पोस्ट ऑफिस ग्रामीण डाक सेवक 21,413 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध, संपूर्ण माहिती

Published On: February 2, 2026
Follow Us
Post Office GDS Bharti 2026

Post Office GDS Bharti 2026: भारतीय टपाल विभागाकडून (India Post) देशभरात ग्रामीण डाक सेवक (GDS) पदांसाठी मोठी भरती जाहीर झाली असून, तब्बल २१,४१३ जागा भरल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे यासाठी कोणतीही परीक्षा होणार नसून केवळ १० वीच्या गुणांवर निवड केली जाणार आहे. चला तर मग जाणून घेऊया या भरतीबद्दलची संपूर्ण माहिती.

पोस्ट ऑफिस भरती जाहिरात । Post Office GDS Bharti 2026

टपाल विभागाने ‘ग्रामीण डाक सेवक’ (GDS) पदांसाठी जानेवारी २०२६ चे वेळापत्रक जाहीर केले आहे. या भरती मोहिमेद्वारे ब्रांच पोस्टमास्टर (BPM), असिस्टंट ब्रांच पोस्टमास्टर (ABPM) आणि डाक सेवक या तीन प्रमुख पदांवर उमेदवारांची निवड केली जाईल.

ही 10 वी पास सरकारी नोकरी मिळवण्याची एक उत्तम संधी आहे. संपूर्ण भारतातून अर्ज मागवण्यात येत असून, महाराष्ट्रातही मोठ्या संख्येने जागा उपलब्ध आहेत. या भरतीसाठीची अधिकृत अधिसूचना क्रमांक 17-37/2025-GDS (Pt.I) असून ती २८ जानेवारी २०२६ रोजी (indiapostgdsonline.gov.in) या अधिकृत वेबसाईट वर प्रसिद्ध झाली आहे.

विभाग (Department)भारतीय टपाल विभाग (Department of Posts)
पदाचे नाव (Post Name)ग्रामीण डाक सेवक (GDS) – BPM, ABPM, डाक सेवक
जाहिरात क्रमांक (Advt No)17-37/2025-GDS (Pt.I)
एकूण जागा (Total Vacancy)२१,४१३ (संपूर्ण भारत)
महाराष्ट्र जागा (Maharashtra Vacancy)१४९८ जागा (मराठी: १४७३ + कोकणी/मराठी: २५)
नोकरीचे ठिकाण (Job Location)संपूर्ण भारत (तुमच्या पसंतीचा जिल्हा)
शैक्षणिक पात्रता (Qualification)१० वी उत्तीर्ण (गणित व इंग्रजी विषयासह)
वयोमर्यादा (Age Limit)१८ ते ४० वर्षे (SC/ST: +५ वर्षे, OBC: +३ वर्षे सवलत)
अर्ज शुल्क (Application Fee)Open/OBC/EWS: ₹१००/-
पगार (Salary)₹१०,०००/- ते ₹२९,३८०/- (पदानुसार)
निवड पद्धत (Selection Process)१० वी च्या गुणांवर आधारित मेरिट लिस्ट (कोणतीही परीक्षा नाही)
अर्ज करण्याची पद्धत (Apply Mode)ऑनलाइन (Online)
अर्ज सुरु होण्याची तारीख३१ जानेवारी २०२६
अर्ज करण्याची शेवटची तारीख१६ फेब्रुवारी २०२६
अधिकृत वेबसाईटindiapostgdsonline.gov.in

पोस्ट ऑफिस भरती महत्वाच्या तारखा । Post Office GDS Bharti 2026 Important Dates (शेवटची तारीख)

अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन असून ती इंडिया पोस्टच्या अधिकृत वेबसाइटवर सुरू झाली आहे. (Post Office GDS Bharti 2026) साठीच्या महत्त्वाच्या तारखा खालीलप्रमाणे आहेत.

क्रियाकलाप (Activity)तारखा (Schedule)
ऑनलाइन नोंदणी (Registration)३१ जानेवारी २०२६ ते १४ फेब्रुवारी २०२६ (सायंकाळी ५ वाजेपर्यंत)
ऑनलाइन अर्ज सादर करणे आणि शुल्क भरणे०२ फेब्रुवारी २०२६ ते १६ फेब्रुवारी २०२६ (सायंकाळी ५ वाजेपर्यंत)
अर्ज दुरुस्ती (Correction Window)१८ फेब्रुवारी २०२६ ते १९ फेब्रुवारी २०२६

पोस्ट ऑफिस भरती 2026 ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ फेब्रुवारी २०२६ सायंकाळी ५ वाजेपर्यंत आहे.

पोस्ट ऑफिस भरती 2026 महाराष्ट्र जिल्हानिहाय जागा । Maharashtra GDS Vacancy 2026 District Wise List

या भरती प्रक्रियेत महाराष्ट्र सर्कलसाठी मोठ्या प्रमाणावर जागा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. उपलब्ध आकडेवारीनुसार, संपूर्ण महाराष्ट्रात (गोवा राज्यासह) खालीलप्रमाणे जागांचे तपशील आहे.

  • महाराष्ट्र (मराठी भाषा): १४७३ जागा
  • महाराष्ट्र/गोवा (कोकणी/मराठी): २५ जागा
  • एकूण देशपातळीवरील जागा: २१,४१३
Maharashtra GDS Vacancy 2026 District Wise List

उमेदवारांना पोस्ट ऑफिस भरती 2026 महाराष्ट्र जागा आणि आपल्या जिल्ह्यनुसार रिक्त जागांची अचूक माहिती अर्ज भरताना पोर्टलवर ‘Division’ निवडल्यानंतर दिसेल. आपण ज्या विभागातून अर्ज करू इच्छिता, तेथील स्थानिक भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

अंगणवाडी सेविका, मदतनीस भरती 2026 संपूर्ण माहिती

ग्रामीण डाक सेवक भरती आवश्यक पात्रता । GDS Bharti 2026 Eligibility Criteria

या पदांसाठी अर्ज करण्यापूर्वी आपली पात्रता तपासणे गरजेचे आहे. पात्रता निकष खालीलप्रमाणे आहेत.

१. शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

  • उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून इयत्ता १० वी पास असणे अनिवार्य आहे.
  • १० वी मध्ये गणित (Mathematics) आणि इंग्रजी (English) विषयात उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • उमेदवाराने अर्ज करत असलेल्या सर्कलमधील स्थानिक भाषा (उदा. महाराष्ट्रासाठी मराठी) १० वी पर्यंत अभ्यासलेली असावी.

२. वयोमर्यादा (Age Limit)

  • किमान वय: १८ वर्षे
  • कमाल वय: ४० वर्षे
  • (वयोमर्यादा अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेला मोजली जाईल).
  • वयात सवलत: SC/ST उमेदवारांना ५ वर्षे, OBC ला ३ वर्षे आणि अपंग (PwD) उमेदवारांना १० वर्षांची सवलत मिळेल.

३. इतर पात्रता

  • संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक.
  • सायकल चालवता येणे आवश्यक.

पोस्ट ऑफिस भरती 2026 ऑनलाइन अर्ज । How to Apply for India Post GDS Online 2026?

तुम्ही Gramin Dak Sevak Recruitment 2026 साठी खालील पायऱ्या फॉलो करून अर्ज करू शकता.

  1. नोंदणी (Registration): सर्वप्रथम https://indiapost.gov.in/gdsonlineengagement या वेबसाइटवर जाऊन स्वतःचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी वापरून नोंदणी करा.
  2. ऑनलाइन अर्ज (Apply Online): रजिस्ट्रेशन नंबर वापरून लॉग-इन करा. अर्जामध्ये आपली वैयक्तिक माहिती, १० वी चे मार्क्स आणि इतर तपशील अचूक भरा.
  3. Post Preference: तुम्हाला ज्या डिव्हिजनमध्ये नोकरी हवी आहे, ते निवडून तेथील पदांचा पसंतीक्रम (Preferences) द्या.
  4. कागदपत्रे अपलोड (Upload Documents): पोस्ट ऑफिस भरती कागदपत्रे म्हणून तुम्हाला फक्त तुमचा अलीकडील फोटो आणि स्वाक्षरी (Signature) विहित नमुन्यात अपलोड करावी लागेल. अर्जासोबत इतर कोणतीही कागदपत्रे अपलोड करायची नाहीत.
  5. फी भरणे (Fee Payment): जनरल आणि OBC (मुलगा) उमेदवारांसाठी १०० रुपये फी आहे. SC/ST, अपंग (PwD) आणि सर्व महिला उमेदवारांना फी माफी आहे.
  6. Print Application: अर्ज सबमिट केल्यावर त्याची प्रिंट काढून ठेवा.

पोस्ट ऑफिस भरती 2026 ऑनलाइन अर्ज करा या प्रक्रियेत माहिती भरताना कोणतीही चूक होणार नाही याची दक्षता घ्या, कारण चुकीची माहिती दिल्यास अर्ज बाद होऊ शकतो.

GDS Selection Process & Merit List Date 2026

या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा किंवा मुलाखत घेतली जाणार नाही. निवड प्रक्रिया खालीलप्रमाणे असेल.

  • मेरिट लिस्ट (Merit List): उमेदवारांच्या १० वी च्या गुणांच्या आधारे ‘सिस्टम जनरेटेड मेरिट लिस्ट‘ तयार केली जाईल.
  • ज्या उमेदवारांना ग्रेड्स (Grades/CGPA) आहेत, त्यांचे रुपांतर गुणांमध्ये करण्यासाठी ९.५ (9.5) या गुणकाने गुणले जाईल.
  • निवड झालेल्या उमेदवारांना एसएमएस (SMS) आणि ईमेलद्वारे माहिती दिली जाईल.
  • निवड झाल्यानंतर १५ दिवसांच्या आत कागदपत्र पडताळणी (Document Verification) साठी जावे लागेल.

Post Office GDS Bharti 2026 ची ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आणि गुणांवर आधारित असल्याने हुशार विद्यार्थ्यांसाठी ही मोठी संधी आहे.

Post Office GDS Bharti 2026 महत्वाच्या लिंक्स | India Post GDS Recruitment 2026 Notification PDF

माहितीलिंक
ऑनलाइन अर्ज (Apply Online)येथे क्लिक करा
Maharashtra GDS Vacancy 2026 District Wise Listयेथे क्लिक करा
मूळ जाहिरात (Notification PDF)PDF डाऊनलोड करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)https://indiapostgdsonline.gov.in/

FAQ Related to GDS Recruitment 2026

Q1: महाराष्ट्र पोस्ट ऑफिस भरती 2026 ची शेवटची तारीख कोणती आहे?

उत्तर: पोस्ट ऑफिस भरतीसाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख १६ फेब्रुवारी २०२६ आहे. मात्र, नवीन नोंदणी (Registration) १४ फेब्रुवारी २०२६ लाच बंद होईल.

Q2: पोस्ट ऑफिस भरतीसाठी कोण पात्र आहेत?

उत्तर: ज्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डातून गणित आणि इंग्रजी विषयासह १० वी उत्तीर्ण केली आहे आणि ज्यांचे वय १८ ते ४० वर्षांच्या दरम्यान आहे, असे उमेदवार या भरतीसाठी पात्र आहेत. तसेच त्यांना स्थानिक भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

Q3: पोस्ट ऑफिस भरती पगार किती आहे?

उत्तर: ग्रामीण डाक सेवक पदांसाठी पगार (TRCA) खालीलप्रमाणे आहे.
BPM (Branch Postmaster): रु. १२,०००/- ते रु. २९,३८०/-
ABPM / Dak Sevak: रु. १०,०००/- ते रु. २४,४७०/- यासोबतच महागाई भत्ता (DA) आणि इतर भत्ते देखील मिळतात.

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment