राष्ट्रीय आरोग्य अभियानातील 10 हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवासंबंधी निर्णय घेण्याची कार्यवाही सुरू – मंत्री प्रकाश आबिटकर

Published On: March 23, 2026
Follow Us
NHM Contractual Employees Services

आरोग्य विभागांमध्ये कंत्राटी पद्धतीने जिथे काम सुरू आहे. तिथे नियमानुसार कार्यवाही केली जात आहे. आरोग्य विभागातील पदभरती करण्याकरिता नवीन आकृतिबंध तयार करण्यात येत असून, विविध पदांची भरती टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे, असे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानसभेत तारांकित प्रश्नोत्तरावेळी सांगितले. सदस्य नाना पटोले यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता.

मंत्री आबिटकर म्हणाले की, आरोग्य विभागातील पदभरतीसाठी नवीन आकृतिबंध तयार करण्यात येत असून, विविध पदांची भरती टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे.

NHM अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या सेवासंबंधी निर्णय घेण्याची कार्यवाही सुरू

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सुमारे 10 हजार कर्मचारी कार्यरत असून, त्यांच्या सेवासंबंधीही निर्णय घेण्याची कार्यवाही सुरू आहे.

आरोग्य विभागात कंत्राटी पद्धतीने गट ‘क’ आणि गट ‘ड’ मधील कर्मचारी मोठ्या प्रमाणात कार्यरत असून, त्यांच्या वेतन आणि हक्कांबाबत तक्रारी आल्यास त्या गांभीर्याने घेतल्या जातील.

कंत्राटी तत्वावरील कर्मचाऱ्यांच्या हक्कांचे संरक्षण करताना सेवा अधिक परिणामकारक करण्यावर भर दिला जाणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

यावेळी सदस्य हेमंत ओगले, भास्कर जाधव यांनी उपप्रश्न उपस्थित करुन चर्चेत सहभाग घेतला.

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NRHM) शासन सेवेत समायोजन सुधारित शासन निर्णय काय आहे?

राज्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियान (NRHM) अंतर्गत काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा सुधारित शासन निर्णय जाहीर झाला आहे. 10 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवा समायोजनाबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे हजारो कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत येण्याची संधी मिळणार आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NRHM) अंतर्गत अनेक कर्मचारी कंत्राटी पद्धतीने काम करत आहेत. यातील अनेकांनी 10 वर्षांपेक्षा जास्त सेवा पूर्ण केली आहे. अशा कर्मचाऱ्यांना एकदाच विशेष बाब म्हणून नियमित पदावर समायोजन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

हा निर्णय विशेष आहे कारण तो नियमित भरती प्रक्रियेपेक्षा वेगळा असून, कर्मचाऱ्यांच्या दीर्घ सेवेला मान्यता देण्यासाठी घेतला गेला आहे.

10 वर्ष सेवा पूर्ण कर्मचाऱ्यांसाठी काय निर्णय?

शासन निर्णयानुसार 14 मार्च 2024 पर्यंत 10 वर्षे सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांनाच लाभ मिळणार असून, सार्वजनिक आरोग्य विभाग आणि ग्रामविकास विभागातील रिक्त पदांवर समायोजन होणार करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया एकदाच विशेष बाब म्हणून लागू केली जाणार असून, रिक्त पदे आणि पात्र कर्मचाऱ्यांची संख्या यामधील कमी संख्या विचारात घेतली जात आहे.

या निर्णयामध्ये 10 वर्ष सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांसाठी वयोमर्यादेची अट शिथिल करण्यात आली आहे. म्हणजेच, सेवा कालावधी इतकी वयोमर्यादा सवलत दिली जाईल, ज्यामुळे जास्तीत जास्त कर्मचारी पात्र ठरू शकतील.

NRHM Contract Employees Regularization अंतर्गत समायोजन झाल्यानंतर कर्मचाऱ्यांचे वेतन निश्चित करताना खालील गोष्टी लागू होतील.

कर्मचाऱ्यांना त्यांच्या मागील महिन्यात मिळालेल्या मानधनाच्या आधारावर नियमित वेतनश्रेणीत पुढील टप्प्यावर वेतन निश्चित केले जाईल. यामुळे कर्मचाऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार नाही, ही काळजी शासनाने घेतली आहे.

केंद्र शासनाने NRHM अंतर्गत वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. यामध्ये शैक्षणिक पात्रता ही महत्त्वाची अट असेल आणि त्यानुसारच समायोजन केले जाईल.

या प्रक्रियेसाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली काम करेल आणि कर्मचाऱ्यांच्या समायोजनासाठी आवश्यक निकष निश्चित करेल.

अधिक माहितीसाठी: राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे समायोजन सुधारित शासन निर्णय डाउनलोड करा

कंत्राटी कर्मचारी नियमितीकरण

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Posts

nhm-contract-employees-salary-pay-scale-gr-2026

NHM कर्मचाऱ्यांना 7 व्या वेतन आयोगानुसार कोणती वेतनश्रेणी लागू होणार? चेक करा

August 4, 2026
samagra shiksha contractual employees Regularization gr

राज्य सरकारचा कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी दूसरा मोठा निर्णय! समग्र शिक्षा कर्मचाऱ्यांचे शासन सेवेत समायोजन करण्याबाबत शासन निर्णय जारी

August 4, 2026
contractual employee regularization

या कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! शासकीय सेवेत सामावून घेण्यासह इतर मागण्याबाबत GR निर्गमित

August 3, 2026
nhm contractual employees regularization

NHM कंत्राटी कर्मचाऱ्यांचे प्रत्यक्ष समायोजन कधी होणार? शासनाच्या नव्या पत्रामुळे वाढल्या अपेक्षा; पुढची प्रक्रिया काय?

July 17, 2026
NHM Contract Employees 30 jun gr

NHM कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! अधिसंख्य पदांवर शासन सेवेत समायोजन; शासन निर्णय जारी

July 17, 2026
daily-wage-workers-gratuity-rights

अखेर! या रोजंदारी कर्मचाऱ्यांचे उपदान, व्याजासह थकबाकी मंजुर, शासन निर्णय जारी

July 17, 2026

Leave a Comment