अंगणवाडी सेविका व मदतनीस जुलै 2026 चे मानधन व प्रोत्साहन भत्ता मंजूर, शासन निर्णय जारी

Published On: July 28, 2026
Follow Us
anganwadi sevika salary july 2026

महाराष्ट्र राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस कर्मचाऱ्यांच्या माहे जुलै 2026 महिन्याचे मानधन आणि प्रोत्साहन भत्ता मंजूर करण्यात आला आहे. याबाबतचा महिला व बालविकास विभाग शासन निर्णय दिनांक 28 जुलै 2026 रोजी निर्गमित करण्यात आला आहे.

अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना जुलै 2026 चे मानधन अदा करण्यासाठी अतिरिक्त ₹174 कोटी निधी मंजूर केला आहे. हा निधी एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमार्फत वितरित करण्यात येणार आहे.

या शासन निर्णयानुसार एकात्मिक बाल विकास सेवा (ICDS) योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना जुलै 2026 चे मानधन व प्रोत्साहन भत्ता वेळेत मिळावा, यासाठी अतिरिक्त राज्य हिस्सा मंजूर करण्यात आला आहे. यापूर्वी वितरित करण्यात आलेल्या निधीव्यतिरिक्त आता ₹174 कोटींची अतिरिक्त तरतूद करण्यात आली आहे.

anganwadi sevika salary july 2026

अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता बाबत शासन निर्णय डाउनलोड करा

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment