अंगणवाडी, आशा व कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! महत्वाच्या मुद्यावर मंत्रालयात बैठक संपन्न

Published On: June 2, 2026
Follow Us
anganwadi-asha-contract-workers-update

कामगार मंत्री फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन (सिटू) संघटनेच्या प्रतिनिधींसमावेत मंत्रालयात नुकतीच एक महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत कंत्राटी, बांधकाम, घरकामगार, अंगणवाडी व आशा कर्मचाऱ्यांसह विविध घटकातील कामगारांच्या प्रश्नावर सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीतील ठळक मुद्दे सविस्तर पाहूया.

या बैठकीस उपसचिव स्वप्नील कापडणीस, उपसचिव रोशनी कदम, संघटनेचे प्रतिनिधी आबासाहेब चौगुले, धर्मा कांबळे, अशोक थोरात, किरण मोघे आदी उपस्थित होते. या बैठकीत कंत्राटी, बांधकाम, घरकामगार, अंगणवाडी कर्मचारीआशा कर्मचाऱ्यांसह विविध घटकांच्या प्रलंबित मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीतील ठळक मुद्दे

मंत्री म्हणाले की, विविध उद्योग क्षेत्रांतील असंघटित कामगारांच्या प्रश्नांचे पुनरावलोकन करण्यात यावे. किमान वेतन सल्लागार मंडळाची स्थापना करून कंत्राटी कामगारांचे प्रश्न निकाली काढण्यात येतील. समान वेतन कायद्याची प्रभावी अंमलबजावणीसह विविध उद्योगांसाठी किमान वेतन निश्चिती, सफाई तसेच घरकामगारांसाठी स्वतंत्र धोरण ठरविण्यात येईल. यावेळी अंगणवाडी व आशा कर्मचाऱ्यांना विविध सामाजिक सुरक्षा लाभ उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा करण्यात आली.

मंत्री ॲड. फुंडकर यांनी कामगार कल्याणासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सांगत बांधकाम कामगार नोंदणी प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी सध्या ४१ पथके कार्यरत असून तपासणी सुरू आहे. आधार संलग्नीकरणाची प्रक्रिया वेगाने राबविण्यात येत आहे.

पात्र घर कामगारांना संबंधित योजनांचा लाभ मिळावा, यासाठी आवश्यक कार्यवाही सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले. राज्यातील कामगारांसाठी कल्याणकारी उपाययोजनांना अधिक बळकटी देण्यासाठी जुलै अखेरपर्यंत संबंधित कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

कामगारांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासन सकारात्मक असून यासाठी सर्व संबंधित घटकांशी समन्वय साधून कार्यवाही करण्यात येईल, असेही कामगार मंत्री ॲड. फुंडकर यांनी यावेळी स्पष्ट केले.

राज्यातील विविध कामगार घटकांच्या मागण्या आणि प्रश्नांचा सर्वंकष अभ्यास करून, आवश्यक ती पडताळणी पूर्ण झाल्यानंतर शासन स्तरावर योग्य तो धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल, असे कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर यांनी सांगितले.

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Posts

Anukampa Niyukati Prastav

अनुकंपा नियुक्तीसाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

August 14, 2026
retirement-after-government-residence-child-education-maharashtra-gr

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी राज्य शासनाचा महत्वपूर्ण निर्णय! पाल्याच्या शिक्षणासाठी शासनाने दिली मोठी सवलत

August 14, 2026
aasha gatparvartak meeting 2026

राज्यातील आशा गटप्रवर्तकांच्या विविध प्रश्नांबाबत बैठक संपन्न; बैठकीतील ठळक मुद्दे

August 12, 2026
arogya-vibhag-badli-new-policy-gr-2026

आरोग्य विभाग बदली धोरणात मोठा बदल! गट-क व गट-ड कर्मचाऱ्यांना आता विनंती बदलीसाठी नवीन तरतूद

August 11, 2026
arogya vibhag employee latest update

NHM कर्मचारी समायोजन, रिक्त पदभरती आणि पदोन्नतीला गती देण्याचे मंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश

August 8, 2026
public-health-department-state-training-policy-maharashtra-2026

महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागासाठी नवीन राज्य प्रशिक्षण धोरण; सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण बंधनकारक

August 8, 2026

Leave a Comment