अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यासाठी मोठी अपडेट! 2 महिन्यांचे मानधन मंजूर, Anganwadi Employees Salary Update

Published On: April 30, 2025
Follow Us
Anganwadi Employees Salary Update

Anganwadi Employees Salary Update राज्यातील अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांच्या मार्च आणि एप्रिल 2025 या महिन्याच्या मानधनासाठी निधी वितरित करण्यास शासन मान्यता दिली आहे. त्यामुळे आता या दोन्ही महिन्याचे मानधन अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना मिळणार आहे.

Anganwadi Employees Salary Update

आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, नवी मुंबई यांच्या अधिनस्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबविण्यात येते.

केंद्र शासनाकडून विहीत कालावधीत निधी प्राप्त होत नसल्यामुळे अंगणवाडी सेविकांचे मानधन नियमित अदा करणे शक्य व्हावे, याकरिता अपर मुख्य सचिव (वित्त) यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक २ जून, २०१७ रोजी आयोजित बैठकीत अंगणवाडी सेविकांच्या मानधनाची अर्थसंकल्पित केलेली रक्कम अपेक्षित केंद्रीय सहाय्य अप्राप्त असले तरी खर्च करण्यास विभागास अनुमती देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

हे ही वाचा: वय 3 ते 6 वयोगटातील मुलांसाठी खासगी प्री-स्कूल नोंदणी बंधनकारक

केंद्र शासनाकडून वेळेवर निधी मिळत नसल्यामुळे अंगणवाडी सेविकांना नियमित मानधन देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना त्यांचे मानधन वेळेवर मिळण्यास मदत होईल.

दिनांक २८ एप्रिल २०२५ रोजीच्या शासन निर्णयानुसार एप्रिल २०२५ महिन्याच्या मानधनासाठी २१८ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मान्यता दिली आहे. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत हा निधी आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, नवी मुंबई यांना देण्यात आला आहे.

आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, नवी मुंबई यांनी वरीलप्रमाणे उपलब्ध करून देण्यात आलेला निधी विहित पध्दतीने खर्च करण्याची कार्यवाही करावी. तसेच केंद्र हिश्याचा निधी प्राप्त करून घेण्याच्या अनुषंगाने केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावा. असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

तसेच यापूर्वी दिनांक २२ एप्रिल २०२५ रोजी मार्च महिन्याच्या मानधनासाठी निधी वितरित करण्यात आला आहे. त्यामुळे आता या दोन्ही महिन्याचे मानधन (Anganwadi Employees Salary) मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस मानधन शासन निर्णय

दिनांक २२ एप्रिल २०२५ रोजीचा मार्च महिन्याचे मानधन शासन निर्णय येथे डाउनलोड करा

दिनांक २८ एप्रिल २०२५ रोजीचा एप्रिल महिन्याचे मानधन शासन निर्णय येथे डाउनलोड करा

शासन निर्णय

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment