CET 2025 BEd Normalization कसे होणार? सोप्या उदाहरणासह जाणून घ्या!

Published On: April 27, 2025
Follow Us
CET 2025 BEd Normalization

CET 2025 BEd Normalization CET Cell ने CET 2025 B.Ed प्रवेश परीक्षा वेगवेगळ्या शिफ्टमध्ये परीक्षा घेतल्या आहेत. प्रत्येक शिफ्टमध्ये प्रश्नपत्रिका वेगळी असते, यामुळे कोणालाही अन्याय होऊ नये म्हणून, परीक्षेचा निकाल Normalization पद्धतीने जाहीर केला जाणार आहे. याबाबतची सूचना cetcell.mahacet.org या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे. Normalisation document for BEd CET 2025 नेमकं कसं होणार आहे! याबद्दलची माहिती पाहूया.

Normalization पद्धती म्हणजे काय?

Normalization म्हणजे सर्व विद्यार्थ्यांना समान संधी मिळावी म्हणून त्यांचे गुण (Raw Score) एका ठराविक पद्धतीने बदलून (Adjust करून) Percentile Score मध्ये रूपांतर करणे.

यामध्ये शेवटी सगळ्यांचा निकाल एकाच स्केलवर मोजला जातो, कठीण पेपर दिलेल्या विद्यार्थ्यांना थोडीफार भरपाई मिळते तसेच सोपा पेपर दिलेल्या विद्यार्थ्यांचे गुण थोडे कमी विचारले जातात.

CET 2025 BEd Normalization कसे होणार? सोप्या उदाहरणासह जाणून घ्या!

1. विद्यार्थ्यांचे गट (Batch) तयार होतील:
परीक्षा वेगवेगळ्या दिवशी व शिफ्टमध्ये झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना 4 गटांमध्ये विभागण्यात आले आहे:

  • Day 1 – Batch 1 (D1-B1)
  • Day 1 – Batch 2 (D1-B2)
  • Day 2 – Batch 1 (D2-B1)
  • Day 2 – Batch 2 (D2-B2)

2. प्रत्येक गटाचा स्वतंत्र निकाल (Raw Score) तयार होईल:
प्रत्येक गटात प्रत्येक विद्यार्थ्याचा वास्तविक गुण नोंदवला जाईल.

3. Percentile Score काढला जाईल:
प्रत्येक विद्यार्थ्याचा Percentile खालील सूत्राने काढला जाईल:

Percentile=(ज्या विद्यार्थ्याचे गुण कमी किंवा बरोबरीचे आहेत त्या विद्यार्थ्यांची संख्या​)/ एकूण परीक्षार्थी ×100

4. सर्व गटांचे Percentile एकत्रित केले जातील:
चारही गटांचे Percentile एकत्र करून एक Final CET 2025 B.Ed निकाल तयार केला जाईल.

उदाहरणार्थ

समजा,

  • पहिली शिफ्ट (Session 1) मधील सर्वाधिक गुण = 82
  • दुसरी शिफ्ट (Session 2) मधील सर्वाधिक गुण = 70
  • तिसरी शिफ्ट (Session 3) मधील सर्वाधिक गुण = 95
  • चौथी शिफ्ट (Session 4) मधील सर्वाधिक गुण = 95

तर, प्रत्येक शिफ्टमध्ये जास्तीत जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला 100 Percentile दिला जाईल.

उदा.

  • जर तुमचे गुण 70 आहेत आणि दुसऱ्या सत्रात सर्वाधिक गुण 70 आहेत, तर तुम्हाला 100 Percentile मिळेल.
  • जर तुमचे गुण 60 आहेत, आणि त्या सत्रात 70 हे सर्वाधिक गुण आहेत, तर तुमचा Percentile साधारणपणे 81-90 च्या दरम्यान येईल.

Normalization म्हणजे:
“तुमच्या गुणांचा इतर विद्यार्थ्यांशी तुलना करून तुमचे स्थान (Percentile) ठरवणे, आणि निकाल त्या Percentile नुसार जाहीर करणे.”

CET 2025 BEd Normalization चे मुख्य मुद्दे

  • एकाच दिवशी, वेगवेगळ्या शिफ्टमुळे पेपर सोपा/कठीण झाला तरी काळजी करू नका.
  • Normalization नुसार सर्व विद्यार्थ्यांना योग्य न्याय दिला जाईल.
  • Final Merit List ह्या Normalized Percentile नुसार तयार होईल.
  • Percentile आणि Percentage वेगळे असतात.
    (Percentile = इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत तुमचे स्थान)

CET 2025 B.Ed मध्ये निकाल फक्त Raw Score वर आधारित नसेल, तर Normalization नंतर मिळालेल्या Percentile Score वर आधारित असेल.

अधिक माहितीसाठी : Normalisation document for BEd CET 2025 येथे डाउनलोड करा

अधिकृत वेबसाईट : https://cetcell.mahacet.org/

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Posts

pa-system-for-schools

मोठा निर्णय! राज्यातील 16 हजार शाळांमध्ये बसणार स्पीकर सेट PA सिस्टीम; शासन निर्णय निर्गमित

July 29, 2026
MBBS internship latest news Maharashtra

एमबीबीएस विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! एक वर्षाची सामाजिक दायित्व सेवा सक्ती रद्द; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

July 26, 2026
Pavitra Portal shikshak bharti

पवित्र पोर्टल शिक्षक भरतीच्या कार्यपद्धतीत सुधारणा; शासन निर्णय निर्गमित (24 जुलै 2026)

July 25, 2026
samagra-shiksha-funds-increase

‘समग्र शिक्षा’च्या निधीत वाढ करण्यात यावी; केंद्रीय परिषदेत शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांची मागणी

July 23, 2026
PM YASASVI Scholarship 2026

पीएम-यशस्वी शिष्यवृत्ती योजना 2026-27: ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन; या पात्र विद्यार्थ्यांना 1.25 लाखांपर्यंत आर्थिक मदत

July 22, 2026
kendra stariy shikshan parishad

केंद्रस्तरीय शिक्षण परिषद 2026-27: जुलै विषय सूची, सुधारित मार्गदर्शिका PDF डाउनलोड

July 20, 2026

Leave a Comment