आगामी नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 2 डिसेंबर 2025 रोजी होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. सामान्य प्रशासन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वी जाहीर करण्यात आलेली मतदानाची सार्वजनिक सुट्टी (Public Holiday) काही मतदारसंघांपुरती रद्द करण्यात आली आहे.
नगरपरिषद नगरपंचायत निवडणूक सार्वजनिक सुट्टी रद्द
न्यायालयीन अपील दाखल झाल्यामुळे केवळ त्या विशिष्ट मतदारसंघांमध्ये 2 December Holiday रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या निवडणुकीसाठी एकूण १६ जिल्ह्यांमधील नगरपरिषद/नगरपंचायतीच्या क्षेत्रातील 2 December Holiday (सार्वजनिक सुट्टी) रद्द करण्यात आली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी 2 डिसेंबर 2025 रोजी 16 जिल्ह्यांतील नगरपरिषद/नगरपंचायतीमध्ये सार्वजनिक सुट्टी रद्द करण्यात आली आहे.
- ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ
- अहिल्यानगर (कोपरगाव, देवळाली प्रवरा, पाथर्डी, नेवासा)
- पुणे (बारामती, फुरसुंगी-उरुळी देवाची)
- सोलापूर (अनगर, मंगळवेढा)
- सातारा (महाबळेश्वर, फलटण)
- छत्रपती संभाजीनगर (फुलंब्री)
- नांदेड (मुखेड, धर्माबाद)
- लातूर (निलंगा, रेणापूर)
- हिंगोली (वसमत)
- अमरावती (अंजनगावसूर्जी)
- अकोला (बाळापूर)
- यवतमाळ (यवतमाळ)
- वाशिम (वाशिम)
- बुलढाणा (देऊळगावराजा)
- वर्धा (देवळी)
- चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस
२ डिसेंबर २०२५ रोजी मतदान होणाऱ्या मतदारसंघांची यादी
- पालघर जिल्ह्यातील डहाणू, जव्हार, पालघर आणि वाडा या नगरपरिषदा/नगरपंचायतींमध्ये मतदान होणार आहे.
- रायगड जिल्ह्यात अलिबाग, कर्जत, खोपोली, महाड, माथेरान, मुरूड-जंजिरा, पेण, रोहा, श्रीवर्धन, उरण या दहा ठिकाणी निवडणूक आहे.
- रत्नागिरी जिल्ह्यासाठी चिपळूण, देवरुख, गुहागर, खेड, लांजा, राजापूर आणि रत्नागिरी हे सात मतदारसंघ आहेत.
- सिंधुदूर्ग जिल्ह्यात कणकवली, मालवण, सावंतवाडी आणि वेंगुर्ला येथे मतदान होईल, तर ठाणे जिल्ह्यात केवळ कुळगाव-बदलापूर नगरपालिकेत निवडणूक आहे.
- अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड, राहाता, राहूरी, संगमनेर, शेवगाव, शिर्डी, श्रीगोंदा आणि श्रीरामपूर या आठ ठिकाणी मतदान होणार आहे.
- धुळे जिल्ह्यात दोंडाईचा-वरवाडे, पिंपळनेर, सिंदखेडा आणि शिरपूर-वरवाडे येथे निवडणूक आहे.
- जळगाव जिल्ह्यातील जामनेर, अमळनेर, भडगाव, भूसावळ, चाळीसगाव, चोपडा, धरणगांव, एरंणडोल, फैजपूर, मुक्ताईनगर, नशिराबाद, पाचोरा, परोळा, रावेर, सावदा, शेंदूर्णी, वरणगांव, यावल या १८ मतदारसंघांमध्ये मतदान होईल.
- नंदूरबार जिल्ह्यात शहादा, नंदूरबार, नवापूर आणि तळोदा या चार ठिकाणी निवडणूक आहे.
- नाशिक जिल्ह्यातील भगुर, मनमाड, नांदगाव, सटाणा, सिन्नर, येवला, चांदवाड, इगतपूरी, ओझर, पिंपळगांव बसमत आणि त्र्यंबक येथे मतदान होईल.
- कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा, चंदगड, गडहिंग्लज, हातकणंगले, हुपरी, जयसिंगपूर, कागल, कुरुंदवाड, मलकापूर, मुरगूड, पन्हाळा, शिरोळ, वडगाव (कोल्हापूर) या तेरा ठिकाणी निवडणूक आहे.
- पुणे जिल्ह्यातील आळंदी, भोर, चाकण, दौंड, इंदापूर, जेजूरी, जुन्नर, लोणावळा, मालेगाव बु., मंचर, राजगुरुनगर, सासवड, शिरुर, तळेगाव-दाभाडे आणि वडगाव (पुणे) या पंधरा मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे.
- सांगली जिल्ह्यात आष्टा, आटपाडी, इस्लामपूर, जत, पळूस, शिराळा, तासगाव, विटा येथे निवडणूक आहे.
- सातारा जिल्ह्यातील कराड, मलकापूर (सातारा), मेढा, म्हसवड, पाचगणी, रहिमतपूर, सातारा, वाई या आठ ठिकाणी मतदान होईल.
- सोलापूर जिल्ह्यासाठी अक्कलकोट, अकलूज, बार्शी, दुधनी, करमाळा, कुडूवाडी, मैंदर्गी, मोहोळ, पंढरपूर आणि सांगोला हे दहा मतदारसंघ आहेत.
- बीड जिल्ह्यात अंबेजोगाई, बीड, धारुर, गेवराई, माजलगाव आणि परळी-वैजनाथ या सहा ठिकाणी निवडणूक आहे.
- छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गंगापूर, कन्नड, खुलताबाद, पैठण, सिल्लोड आणि वेजापूर येथे मतदान होईल.
- धाराशिव जिल्ह्यातील भूम, कळंब, मुरुम, नळदुर्ग, धाराशिव, परंडा, तुळजापूर, उमरगा या आठ ठिकाणी निवडणूक आहे.
- हिंगोली जिल्ह्यात बसमतनगर, हिंगोली आणि कळमनुरी येथे मतदान होईल.
- जालना जिल्ह्यातील अंबड, भोकरदन आणि परतूर येथे निवडणूक आहे.
- लातूर जिल्ह्यात अहमदपूर, औसा आणि उदगीर येथे मतदान आहे.
- नांदेड जिल्ह्यातील बिलोली, देगलूर, हदगाव, हिमायतनगर, कंधार, कुंडलवाडी, मुदखेड, उमरी, भोकर, किनवट, लोहा या अकरा ठिकाणी निवडणूक आहे.
- परभणी जिल्ह्यात गंगाखेड, जिंतूर, मानवत, पाथरी, पूर्णा, सेलू, सोनपेठ येथे मतदान होईल.
- अकोला जिल्ह्यातील अकोट, बार्शी-टाकळी, हिवरखेडा, मुर्तीजापूर, तेल्हारा या पाच ठिकाणी निवडणूक आहे.
- अमरावती जिल्ह्यात अचलपूर, चांदूरबाजार, चांदूर रेल्वे, चिखलदरा, दर्यापूर, धामणगाव रेल्वे, धरणी, मोर्शी, नंद-खांदेश्वर, शेंदूरजनाघाट, वरुड येथे मतदान होईल.
- बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा, चिखली, जळगाव जामोद, खामगाव, लोणार, मलकापूर (बुलढाणा), मेहकर, नांदूरा, शेगाव, सिंदखेडराजा या दहा ठिकाणी निवडणूक आहे.
- वाशिम जिल्ह्यात कारंजा, मालेगाव, मंगरुळपीर, रिसोड येथे मतदान होईल.
- यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी, दारव्हा, दिग्रस, घाटंजी, पुसद, उमरखेड, वणी, ढाणकी, नेर-नबाबपूर, पांढरकवडा या दहा ठिकाणी निवडणूक आहे.
- भंडारा जिल्ह्यातील पवनी, साकोली शेंदूरवाफा, तुमसर आणि भंडारा या चार ठिकाणी निवडणूक आहे.
- चंद्रपूर जिल्ह्यात बल्लारपूर, भद्रावती, भिसी, ब्रह्मपूरी, चिमूर, गडचांदूर, मूल, नागभीड, राजुरा, वरोरा येथे मतदान होईल.
- गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी, देसाईगंज आणि गडचिरोली या तीन ठिकाणी निवडणूक आहे.
- गोंदीया जिल्ह्यात गोंदिया, गोरेगाव, सालेकसा आणि तीरोडा येथे मतदान होईल.
- नागपूर जिल्ह्यातील बहादूरा, बेसा पिपळा, भिवापूर, बुटीबोरी, डिगडोह, कळमेश्वर-ब्रह्मणी, कामठी, कांद्री-कन्हान, काटोल, खापा, कोंढाळी, महाि ळा, मोहपा, मौिा, नरखेड, दनलडोह, पारदशवणी, रामटेक, सावनेर, उमरेड, वानाडोंगरी, दबडगाव-तरोडी (खू) पांढ णा, गोधणी (रेल्वे), कन्हान-दपपरी, मोवाड, वाडी, येरखेडा या २७ ठिकाणी निवडणूक आहे.
- वर्धा जिल्ह्यातील आर्वी, हिंगणघाट, प ळगाव, कसिी रेल्वे आणि वर्धा या पाच ठिकाणी मतदान होणार आहे.
अधिक माहितीसाठी : शासन आदेश पाहा









