राज्यातील 20 हजार ग्रंथालय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी: ESIS योजना लागू होणार! ESIS Scheme

Published On: August 14, 2025
Follow Us
ESIS Scheme

ESIS Scheme राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या कर्मचाऱ्यांना राज्य कामगार विमा योजना (ESIS) लागू करण्यासाठी नोंदणीसंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी दिली.

मंत्रालयात यासंदर्भात दिनांक १३ ऑगस्ट रोजी आयोजित बैठकीला सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर, राज्य ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. पाटील म्हणाले, शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना ही योजना लागू झाल्यानंतर राज्यातील जवळपास २० हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना याचा थेट फायदा होईल. यासाठीचा सविस्तर प्रस्ताव संबंधित विभागाकडे पाठवून यामधील तांत्रिक बाबींची तपासणी राज्य कामगार विमा योजनेतील  ग्रंथालय कर्मचाऱ्यांना कसा लाभ मिळवता येईल  या संदर्भात निर्णय घेण्यात येईल.

तसेच, कोल्हापूर जिल्हा ग्रंथालयाला राजाराम महाविद्यालयात इमारतीसाठी जागा आणि निधी उपलब्ध करून देण्यासाठीही सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असेही मंत्री श्री. पाटील यांनी बैठकीत सांगितले.

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Posts

zp-teacher-promotion-gr-2026

जिल्हा परिषद शिक्षक पदोन्नतीसाठी नवीन कार्यपद्धती जाहीर; TET/CTET पात्रता, निश्चित वेळापत्रकासह शासनाचा मोठा निर्णय

July 31, 2026
saman-kam-saman-vetan-medical-officers-asha-workers-rules-update

वैद्यकीय अधिकाऱ्यांना ‘समान काम, समान वेतन’चा प्रस्ताव; आशा स्वयंसेविकांच्या नियमावलीतही होणार बदल

July 30, 2026
government-employees-headquarters-leave-rule-circular-july-2026

मुख्यालय सोडण्यापूर्वी शासकीय कर्मचाऱ्यांनी हे जाणून घ्या; सामान्य प्रशासन विभागाचे नवीन परिपत्रक जारी

July 30, 2026
BLO Duty Allowance GR

बीएलओ कर्मचारी अधिकारी यांचे मानधन मंजूर, शासन निर्णय जारी

July 29, 2026
anganwadi sevika salary july 2026

अंगणवाडी सेविका व मदतनीस जुलै 2026 चे मानधन व प्रोत्साहन भत्ता मंजूर, शासन निर्णय जारी

July 28, 2026
aarogya vibhag aadhava

आशा स्वयंसेविकांच्या कार्याचे विशेष कौतुक; आरोग्य विभागाची विभागीय आढावा बैठक संपन्न

July 25, 2026

Leave a Comment