राज्यातील निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांसाठी वित्त विभागाने १९ मे २०२६ रोजी एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक शासन निर्णय जारी केला आहे. आता या नवीन निर्णयानुसार, शासनाने १ नोव्हेंबर २०२५ ते ३१ जानेवारी २०२६ या तीन महिन्यांच्या कालावधीतील DA Hike Pensioners Arrears रोखीने देण्याचे आदेश निर्गमित केले आहे.
माहे फेब्रुवारी २०२६ मध्ये शासनाने महागाई वाढीच्या दरात सुधारणा केली होती, ज्यानुसार जुलै २०२५ ते ऑक्टोबर २०२५ या काळातील थकबाकी मार्च २०२६ मध्ये रोखीने देण्यात आली होती. मात्र, त्यानंतरच्या उर्वरित काळातील थकबाकीचा प्रश्न प्रलंबित होता.
शासनाने निर्गमित केलेल्या आदेशानुसार, ही महागाई वाढीची थकबाकी मे २०२६ च्या पेन्शनसोबत रोखीने दिली जाणार आहे.
सातव्या वेतन आयोगानुसार तो ५५% वरून ५८% इतका वाढवण्यात आला होता, तर पाचव्या वेतन आयोगानुसार पेन्शन घेणाऱ्यांची महागाई वाढ ४६६% वरून ४७४% करण्यात आली होती , सहाव्या वेतन आयोगानुसार हा दर २५२% वरून २५७% करण्यात आला होता.
या व्यतिरिक्त, हा शासन निर्णय केवळ राज्य शासकीय कर्मचाऱ्यांपुरता मर्यादित नसून, मान्यताप्राप्त आणि अनुदानित शैक्षणिक संस्था, कृषी तसेच कृषीतर विद्यापीठे आणि त्यांच्याशी संलग्न असलेली अशासकीय महाविद्यालये यांच्या निवृत्तीवेतनधारकांनाही लागू राहील. तसेच, जिल्हा परिषदांचे निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांनाही या DA Hike Pensioners Arrears चा लाभ मिळणार आहे, असे शासनाने स्पष्ट केले आहे.
DA Arrears Calculator
DA Arrears Calculator (नोव्हेंबर २०२५ ते जानेवारी २०२६)
अधिक माहितीसाठी शासन निर्णय डाउनलोड करा
| सातवा वेतन आयोग | महागाई भत्ता थकबाकी GR |
| सहावा वेतन आयोग | महागाई भत्ता थकबाकी GR |
| पाचवा वेतन आयोग | महागाई भत्ता थकबाकी GR |









