वी) मधील गणित-विज्ञान तसेच सामाजिक शास्त्र या सर्व विषयांची आणि सर्व माध्यमांची उत्तर सूची https://mahatet.in/ या अधिकृत संकेतस्थळावर (https://mahatet.in/Notices/AnswerKey/ShowAnswerKey) उपलब्ध करून देण्यात आली आहे.

उमेदवारांनी Maha TET Exam Answer Key संदर्भातील अधिकृत अपडेट्ससाठी https://www.mscepune.in/ या वेबसाइटला नियमित भेट द्यावी.

TET शिक्षक पात्रता परीक्षा अपडेट्स

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment