Nashik Medical Officer Recruitment नाशिकसह 5 जिल्ह्यांमध्ये कंत्राटी वैद्यकीय अधिकारी पदांची भरती सुरू

By MarathiAlert Team

Updated on:

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Nashik Medical Officer Recruitment नाशिक मंडळ, आरोग्य सेवा उपसंचालक कार्यालयाने गट-ब वैद्यकीय अधिकारी (BAMS) पदांसाठी कंत्राटी पद्धतीने भरती जाहीर केली आहे. या भरती अंतर्गत नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर जिल्ह्यांसाठी एकूण 43 जागा भरण्यात येणार आहेत. ही पदे नाशिक परिमंडळातील विविध जिल्हा रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, नगरपरिषद दवाखाने, पोलिस दवाखाने आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये भरली जातील. या भरतीचा संपूर्ण तपशील पाहूया.

Nashik Medical Officer Recruitment संपूर्ण तपशील

पदांचा तपशील: नाशिक मंडळातील जिल्ह्यांनुसार रिक्त पदांची संख्या खालीलप्रमाणे आहे: (Nashik Medical Officer Recruitment)

  • धुळे: जिल्हा परिषद स्तर – 6, राज्य स्तर – 1
  • नाशिक: जिल्हा परिषद स्तर – 25, राज्य स्तर – 2
  • नंदुरबार: जिल्हा परिषद स्तर – 6
  • जळगाव: जिल्हा परिषद स्तर – 1
  • अहमदनगर: जिल्हा परिषद स्तर – 2
  • एकूण: जिल्हा परिषद स्तर – 40, राज्य स्तर – 3

महत्वाच्या अटी व शर्ती:

  • कालावधी: ही नियुक्ती 11 महिन्यांसाठी किंवा नियमित BAMS वैद्यकीय अधिकारी उपलब्ध होईपर्यंत, यापैकी जे आधी घडेल तोपर्यंत असेल.
  • सेवेचे स्वरूप: ही नियुक्ती पूर्णपणे तात्पुरत्या स्वरूपाची असून, उमेदवारांना नियमित वैद्यकीय अधिकाऱ्यांप्रमाणे रजा, विमा, भविष्य निर्वाह निधी किंवा इतर सेवाविषयक लाभ मिळणार नाहीत. तसेच, त्यांना वार्षिक वेतनवाढ मिळणार नाही. भविष्यात या पदावर कायमस्वरूपी नियुक्तीचा कोणताही अधिकार मिळणार नाही.
  • मुख्यालय आणि बायोमेट्रिक हजेरी: निवड झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना मुख्यालयात राहणे बंधनकारक असून, बायोमेट्रिक प्रणालीवर हजेरी लावणे अनिवार्य आहे.
  • मानधन: आदिवासी आणि दुर्गम भागात काम करणाऱ्या BAMS पात्रताधारकांना दरमहा 45,000/- रुपये, तर इतर भागात काम करणाऱ्यांना 40,000/- रुपये एकत्रित मानधन दिले जाईल.
  • करारनामा: निवड झालेल्या उमेदवारांना 500/- रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर उपसंचालक, आरोग्य सेवा, नाशिक मंडळ यांच्याशी करारनामा करावा लागेल.

अर्ज प्रक्रिया:

  • शैक्षणिक अर्हता: B.A.M.S.
  • अर्ज स्वीकारण्याचे ठिकाण: नाशिक परिमंडळातील ज्या जिल्ह्यात अर्ज करायचा आहे, त्या जिल्ह्यातील राज्य स्तर जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालये (नाशिक/धुळे) आणि जिल्हा परिषद स्तर जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद (नाशिक/धुळे/नंदुरबार/जळगाव/अहमदनगर) यांच्या कार्यालयात अर्ज स्वीकारले जातील.
  • अंतिम तारीख: 13 जून 2025 रोजी सायंकाळी 6.15 वाजेपर्यंत समक्ष किंवा पोस्टाने अर्ज स्वीकारले जातील.
  • मुलाखत: प्राप्त अर्जांची संख्या जास्त असल्यास, रिक्त पदांच्या संख्येनुसार 1:5 प्रमाणात गुणानुक्रमे उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. पदव्युत्तर पदवी धारकांना 5 अतिरिक्त गुण आणि शासकीय कामाचा अनुभव असल्यास प्रतिवर्षी 2 अतिरिक्त गुण मिळतील.
  • आवश्यक कागदपत्रे: मुलाखतीस येताना BAMS पदवी, सर्व वर्षांची गुणपत्रिका व प्रमाणपत्रे, पदव्युत्तर पदवीची गुणपत्रिका व प्रमाणपत्र, MCIM नोंदणी व नूतनीकरण प्रमाणपत्र, वयाचा दाखला, अनुभव प्रमाणपत्र, अलीकडील पासपोर्ट साईजचा फोटो आणि इतर आवश्यक प्रमाणपत्रांच्या मूळ प्रती व एक छायांकित संच, तसेच फोटो असलेले ओळखपत्र सोबत आणणे आवश्यक आहे.
  • वयोमर्यादा: अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 55 वर्षांपेक्षा जास्त नसावे.

इतर महत्वाचे:

  • मुलाखतीबाबतच्या सूचना, पात्र उमेदवारांची यादी, मुलाखतीचे स्थळ, दिनांक व वेळेतील बदल संबंधित जिल्ह्याच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केले जातील.
  • सदर रिक्त पदांची संख्या कमी किंवा जास्त होऊ शकते.
  • या भरतीबाबत सर्व निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हा निवड समितीकडे आहेत.

अधिक माहितीसाठी : मूळ जाहिरात पीडीएफ येथे डाउनलोड करा

अधिकृत वेबसाईट : https://nhm.maharashtra.gov.in/

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Read more

Leave a Comment

error: Content is protected !!