लाडकी बहीण योजना e-KYC संदर्भात मोठी अपडेट! कागदपत्रे जमा करण्याबाबत कोणतेही आदेश नाहीत – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण

Published On: May 19, 2026
Follow Us
ladki bahin yojana e kyc mahila bal vikas vibhag Clarification

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या केवायसी बद्दल सध्या जो काही गोंधळ सुरू आहे. या योजनेची ई-केवायसी (Ladki Bahin Yojana e kyc) करु न शकलेल्या महिलांना जिल्ह्याच्या महिला व बाल विकास कार्यालयात कागदपत्रे सादर करावी लागणार नाही, याबाबत आता खुद्द राज्याच्या महिला व बाल विकास विभागाने (Mahila Bal Vikas Vibhag) पूर्ण विराम दिला आहे. काय आहे त्यामागील सत्य सविस्तर वाचा.

ई-केवायसीमध्ये नेमकी अडचण काय होती?

शासनाने या योजनेसाठी लाभ सुरू ठेवण्यासाठी ई-केवायसी (ladki bahin yojana e kyc) करणे बंधनकारक केले होते. पण e KYC चा फॉर्म भरताना एक मोठी गडबड झाली. अर्जामध्ये एक प्रश्न होता की, ‘तुमच्या कुटुंबात कोणी सरकारी नोकरीला आहे का किंवा कोणी पेन्शन घेणारे आहे का?’ हा पर्याय निवडताना अनेक पात्र महिलांकडून नजर चुकीने चुकीचा पर्याय निवडला गेला.

त्यामुळे या पात्र महिलांना योजनेचे पंधराशे रुपये मिळण्यात तांत्रिक अडचण निर्माण झाली आणि पडताळणी प्रक्रियेत त्यांचे अर्ज अडकले.

ही अडचण लक्षात आल्यावर महिलांनी आणि स्थानिक अधिकाऱ्यांनी शासनाकडे दुरुस्तीसाठी विनंती केली. यावर सहानुभूतीपूर्वक विचार करून शासनाने फक्त याच चुकीच्या दुरुस्तीसाठी पोर्टलवर ३० एप्रिल २०२६ पर्यंतची मुदतवाढ दिली.

म्हणजेच, ज्यांच्याकडून सरकारी नोकरीचा पर्याय चुकीचा निवडला गेलाय, त्यांनाच ऑनलाईन सुधारणा करण्याची ही शेवटची संधी देण्यात आली. या तारखेनंतर कोणत्याही परिस्थितीत ही चूक सुधारता येणार नाही, असेही शासनाने २ एप्रिल २०२६ च्या निर्णयात स्पष्ट केले होते.

लाडकी बहीण योजनेसाठी ई केवायसी बाबत शासन निर्णय येथे डाउनलोड करा

सध्या पसरलेली खोटी अफवा आणि गोंधळ

आता या प्रक्रियेनंतर व्हॉट्सॲप आणि इतर सोशल मीडियावर एक नवीनच अफवा वाऱ्यासारखी पसरली. खोटे मेसेज फिरू लागले की, ज्या महिलांची ई-केवायसी राहिली आहे किंवा पूर्ण होऊ शकली नाही, त्यांनी आपली सर्व कागदपत्रे फाईलमध्ये लावून थेट जिल्ह्याच्या महिला व बाल विकास विभागाच्या कार्यालयात जाऊन जमा करावीत. आपला लाभ बंद होईल या भीतीने अनेक महिलांनी कागदपत्रे गोळा करून कार्यालयांकडे धाव घेण्यास सुरुवात केली.

शासनाचे स्पष्टीकरण आणि आवाहन

या वाढत्या गोंधळाची दखल घेत महिला व बाल विकास विभागाने (mahila bal vikas vibhag) अगदी स्पष्ट शब्दांत खुलासा केला आहे. ई-केवायसी प्रक्रियेसाठी कोणतीही कागदपत्रे ऑफलाईन किंवा प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन जमा करण्याची अजिबात गरज नाही.

शासनाने असे कागदपत्रे गोळा करण्याचे कोणतेही आदेश दिलेले नाहीत. हे सर्व काम केवळ ऑनलाईन पोर्टलवरच करायचे होते. त्यामुळे लाडकी बहीण केवायसी प्रक्रियेबाबत पसरत असलेल्या या खोट्या बातम्यांवर कोणीही विश्वास ठेवू नये, असे महत्त्वपूर्ण आवाहन शासनाने केले आहे.

थोडक्यात सांगायचे तर, तुम्हाला कोणतीही कागदपत्रे हातात घेऊन कोणत्याही कार्यालयात जायचे नाही. अफवांवर विश्वास न ठेवता निश्चिंत राहा आणि नेहमी शासनाच्या अधिकृत माहितीवरच विसंबून राहा.

लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट : https://ladakibahin.maharashtra.gov.in/

महिला योजना

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment