GMC Aurangabad Recruitment 2025 दहावी पास उमेदवारांसाठी परमनंट नोकरीची संधी! 357 रिक्त पदांसाठी भरती सुरू!

Published On: June 10, 2025
Follow Us
GMC Aurangabad Recruitment 2025

GMC Aurangabad Recruitment 2025 शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, छत्रपती संभाजीनगर अंतर्गत गट-ड (वर्ग-४) व इतर समकक्ष 3,57 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी फक्त माध्यमिक शालांत परीक्षा (१०वी) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. भरतीचा संपूर्ण तपशील पाहूया.

GMC Aurangabad Recruitment 2025

पदांचा तपशील आणि वेतनश्रेणी: GMC Aurangabad Recruitment 2025

  • शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर:
    • चतुर्थश्रेणी कर्मचारी व समकक्ष पदे: ३० जागा (वेतनश्रेणी एस-१: रु. १५,०००-४७,६००)
    • आया: २ जागा (वेतनश्रेणी एस-१: रु. १५,०००-४७,६००)
    • माळी: ७ जागा (वेतनश्रेणी एस-१: रु. १५,०००-४७,६००)
    • प्रयोगशाळा परिचर: १८ जागा (वेतनश्रेणी एस-६: रु. १९,९००-६३,२००)
  • शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, छत्रपती संभाजीनगर:
    • चतुर्थश्रेणी कर्मचारी व समकक्ष पदे: २८५ जागा (वेतनश्रेणी एस-१: रु. १५,०००-४७,६००)
    • दाया: १ जागा (वेतनश्रेणी एस-१: रु. १५,०००-४७,६००)
    • वॉयलर चालक: १ जागा (वेतनश्रेणी एस-१: रु. १५,०००-४७,६००)
    • पाणक्या: १ जागा (वेतनश्रेणी एस-१: रु. १५,०००-४७,६००)
    • ड्रेसर: २ जागा (वेतनश्रेणी एस-१: रु. १५,०००-४७,६००)
    • माळी: ४ जागा (वेतनश्रेणी एस-१: रु. १५,०००-४७,६००)
    • नाभिक: ६ जागा (वेतनश्रेणी एस-१: रु. १५,०००-४७,६००)

शैक्षणिक पात्रता: उमेदवाराने मान्यताप्राप्त मंडळाची माध्यमिक शालांत परीक्षा (१०वी) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच, मराठी भाषेचे ज्ञान असणे अनिवार्य आहे.

वयोमर्यादा (३०/०५/२०२५ रोजी):

  • खुला प्रवर्ग: किमान १८ वर्षे ते कमाल ३८ वर्षे.
  • मागासवर्गीय उमेदवार: किमान १८ वर्षे ते कमाल ४३ वर्षे. (क्रिमीलेयरमध्ये मोडणाऱ्यांना वयाची सवलत लागू नाही. )
  • पदवीधर अंशकालीन उमेदवार: कमाल ५५ वर्षे.
  • स्वतंत्र सैनिकांचे पाल्य, १९९१ जनगणना कर्मचारी व १९९४ नंतरचे निवडणूक कर्मचारी: कमाल ४५ वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांसाठीही).
  • खेळाडू उमेदवार: विहित वयोमर्यादेत ५ वर्षांची शिथिलता, कमाल ४३ वर्षे.
  • दिव्यांग उमेदवार: कमाल ४५ वर्षे. किमान ४०% दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र आवश्यक.
  • प्रकल्पग्रस्त व भूकंपग्रस्त उमेदवार: कमाल ४५ वर्षे.
  • माजी सैनिक: सशस्त्र दलातील सेवेइतका कालावधी अधिक ३ वर्षे, दिव्यांग माजी सैनिकांसाठी कमाल ४५ वर्षे.

अर्ज प्रक्रिया: अर्ज शासनाच्या ऑनलाइन प्रणालीद्वारे 24 जून 2025 पर्यंत मागविण्यात येत आहेत. (डायरेक्ट लिंक खाली दिलेली आहे)

परीक्षा शुल्क: खुला प्रवर्गासाठी रु. १,०००/- आणि मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील उमेदवारांसाठी रु. ९००/-. हे शुल्क नॉन-रिफंडेबल (परत न मिळणारे) आहे.

परीक्षा स्वरूप:

  • परीक्षा ऑनलाइन (Computer Based Test) पद्धतीने घेतली जाईल.
  • प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या असतील.
  • प्रत्येक प्रश्नाला २ गुण असतील.
  • एकूण २०० गुणांची परीक्षा (१०० प्रश्न) २ तासांची असेल.
  • विषय: मराठी (२५ प्रश्न – ५० गुण), इंग्रजी (२५ प्रश्न – ५० गुण), सामान्य ज्ञान (२५ प्रश्न – ५० गुण), बौध्दिक चाचणी/अंकगणित (२५ प्रश्न – ५० गुण).
  • परीक्षेचा दर्जा माध्यमिक शालांत परीक्षेच्या (एस.एस.सी.) समान असेल.
  • या पदांसाठी कोणतीही मुलाखत (मौखिक परीक्षा) घेतली जाणार नाही.
  • गुणवत्ता यादीत येण्यासाठी उमेदवारांना एकूण गुणांच्या किमान ४५% गुण मिळवणे आवश्यक आहे.

आरक्षण: शासनाच्या नियमानुसार संवैधानिक आरक्षण आणि समांतर आरक्षण लागू राहील. महिला, खेळाडू, दिव्यांग, अनाथ, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, पदवीधर अंशकालीन कर्मचारी इत्यादींसाठी आरक्षणाचे नियम लागू आहेत. आरक्षणाचा लाभ केवळ महाराष्ट्राच्या अधिवास असलेल्या उमेदवारांना मिळेल.

आवश्यक कागदपत्रे: अर्ज करताना संबंधित कागदपत्रे PDF स्वरूपात अपलोड करणे अनिवार्य आहे. यामध्ये अर्जातील नावाचा पुरावा, वयाचा पुरावा, शैक्षणिक अर्हतेचा पुरावा, सामाजिक मागासवर्गीय असल्याचा पुरावा, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र (लागू असल्यास), अधिवास प्रमाणपत्र, मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा आणि संबंधित आरक्षणासाठीचे प्रमाणपत्र/कागदपत्रे (उदा. खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधर कर्मचारी) यांचा समावेश आहे. मूळ प्रमाणपत्रे कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर करणे बंधनकारक आहे.

अधिक माहितीसाठी: पदांचा सविस्तर तपशील, परीक्षा दिनांक आणि इतर माहिती www.gmcaurangabad.com या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जाईल. उमेदवारांना प्रवेशपत्राद्वारे देखील कळविण्यात येईल.

अधिक माहितीसाठी : मूळ जाहिरात पीडीएफ डाउनलोड करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी डायरेक्ट लिंक : https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32976/93587/Index.html

अधिकृत वेबसाईट : http://www.gmcaurangabad.com/

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Posts

arogya sevika bharti new gr

आरोग्य सेविका भरतीसाठी मोठा बदल; पात्रता गुणांची मर्यादा 45 वरून 35 टक्के – शासन निर्णय

August 13, 2026
shikshaketar-padbharti-GR

राज्यातील या शाळांमध्ये शिक्षकेतर पदभरतीला शासनाची मंजुरी; 80 टक्के पदे भरता येणार

August 12, 2026
Pavitra Portal Teacher Recruitment

पवित्र पोर्टलवर प्राधान्यक्रम लॉक करण्यास या तारखेपर्यंत मुदतवाढ; 30 हजारांहून अधिक शिक्षक पदांची भरती प्रक्रिया सुरू

August 11, 2026
maharojgar melava 2026-27

राज्यात 1 हजार रोजगार मेळावे; युवकांना नोकरीसाठी दोन आठवड्यांचे विशेष प्रशिक्षण मिळणार

August 5, 2026
talathi bharti notification 2026

तलाठी पदांच्या 1539 जागांसह MPSC गट क पदांची सुधारित जाहिरात प्रसिद्ध, डाउनलोड डायरेक्ट लिंक

August 3, 2026
public-exam-malpractice-bill-2026

लोकसभेत सार्वजनिक परीक्षा (गैरप्रकार प्रतिबंधक) सुधारणा विधेयक 2026 मंजूर; पेपरफुटी प्रकरणांत 10 वर्षांपर्यंत कारावासाची तरतूद

August 2, 2026

Leave a Comment