Polytechnic Admission Application Deadline Extended महाराष्ट्रातील प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकी (First Year Diploma Engineering) अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचा प्रचंड उत्साह दिसून येत आहे. आत्तापर्यंत 1 लाख 28 हजार 102 उमेदवारांनी (1.28 Lakh Candidates) नोंदणी केली असून, त्यापैकी 1 लाख 10 हजार विद्यार्थ्यांनी (1.10 Lakh Students) आपले अर्ज शुल्क भरून सादर केले आहेत. ही वाढती संख्या पाहता, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री (Higher and Technical Education Minister) चंद्रकांत पाटील यांनी विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी अर्ज सादर करण्याच्या अंतिम मुदतीत वाढ करण्याचे निर्देश दिले आहेत.
Polytechnic Admission Application Deadline Extended 2025
विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद आणि त्यांना प्रमाणपत्रे मिळण्यास होणारा संभाव्य उशीर लक्षात घेऊन, कोणत्याही विद्यार्थ्याला प्रवेशापासून वंचित राहावे लागू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, आता पॉलिटेक्निक प्रवेशासाठी (Polytechnic Admissions) अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 26 जून 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे.
या संदर्भातील सविस्तर वेळापत्रक, प्रवेश प्रक्रियेची संपूर्ण माहिती आणि अर्ज भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती तंत्र शिक्षण संचालनालयाच्या (Directorate of Technical Education – DTE) अधिकृत वेबसाइट https://dte.maharashtra.gov.in येथे उपलब्ध आहे, असे मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले.
या मुदतवाढीमुळे अनेक विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार असून, ज्यांनी अजून अर्ज केले नाहीत किंवा ज्यांना काही कारणास्तव अर्ज करण्यास उशीर झाला आहे, त्यांना आता पुरेसा वेळ मिळणार आहे. त्यामुळे इच्छुक विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेऊन वेळेत आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिकृत वेबसाईट : https://poly25.dtemaharashtra.gov.in/diploma25/
