नोंदणी व मुद्रांक विभागातील भरती परीक्षा दिनांक जाहीर, परीक्षेचे स्वरूप, अभ्यासक्रम संपूर्ण महिती – IGR Maharashtra Bharti Exam Date 2025

Published On: June 18, 2025
Follow Us
IGR Maharashtra Bharti Exam Date 2025

IGR Maharashtra Bharti Exam Date 2025 नोंदणी व मुद्रांक विभागात शिपाई गट-ड संवर्गातील 284 पदांच्या भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे. या पदांसाठीची ऑनलाइन परीक्षा 1 ते 8 जुलै 2025 या कालावधीत घेतली जाईल, अशी माहिती नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक रवींद्र बिनवडे यांनी दिली आहे.

IGR Maharashtra Bharti Exam Date 2025

IGR Maharashtra Bharti Exam Date 2025 या भरतीसाठी 22 एप्रिल 2025 रोजी वृत्तपत्रांमध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर, अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया 22 एप्रिल ते 16 मे 2025 या कालावधीत इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS) या कंपनीमार्फत ऑनलाइन पद्धतीने पूर्ण करण्यात आली. IBPS लाच परीक्षा आयोजित करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

IGR Maharashtra Bharti Exam Syllabus 2025

शिपाई गट ‘ड’ संवर्गाच्या परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम खालीलप्रमाणे आहे:

परीक्षेचे स्वरूप

  • परीक्षा ऑनलाइन (Computer Based Test) पद्धतीने घेतली जाईल.
  • परीक्षेसाठी एकूण 100 प्रश्न असतील आणि एकूण 200 गुण असतील.
  • परीक्षेचा कालावधी 120 मिनिटे (2 तास) असेल.
  • प्रत्येक प्रश्नासाठी 2 गुण दिले जातील.
  • गुणवत्ता यादीमध्ये अंतर्भाव होण्यासाठी उमेदवारांना एकूण गुणांच्या किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक आहे.
  • प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी 5 पर्याय उपलब्ध असतील.
  • परीक्षेसाठी नकारात्मक गुणपद्धती (Negative Marking) लागू केली जाणार नाही.

अभ्यासक्रम

अ.क्र.परीक्षेचे नावएकूण प्रश्नकमाल गुणमाध्यमकालावधी
1.इंग्रजी2550इंग्रजी30 मिनिटे
2.मराठी2550मराठी30 मिनिटे
3.सामान्य ज्ञान2550मराठी व इंग्रजी30 मिनिटे
4.बौद्धिक चाचणी/अंकगणित2550इंग्रजी30 मिनिटे
एकूण100200120 मिनिटे

ज्या उमेदवारांनी यशस्वीरित्या अर्ज भरले आहेत आणि जे पात्र आहेत, त्यांना परीक्षेसाठीचे प्रवेशपत्र (हॉल तिकीट) त्यांनी नोंदणी केलेल्या ई-मेल आयडीवर IBPS कडून पाठवले जातील.

दहावी पास उमेदवारांसाठी परमनंट नोकरीची संधी! जाहिरात, ऑनलाईन अर्ज डायरेक्ट लिंक

फसवणुकीपासून सावध रहा!

नोंदणी व मुद्रांक विभागाने उमेदवारांना एक महत्त्वाचे आवाहन केले आहे. या परीक्षेसंदर्भात विभागाने कोणत्याही इतर एजन्सीची किंवा मध्यस्थाची नियुक्ती केलेली नाही. जर कोणतीही व्यक्ती, संस्था किंवा मध्यस्थ तुम्हाला या भरती प्रक्रियेत मदत करण्याचे आमिष दाखवत असेल, तर त्यांच्यापासून सावध राहावे, असे आवाहन विभागाने केले आहे. अशा कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका.

अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या – https://igrmaharashtra.gov.in/

प्रवेशपत्र हॉल तिकीट : https://ibpsonline.ibps.in/igrcsfeb25/

IGR Maharashtra Bharti Syllabus

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Posts

Maharashtra Anganwadi Bharti 2026

अंगणवाडी सेविका, मदतनीस भरतीची संपूर्ण माहिती

February 1, 2026
NHM Raigad Recruitment 2026

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), रायगड अंतर्गत रिक्त पदांसाठी मोठी भरती जाहीर

January 11, 2026
Maharashtra Shikshak Bharti

शिक्षक भरती प्रक्रियेत मोठा बदल! आता ‘ही’ संस्था राबवणार संपूर्ण प्रक्रिया; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

January 7, 2026
Maha CET Cell Recruitment 2026

राज्याच्या सीईटी सेलमध्ये मोठी भरती! आता आपल्याच जिल्ह्यात मिळणार काम! ‘या’ पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू, वाचा सविस्तर

December 28, 2025
MPSC Rajyaseva Notification 2026 PDF Download

MPSC Rajyaseva 2026: राज्यसेवा पूर्व परीक्षा नवीन जाहिरात प्रसिद्ध, सविस्तर माहिती जाणून घ्या 

December 26, 2025
University Professor Recruitment

मोठी बातमी! राज्यातील विद्यापीठांतील प्राध्यापक पदभरतीचा मार्ग मोकळा; ’60:40′ सूत्र निश्चित, गुणवत्तेवर भर – उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

December 14, 2025

Leave a Comment