Maha Aastha E HRMS : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ‘महा-आस्था’ प्रणाली जाहीर जाणून घ्या सविस्तर

Published On: June 21, 2025
Follow Us
Maha Aastha E Hrms

Maha Aastha E Hrms महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने “महा-आस्था (Maha-AASTHA) (E Hrms)” प्रणाली लागू करण्याच्या पूर्वतयारीसाठी महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. २० जून, २०२५ रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार, ही प्रणाली शासकीय कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक बाबी डिजिटल करण्यासाठी आणि त्यांना वेळेवर लाभ देण्यासाठी तयार केली जात आहे.

Maha Aastha E Hrms संपूर्ण माहिती

महा-आस्था प्रणालीचे उद्दीष्ट: मुख्यमंत्री महोदयांच्या १५० दिवसांच्या सेवाकर्मी कार्यक्रमांतर्गत, सेवापुस्तके अद्ययावत करणे आणि अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक तपशीलवार माहितीचे ऑनबोर्डिंग करणे याला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे.

या प्रणालीचा मुख्य उद्देश शासकीय अधिकारी/कर्मचाऱ्यांना सेवेदरम्यान मिळणारे लाभ (उदा. स्थायित्व प्रमाणपत्र, नियमित वेतनवाढ) आणि सेवानिवृत्तीनंतरचे लाभ (उदा. सेवानिवृत्ती वेतन, उपदान, रजा रोखीकरण) वेळेवर आणि सुलभपणे मिळवून देणे आहे. यासाठी कर्मचाऱ्यांच्या ‘नियुक्ती ते सेवानिवृत्ती’ पर्यंतच्या सर्व सेवा एकाच प्रणालीशी जोडण्याचा मानस आहे.

सामान्य प्रशासन विभागामार्फत विकसित करण्यात येत असलेली ई-मानव संसाधन व्यवस्थापन प्रणाली (e-HRMS) [महा-आस्था (Maharashtra Advanced Administrative System for Transparent Human Resource Administration)] याच दिशेने एक पाऊल आहे. या प्रणालीअंतर्गत शासकीय कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक नोंदी असलेले ई-सेवापुस्तक तयार करण्याचे नियोजन आहे.

पूर्व तयारीसाठीच्या सूचना: महा-आस्था प्रणाली पूर्णपणे कार्यान्वित होण्यासाठी प्रशासकीय विभागांनी खालीलप्रमाणे पूर्वतयारी करणे आवश्यक आहे:

१. महा-आस्था कक्षाची स्थापना: प्रत्येक मंत्रालयीन विभागाने त्यांच्या उपलब्ध मनुष्यबळातून “महा-आस्था” हा स्वतंत्र कक्ष कायमस्वरूपी स्थापन करावा. या कक्षाची रचना सह/उप सचिव (आस्थापना) यांच्या अध्यक्षतेखाली असावी, ज्यात अवर सचिव/कक्ष अधिकारी, सहायक कक्ष अधिकारी, लिपिक-टंकलेखक आणि शिपाई यांचा समावेश असेल. सह सचिव/उप सचिव हे नोडल अधिकारी म्हणून काम करतील आणि सामान्य प्रशासन विभागासाठी संपर्क बिंदू (SPOC) असतील. नियुक्त नोडल अधिकाऱ्यांची माहिती (नाव, पदनाम, ई-मेल, भ्रमणध्वनी क्रमांक) कक्ष स्थापनेच्या आदेशासह ३० जून, २०२५ पर्यंत gad.maha-aastha@mah.gov.in या ई-मेलवर पाठवावी.

२. महा-आस्था कक्षाने करावयाची कामे:

  • ई-मेल आयडी तयार करणे: प्रत्येक कक्षासाठी <Dept_name><dot>maha-aastha@mah.gov.in या स्वरूपात स्वतंत्र ई-मेल आयडी तयार करावा. तसेच, मंत्रालयीन विभागातील सर्व अधिकारी/कर्मचारी ई-ऑफिस प्रणालीवर कार्यरत असल्याची खात्री करावी आणि ज्या कर्मचाऱ्यांकडे शासकीय ई-मेल आयडी नाहीत, त्यांना ते उपलब्ध करून द्यावेत.
  • प्रशासकीय संरचनेचा तक्ता (Organogram) तयार करणे: प्रत्येक मंत्रालयीन विभागाने मंजूर आकृतिबंधानुसार कार्यालय प्रमुखांपासून निम्नतम स्तरापर्यंत गट व संवर्गनिहाय तपशील ‘परिशिष्ट “अ”‘ प्रमाणे एक्सेल फॉरमॅटमध्ये इंग्रजीत तयार करावा. ही माहिती नोडल अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने ३० जून, २०२५ पर्यंत gad.maha-aastha@mah.gov.in या ई-मेलवर सादर करावी.
  • सेवापुस्तकातील नोंदी अद्ययावत करणे: आहरण व संवितरण अधिकारी (DDO) यांच्या समन्वयाने मंत्रालयीन प्रशासकीय विभागातील सर्व अधिकारी/कर्मचारी यांच्या सेवापुस्तकातील १५ जुलै, २०२५ पर्यंतच्या सर्व नोंदी अद्ययावत कराव्यात. सेवापुस्तकात नोंदविल्या जाणाऱ्या अनिवार्य व इतर बाबींचा तपशील ‘परिशिष्ट “ब”’ मध्ये नमूद केला आहे. नोंदीच्या अनुषंगाने निर्गमित केलेले आदेश, अभिलेख, प्रमाणपत्र इत्यादी सेवापुस्तकास जोडून ठेवावेत. कर्मचाऱ्यांकडून त्यांच्याशी संबंधित सर्व नोंदी प्रमाणित करून घ्याव्यात आणि DDO च्या स्वाक्षरीने प्रमाणित कराव्यात. दर सोमवारी पूर्ण झालेल्या सेवापुस्तकांची संख्यात्मक माहिती सामान्य प्रशासन विभागाला ई-मेलद्वारे पाठवावी. सद्यस्थितीत सेवापुस्तके स्कॅन करू नयेत; याबाबत स्वतंत्र सूचना देण्यात येतील. स्कॅनिंग सुलभ होण्यासाठी सेवापुस्तके सुस्थितीत (उदा. फाटलेली पाने दुरुस्त करणे) ठेवण्याची कार्यवाही प्राधान्याने करावी.

३. केलेल्या कामाकाजाचा नियमित अहवाल सादर करणे: महा-आस्था प्रणालीच्या पूर्वतयारीसाठी विभागांनी करावयाच्या कामाचे वेळापत्रक ‘परिशिष्ट “क”‘ मध्ये जोडले आहे. या वेळापत्रकानुसार कामाच्या पूर्णत्वाचा नियमित अहवाल नोडल अधिकाऱ्यांनी gad.maha-aastha@mah.gov.in या ई-मेलवर सादर करावा. काही अडचणी उद्भवल्यास नोडल अधिकाऱ्यांनी श्री. प्रशांत बडगेरी, सह सचिव, सामान्य प्रशासन विभाग यांच्याशी gad.maha-aastha@mah.gov.in या ई-मेलवर संपर्क साधावा.

अधिक माहितीसाठी : शासन निर्णय वाचा

शासन निर्णय

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Posts

Anukampa Niyukati Prastav

अनुकंपा नियुक्तीसाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

August 14, 2026
retirement-after-government-residence-child-education-maharashtra-gr

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी राज्य शासनाचा महत्वपूर्ण निर्णय! पाल्याच्या शिक्षणासाठी शासनाने दिली मोठी सवलत

August 14, 2026
aasha gatparvartak meeting 2026

राज्यातील आशा गटप्रवर्तकांच्या विविध प्रश्नांबाबत बैठक संपन्न; बैठकीतील ठळक मुद्दे

August 12, 2026
arogya-vibhag-badli-new-policy-gr-2026

आरोग्य विभाग बदली धोरणात मोठा बदल! गट-क व गट-ड कर्मचाऱ्यांना आता विनंती बदलीसाठी नवीन तरतूद

August 11, 2026
arogya vibhag employee latest update

NHM कर्मचारी समायोजन, रिक्त पदभरती आणि पदोन्नतीला गती देण्याचे मंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश

August 8, 2026
public-health-department-state-training-policy-maharashtra-2026

महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागासाठी नवीन राज्य प्रशिक्षण धोरण; सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण बंधनकारक

August 8, 2026

Leave a Comment