राज्यातील आरोग्य विभागात 5 हजार 223 नवीन पदांची निर्मिती; राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Published On: June 25, 2026
Follow Us
Arogya Vibhag Bharti 2026 GR

Arogya Vibhag Bharti 2026 GR : महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने राज्यातील आरोग्य व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भागातील जनतेला दर्जेदार वैद्यकीय सुविधा पुरवण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. शासनाने नव्याने निर्माण झालेल्या आणि श्रेणीवर्धित करण्यात आलेल्या विविध आरोग्य संस्थांमध्ये ५२२३ नवीन पदे निर्माण करण्यास अधिकृत मंजुरी दिली आहे.

या निर्णयामुळे आरोग्य क्षेत्रातील नोकरीच्या अनेक नवीन संधी उपलब्ध होणार असून, रुग्णांना देखील वेळेवर आणि पुरेशी आरोग्य सेवा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

आरोग्य विभागात 5 हजार 223 नवीन पदांची निर्मिती शासन निर्णय

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या २४ जून २०२६ च्या अधिकृत शासन निर्णयानुसार, ज्या नवनिर्मित किंवा श्रेणीवर्धित आरोग्य संस्थांचे ५० टक्क्यांपेक्षा जास्त बांधकाम पूर्ण झाले आहे, अशा एकूण २५९ रुग्णसंस्थांसाठी या पदांची निर्मिती करण्यात आली आहे.

या संस्थांचा गाडा हाकण्यासाठी एकूण ७९५५ पदांची आवश्यकता होती. यापैकी २७३२ पदांना उच्चस्तर सचिव समितीने यापूर्वीच मान्यता दिली होती. आता उर्वरित ५२२३ नवीन पदांच्या निर्मितीला नव्याने मंजुरी देण्यात आली आहे. या संपूर्ण प्रक्रियेसाठी शासनाच्या तिजोरीवर वार्षिक अंदाजे ३२०.०१ कोटी रुपयांचा आवर्ती खर्च अपेक्षित असून, या खर्चाला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देखील मिळाली आहे.

या पदनिर्मितीचा फायदा राज्यातील अनेक महत्त्वाच्या रुग्णालयांना होणार आहे. यामध्ये प्रामुख्याने ठाणे आणि बीड येथील जिल्हा रुग्णालयांचा समावेश असून त्यांची क्षमता ५०० खाटांपर्यंत वाढवण्यात आली आहे, तर अकोला येथे १०० खाटांचे जिल्हा रुग्णालय मंजूर करण्यात आले आहे.

यासोबतच मंचर (पुणे) आणि इचलकरंजी (कोल्हापूर) येथील सामान्य रुग्णालये, ठाणे आणि नाशिक येथील संदर्भ सेवा रुग्णालये, आणि छत्रपती संभाजीनगर येथील ४०० खाटांचे स्त्री रुग्णालय यांसारख्या मोठ्या संस्थांना या निर्णयाचा थेट लाभ मिळेल.

याशिवाय, राज्यातील अनेक ग्रामीण रुग्णालये, ५० व १०० खाटांची उपजिल्हा रुग्णालये, ट्रॉमा केअर युनिट्स, आयुष रुग्णालये आणि नव्याने स्थापन होणाऱ्या १५८ उपकेंद्रांमध्येही मोठ्या प्रमाणावर वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, तंत्रज्ञ, सफाईगार आणि वर्ग-४ कर्मचाऱ्यांची पदे भरली जाणार आहेत.

नोकरीस इच्छुक असणाऱ्या उमेदवारांसाठी या शासन निर्णयात एक अत्यंत महत्त्वाची अट शासनाने स्पष्ट केली आहे. या सर्व आरोग्य संस्थांचे ५० टक्के बांधकाम पूर्ण झाले असले तरीही, प्रत्यक्ष कर्मचारी नियुक्ती ही इमारतीचे १०० टक्के बांधकाम पूर्ण झाल्यानंतरच केली जाणार आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधित इमारतीचे काम पूर्ण झाल्याचे आणि ती रुग्णसेवेसाठी वापरण्यास योग्य असल्याचे प्रमाणपत्र (Occupation Certificate) दिल्यानंतरच या नव्याने निर्माण झालेल्या पदांवर कर्मचाऱ्यांना रुजू करून घेण्याची कार्यवाही केली जाईल. त्यामुळे बांधकाम पूर्ण होण्याच्या टप्प्यावर असलेल्या रुग्णालयांमध्ये लवकरच ही भरती प्रक्रिया सुरु होण्याची दाट शक्यता आहे.

Arogya Vibhag Bharti 2026 GR PDF

आरोग्य विभाग नवीन पदांची निर्मितीशासन निर्णय डाउनलोड करा
आरोग्य विभागअधिकृत वेबसाईट

शासन निर्णय

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Posts

arogya sevika bharti new gr

आरोग्य सेविका भरतीसाठी मोठा बदल; पात्रता गुणांची मर्यादा 45 वरून 35 टक्के – शासन निर्णय

August 13, 2026
shikshaketar-padbharti-GR

राज्यातील या शाळांमध्ये शिक्षकेतर पदभरतीला शासनाची मंजुरी; 80 टक्के पदे भरता येणार

August 12, 2026
Pavitra Portal Teacher Recruitment

पवित्र पोर्टलवर प्राधान्यक्रम लॉक करण्यास या तारखेपर्यंत मुदतवाढ; 30 हजारांहून अधिक शिक्षक पदांची भरती प्रक्रिया सुरू

August 11, 2026
maharojgar melava 2026-27

राज्यात 1 हजार रोजगार मेळावे; युवकांना नोकरीसाठी दोन आठवड्यांचे विशेष प्रशिक्षण मिळणार

August 5, 2026
talathi bharti notification 2026

तलाठी पदांच्या 1539 जागांसह MPSC गट क पदांची सुधारित जाहिरात प्रसिद्ध, डाउनलोड डायरेक्ट लिंक

August 3, 2026
public-exam-malpractice-bill-2026

लोकसभेत सार्वजनिक परीक्षा (गैरप्रकार प्रतिबंधक) सुधारणा विधेयक 2026 मंजूर; पेपरफुटी प्रकरणांत 10 वर्षांपर्यंत कारावासाची तरतूद

August 2, 2026

Leave a Comment