महाराष्ट्र शासनाच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयातर्फे (DVET) ITI Admission 2026 ची केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया साठी ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहे. जर तुम्हालाही या वर्षी आयटीआयमध्ये प्रवेश घ्यायचा असेल, तर या लेखात प्रवेश घेण्याची प्रक्रिया, लागणारी कागदपत्रे आणि कोर्सबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. तसेच ITI प्रवेशासंबंधित सर्व आवश्यक अधिकृत PDF, वेबसाईट, ऑनलाईन अर्ज लिंक आर्टिकल मध्ये दिलेली आहे.
ITI Admission 2026-27
महाराष्ट्र राज्यामध्ये चालवल्या जाणाऱ्या शासकीय आणि खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. यासाठी उमेदवारांना Dvet ITI च्या अधिकृत प्रवेश संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करावी लागते.
ITI Admission 2026 साठी तुम्हाला संपूर्ण फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे. प्रवेशासाठी तुमचे प्रवेश वर्षाच्या ३१ जुलै रोजी किमान १४ वर्षे वय असणे आवश्यक आहे आणि यासाठी कोणतीही कमाल वयोमर्यादा नाही.
तुम्ही दहावी उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण असाल तरीही तुमच्या गुणवत्तेनुसार आणि निवडलेल्या कोर्सच्या पात्रतेनुसार तुम्हाला योग्य Dvet admission मिळू शकते.
ITI Admission 2026 Start Date Maharashtra
राज्यातील सर्व शासकीय व खाजगी आयटीआयमध्ये प्रवेशाबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी २१ मे २०२६ पासून सकाळी १० ते ११ या वेळेत मोफत मार्गदर्शन सत्रे आयोजित केली जाणार आहेत.
ITI Admission 2026 Start Date Maharashtra 21 may 2026 सविस्तर वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे.

प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे | ITI Admission 2026 Documents
आयटीआय फॉर्म भरण्यासाठी लागणारी कागदपत्रे अगोदरच तयार ठेवल्यास ऐन वेळी धावपळ होत नाही. यामध्ये प्रामुख्याने तुमचे आधार कार्ड, दहावीची मूळ गुणपत्रिका (Marksheet) आणि शाळा सोडल्याचा मूळ दाखला (Leaving Certificate) यांची गरज असते.
तसेच स्वतःचे किंवा पालकांचे अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) आवश्यक असते. जर तुम्ही मागासवर्गीय प्रवर्गातून अर्ज करत असाल तर जातीचा दाखला आणि आवश्यकतेनुसार नॉन-क्रिमी लेयर प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे.
ITI Admission 2026 Documents चे व्हेरिफिकेशन केंद्रावर मूळ प्रतींद्वारे केले जाते, त्यामुळे या सर्वांची एक सत्यप्रत (झेरॉक्स) आणि दोन पासपोर्ट साईझ फोटो सोबत नक्की ठेवा.
आयटीआय मध्ये कोणकोणते विषय आणि कोर्स असतात? | Govt ITI courses list
आयटीआय मध्ये कोण कोणते कोर्स असतात आणि त्यामध्ये काय शिकवले जाते. आयटीआय मध्ये प्रामुख्याने दोन गट असतात – इंजिनिअरिंग (मशीन आणि बिगर मशीन) आणि नॉन-इंजिनिअरिंग गट.
आयटीआय मध्ये कोणकोणते विषय असतात हे तुम्ही निवडलेल्या कोर्सवर पूर्णपणे अवलंबून असते. यामध्ये प्रॅक्टिकल कामावर जास्त भर दिला जातो. काही कोर्स १ वर्षाचे असतात तर काही २ वर्षांचे असतात.
जर आपण Govt ITI courses list किंवा iti courses list पाहिली तर त्यात फिटर (Fitter), टर्नर (Turner), मशिनिस्ट (Machinist), मेकॅनिक मोटर वेहिकल (Mechanic Motor Vehicle), कॉम्प्युटर हार्डवेअर आणि ड्राफ्ट्समन यांसारखे लोकप्रिय अभ्यासक्रम आहेत.
याशिवाय फॅशन डिझाईन अँड टेक्नॉलॉजी, ड्रेस मेकिंग, बेसिक कॉस्मॉटोलॉजी असे नॉन-इंजिनिअरिंग विषय देखील आयटीआय कोर्स लिस्ट मध्ये उपलब्ध आहेत. हे सर्व कोर्स प्रत्यक्ष उद्योगधंद्यांच्या गरजेनुसार डिझाईन केलेले असल्याने प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर विद्यार्थ्यांना लगेचच नोकरीच्या किंवा शिकाऊ उमेदवारीच्या (Apprenticeship) चांगल्या संधी उपलब्ध होतात.
अधिक माहितीसाठी : Govt ITI courses list येथे Download करा
आयटीआय फॉर्म कसा भरायचा? | ITI Admission Online Registration 2026
ITI Admission Online Registration 2026 ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आणि अत्यंत सोपी आहे. सर्वात आधी तुम्हाला https://admission.dvet.gov.in/या अधिकृत वेबसाईटवर जाऊन नवीन उमेदवार म्हणून नोंदणी करावी लागेल.
तिथे तुम्हाला तुमचे आधारकार्ड नुसार नाव, जन्म तारीख, मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडीची माहिती द्यावी लागेल. एकदा नोंदणी झाली की तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड मिळेल. याच्या मदतीने लॉगिन करून तुम्हाला आयटीआय फॉर्म मधील तुमची वैयक्तिक माहिती, पत्ता, आणि शैक्षणिक पात्रता अशी सर्व माहिती भरायची आहे.
माहिती भरून झाल्यावर उमेदवाराला आपला प्रोफाईल लॉक करावा लागतो. यानंतर ऑनलाईन पेमेंट गेटवेच्या माध्यमातून प्रवेश अर्ज शुल्क भरावे लागते. राखीव प्रवर्गासाठी हे शुल्क १०० रुपये तर अराखीव म्हणजेच खुल्या प्रवर्गासाठी १५० रुपये असते.
शुल्क भरल्यानंतर सर्वात महत्त्वाची पायरी म्हणजे नजीकच्या कोणत्याही आयटीआय संस्थेत जाऊन मूळ कागदपत्रांची पडताळणी करून आपला अर्ज निश्चित (Confirm) करणे. प्रवेश अर्ज निश्चित झाल्यावरच तुमचा पुढील प्रवेश फेऱ्यांसाठी विचार केला जातो.
महत्वाच्या अधिकृत डायरेक्ट लिंक
- आयटीआय माहितीपुस्तिका (PDF) – ITI Admission Notification PDF डाउनलोड करा
- ITI Admission Notification PDF Download
- Registration and Application Confirmation PDF
- DVET Admission portal : https://admission.dvet.gov.in/
आयटीआय मधील प्रवेश हा तुमच्या करिअरला एक उत्तम आणि सुरक्षित सुरुवात देऊ शकतो. वर दिलेल्या माहितीचा उपयोग करून तुमचा प्रवेशाचा मार्ग नक्कीच सोपा होईल. वेळोवेळी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या, वेळेत अर्ज भरा आणि आपल्या आवडीच्या क्षेत्रात यश मिळवा!









