Maharashtra Class1 New Timetable महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने आज एक महत्त्वाचे परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकानुसार, राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० आणि महाराष्ट्र राज्यासाठी तयार करण्यात आलेल्या पायाभूत शिक्षण अभ्यासक्रम २०२४ नुसार, सन २०२५-२६ पासून इयत्ता पहिलीसाठी नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या बदलामुळे इयत्ता पहिली व दुसरीसाठी विषययोजना, शालेय कामकाजाचे दिवस, विषयनिहाय तासिका विभागणी आणि शालेय वेळापत्रकात महत्त्वाचे बदल होणार आहेत.
Maharashtra Class1 New Timetable
मुख्य बदल आणि ठळक वैशिष्ट्ये:
नवीन अभ्यासक्रम २०२५-२६ पासून: नवीन अभ्यासक्रम सन २०२५-२६ पासून टप्प्याटप्प्याने लागू करण्यात येणार असून, सुरुवातीला इयत्ता पहिलीसाठी याची अंमलबजावणी होईल. इयत्ता दुसरीसाठी नवीन पाठ्यपुस्तके लागू झाल्यावर हे निर्देश बंधनकारक असतील.
सुधारित विषययोजना (इयत्ता पहिली व दुसरी) Maharashtra Class1 New Timetable
- मराठी माध्यमाच्या शाळा: मराठी (स्तर-१), इंग्रजी (स्तर-२), हिंदी अथवा इतर भारतीय भाषा, गणित, कलाशिक्षण, आरोग्य व शारीरिक शिक्षण, कार्यशिक्षण.
- इंग्रजी माध्यमाच्या शाळा: इंग्रजी (स्तर-१), मराठी (स्तर-२), हिंदी अथवा इतर भारतीय भाषा, गणित, कलाशिक्षण, आरोग्य व शारीरिक शिक्षण, कार्यशिक्षण.
- अन्य माध्यमाच्या शाळा: माध्यम भाषा (स्तर-१), इंग्रजी (स्तर-२), मराठी (अन्य माध्यमांसाठी), गणित, कलाशिक्षण, आरोग्य व शारीरिक शिक्षण, कार्यशिक्षण.
- कार्यशिक्षण: ‘कार्यानुभव’ हा विषय यापुढे ‘कार्यशिक्षण’ या नावाने ओळखला जाईल.
- बनी (स्काऊट/गाईड): हा उपक्रम शाळांसाठी ऐच्छिक राहील.
तासिका विभागणी आणि कालावधी
- शाळेतील अध्ययन-अध्यापन कृतींसाठी २१० दिवस (३५ आठवडे) निश्चित करण्यात आले आहेत.
- राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा (पायाभूत स्तर) २०२२ नुसार वार्षिक ९९० तास अध्ययन होणे आवश्यक आहे. नवीन अभ्यासक्रमानुसार एकूण वार्षिक अध्यापनाचे तास ९८० निश्चित करण्यात आले आहेत.
- दैनंदिन परिपाठ, मधल्या सुट्ट्या आणि अतिरिक्त समृद्धीकरण तासिका (AEP) यांचा समावेश एकूण अध्यापन कालावधीत नाही.
शालेय वेळापत्रक (नमुना)
- एकच सत्रात भरणाऱ्या शाळा आणि दोन सत्रात भरणाऱ्या शाळांसाठी स्वतंत्र नमुना वेळापत्रक देण्यात आले आहे.
- शाळांना वेळापत्रकातील विषय तासिकेच्या क्रमवारीमध्ये आणि शाळा सुरू करण्याच्या वेळेत बदल करण्याची मुभा असेल.
- मात्र, विषयनिहाय अध्ययन-अध्यापनाचा साप्ताहिक व वार्षिक घड्याळी तासांचा कालावधी कोणत्याही विषयासाठी कमी करता येणार नाही.
- काही ठिकाणी २ तासिका जोडून घेतल्या आहेत, ज्यात तोडी-लेखी-प्रात्यक्षिक-सराव असे वैविध्यपूर्ण अध्यापन अपेक्षित आहे.
अतिरिक्त समृद्धीकरण तासिका (AEP)
- या तासिका विद्यार्थ्यांना कोणत्याही अभ्यास विषयात सक्षम करण्यासाठी अतिरिक्त मार्गदर्शनासाठी आहेत.
- यामध्ये उपचारात्मक अध्यापन, स्पर्धा परीक्षा तयारी, सराव इत्यादी उपक्रम घेता येतील.
- दोन सत्रांच्या शाळांमध्ये AEP साठी वेळ देता आला नसल्यास, शाळांनी शालेय वेळेव्यतिरिक्त किंवा विद्यार्थी विभागणी करून त्या पूर्ण कराव्यात. AEP चा समावेश नियमित वार्षिक अध्यापन कालावधीमध्ये केलेला नाही.
आनंददायी शनिवार
- एकच सत्रात भरणाऱ्या शाळांना शनिवारच्या दिवशी आणि दोन सत्रात भरणाऱ्या शाळांना शालेय वेळेव्यतिरिक्त ‘आनंददायी शनिवार’ मधील उपक्रम घेता येतील.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल अशोक रेखावार यांनी या संदर्भात स्वाक्षरी केली असून, शिक्षण संचालक (प्राथमिक व माध्यमिक व उच्च माध्यमिक) यांना माहितीस्तव प्रत पाठवण्यात आली आहे. या निर्णयामुळे राज्यातील प्राथमिक शिक्षणात महत्त्वाचे बदल घडून येतील अशी अपेक्षा आहे.
अधिक माहितीसाठी: परिपत्रक डाउनलोड करा



