शासकीय आणि इतर पात्र कर्मचाऱ्यांसाठी राज्य शासनाने १ नोव्हेंबर २०२५ ते ३१ जानेवारी २०२६ या तीन महिन्यांच्या कालावधीतील महागाई भत्त्याची थकबाकी (DA Arrears) देण्याबाबत अधिकृत आदेश निर्गमित केले आहेत. प्राथमिक शिक्षण संचालनालयाने २० मे २०२६ रोजी काढलेल्या परिपत्रकानुसार, काही कर्मचाऱ्यांची थकबाकीची रक्कम आता जून महिन्याच्या वेतनासोबत देण्यात येणार आहे. नेमके कारण काय? सविस्तर वाचा.
महागाई भत्त्याची थकबाकी (DA Arrears)
वित्त विभागाने १८ मे २०२६ रोजी महागाई भत्त्याची थकबाकी (DA Arrears) संदर्भातील शासन निर्णय निर्गमित केला आहे. त्यानुसार, सर्व पात्र कर्मचाऱ्यांना १ नोव्हेंबर २०२५ ते ३१ जानेवारी २०२६ या तीन महिन्यांची (महागाई भत्ता थकबाकी) मे २०२६ च्या वेतनासोबत रोखीने अदा करण्याचे स्पष्ट निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. ५ व्या आणि ६ व्या वेतन आयोगानुसार असुधारित वेतन संरचना असलेल्या कर्मचाऱ्यांनाही या निर्णयाचा लाभ मिळणार आहे.
या कर्मचाऱ्यांना DA Arrears जूनच्या वेतनासोबत मिळणार
१८ मे रोजी महागाई भत्त्याची थकबाकी (DA Arrears) शासन निर्णय निघण्यापूर्वीच राज्यातील बहुतांश जिल्ह्यांची मे महिन्याची वेतन देयके ‘शालार्थ’ प्रणालीमध्ये अंतिम करून फॉरवर्ड करण्यात आली आहेत.
त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांच्या मे महिन्याच्या पगारात ही रक्कम समाविष्ट होऊ शकलेली नाही. यावर मार्ग काढत प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, ज्यांना मे महिन्याच्या पगारामध्ये ही थकबाकी (DA Arrears) मिळणार नाही, अशा सर्व कर्मचाऱ्यांना सदर कालावधीतील रक्कम जून २०२६ च्या वेतनासोबत रोखीने दिली जाईल.
महागाई थकबाकी किती मिळणार येथे चेक करा
वेतन निश्चिती आणि वाटपाच्या प्रक्रियेत कोणतीही तांत्रिक अडचण येऊ नये याची काळजी प्रशासनाने घेतली आहे. शालार्थ प्रणालीमध्ये या थकबाकीच्या वाटपासाठी आवश्यक असणारा स्वतंत्र टॅब आणि योग्य त्या मर्यादा (व्हॅलिडेशन) तातडीने उपलब्ध करून देण्याचे आदेश महाआयटी (MahaIT) च्या प्रकल्प प्रमुखांना देण्यात आले आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांना त्यांच्या वाढीव भत्त्याची रक्कम पुढील महिन्याच्या वेतनासोबत विनाअडथळा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
अधिक माहितीसाठी : महागाई भत्त्याची थकबाकी (DA Arrears) बाबतचे अधिकृत परिपत्रक डाउनलोड करा








