अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या प्रोत्साहन भत्त्याचे सुधारित निकष जाहीर

Published On: January 15, 2026
Follow Us
Anganwadi Sevika Madatnis New Protsahan Bhatta Nikash

Anganwadi Sevika Madatnis New Protsahan Bhatta Nikash महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाने एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या प्रोत्साहन भत्त्याच्या निकषांमध्ये सुधारणा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. २४ जून २०२५ रोजी निर्गमित झालेल्या शासन निर्णयानुसार, या सुधारित निकषांमुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना अधिक चांगल्या प्रकारे प्रोत्साहन भत्ता मिळू शकणार आहे.

Anganwadi Sevika Madatnis New Protsahan Bhatta Nikash

पार्श्वभूमी: एकात्मिक बाल विकास सेवा योजनेची प्रभावी अंमलबजावणी करून बालकांमधील कुपोषण कमी करणे आणि पूर्व शालेय शिक्षणाचा दर्जा सुधारणे यासाठी पात्र अंगणवाडी सेविकांना प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णय यापूर्वीच ४ ऑक्टोबर २०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये घेण्यात आला होता. मात्र, पोषण ट्रॅकर ऍप्लिकेशनमध्ये निकषांनुसार गुणांकन करणे शक्य होत नसल्याने, प्रोत्साहन भत्त्याच्या निकषांमध्ये सुधारणा करणे आवश्यक होते.

यावर विचार करण्यासाठी महिला व बाल विकास मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आली होती. या समितीच्या २८ मे २०२५ रोजीच्या बैठकीत झालेल्या विचारविनिमयानंतर, नवी मुंबई येथील एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयाने सादर केलेल्या प्रस्तावानुसार हे बदल करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

नवीन प्रोत्साहन भत्ता निकष

नवीन प्रोत्साहन भत्ता निकष: आतापर्यंतचे निकष अधिक्रमित करून, अंगणवाडी केंद्रांसाठी खालीलप्रमाणे नवीन निकष निश्चित करण्यात आले आहेत: (Anganwadi Sevika Madatnis New Protsahan Bhatta Nikash)

  • समुदाय आधारित कार्यक्रम (CBE): दरमहा किमान दोन समुदाय आधारित कार्यक्रम घेणे आणि त्यांची पोषण ट्रॅकरवर नोंद करणे.
  • घरपोच आहार (THR): दरमहा नोंदणी झालेल्या एकूण लाभार्थी संख्येच्या ९०% लाभार्थ्यांना २५ दिवस THR चे वाटप.
  • ३ ते ६ वर्षे वयोगटातील बालकांचे पूर्व शालेय शिक्षण: नोंदणी झालेल्या एकूण बालकांच्या ८०% बालकांची किमान १६ दिवस उपस्थिती.
  • गरम ताजा आहार (HCM): ३ ते ६ वर्षे वयोगटातील नोंदणी झालेल्या एकूण बालकांना दरमहा २१ दिवस आहाराचे वाटप.
  • VHSND (आहार आरोग्य दिवस): दरमहा एका VHSND कार्यक्रमाचे आयोजन करणे आणि त्याची पोषण ट्रॅकरवर नोंद घेणे.
  • SAM (अतितीव्र कुपोषित) व MAM (मध्यम कुपोषित): अंगणवाडीमधील SAM व MAM बालकांचे प्रमाण मागील महिन्याच्या तुलनेत कमी झालेले असणे.
  • SUW (अतितीव्र कमी वजन) व MUW (मध्यम कमी वजन): SUW व MUW असलेल्या बालकांचे प्रमाण बीटच्या सरासरीपेक्षा कमी असणे.
  • HCM (गरम ताजा आहार) व THR (घरपोच आहार) साठा नोंदी: पोषण ट्रॅकरवरील दरमहा अहवाल.
  • स्थूल/लठ्ठ बालके यांचे प्रमाण प्रकल्पाच्या सरासरीपेक्षा कमी करणे: स्थूल / लठ्ठ बालके यांचे प्रमाण प्रकल्पाच्या सरासरीपेक्षा कमी असणे.
  • खुजी बालके यांचे प्रमाण प्रकल्पाच्या सरासरीपेक्षा कमी करणे: खुजी बालके यांचे प्रमाण प्रकल्पाच्या सरासरीपेक्षा कमी असणे.

पोषण ट्रॅकर ऍप्लिकेशनवर उपलब्ध माहितीनुसार अंगणवाडी केंद्रांचे प्रतिमाह मूल्यांकन केले जाईल.

प्रोत्साहन भत्त्याची रक्कम: उपरोक्त १० निकषांपैकी किमान ७ निकष पूर्ण करणाऱ्या अंगणवाडी केंद्रातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना खालीलप्रमाणे प्रतिमाह प्रोत्साहन भत्ता दिला जाईल:

किमान पात्र निकष संख्याअंगणवाडी सेविकांना अनुज्ञेय प्रोत्साहन भत्ताअंगणवाडी मदतनीसांना अनुज्ञेय प्रोत्साहन भत्ता
रु. १४००रु. ७००
रु. १६००रु. ८००
रु. १८००रु. ९००
१०रु. २०००रु. १०००

अंमलबजावणी आणि आर्थिक तरतूद: सुधारित निकषांनुसार, १ ऑक्टोबर २०२४ पासून प्रोत्साहन भत्ता देण्याची कार्यवाही एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्तांनी करावी असे निर्देश देण्यात आले आहेत.

या निर्णयामुळे येणारा अतिरिक्त खर्च राज्य शासनाकडून भागविण्यात येणार आहे. यासाठी मागणी क्र. एक्स-१, २२३६-पोषण आहार ०२-पोषक अन्न व पेये यांचे वितरण, १०१-विशेष पोषण आहार कार्यक्रम, (०८) (०५) अंगणवाडी सेवा, अतिरिक्त राज्य हिस्सा १००% (२२३६ १९४५) ०२-मजुरी या लेखाशीर्षाखालील तरतुदीमधून निधी उपलब्ध केला जाणार आहे.

अधिक माहितीसाठी : नवीन प्रोत्साहन भत्ता निकष शासन निर्णय

अंगणवाडी सेविकांसाठी महत्त्वाची अपडेट! ‘पोषण ट्रॅकर’मध्ये झाला मोठा बदल; आता ‘या’ कारणामुळे काम होणार सोपं?

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Posts

aasha gatparvartak meeting 2026

राज्यातील आशा गटप्रवर्तकांच्या विविध प्रश्नांबाबत बैठक संपन्न; बैठकीतील ठळक मुद्दे

August 12, 2026
anganwadi sevika salary july 2026

अंगणवाडी सेविका व मदतनीस जुलै 2026 चे मानधन व प्रोत्साहन भत्ता मंजूर, शासन निर्णय जारी

July 28, 2026
aarogya vibhag aadhava

आशा स्वयंसेविकांच्या कार्याचे विशेष कौतुक; आरोग्य विभागाची विभागीय आढावा बैठक संपन्न

July 25, 2026
asha-workers-online-data-entry-clarification

आशा स्वयंसेविका व इतर आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या ऑनलाईन कामाबाबत विधानसभेत महत्वाचे स्पष्टीकरण

July 8, 2026
anganwadi-sevika-promotion-age-limit-gr

अंगणवाडी सेविकांसाठी मोठा निर्णय! मुख्यसेविका पदोन्नतीसाठी वयोमर्यादेत बदल; नवीन शासन निर्णय जारी

July 3, 2026
panvel-viral-video-truth-anganwadi-sevika

त्या व्हायरल व्हिडिओ मधील अंगणवाडी सेविकांबाबत महिला व बालविकास विभागाचा मोठा खुलासा

June 27, 2026

Leave a Comment