सरकारी डॉक्टरांना खाजगी प्रॅक्टिस करता येणार नाही; मा उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

Published On: August 2, 2026
Follow Us
government-doctors-private-practice-ban

सार्वजनिक आरोग्य विभागातील शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांना खाजगी वैद्यकीय व्यवसाय (Private Practice) करण्यास परवानगी देता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय मा. उच्च न्यायालय, खंडपीठ छत्रपती संभाजीनगर यांनी ३० जुलै २०२६ रोजी दिला आहे. या विषयासंदर्भातील दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या सर्व याचिकाही न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत.

न्यायालयाने आपल्या निर्णयात स्पष्ट केले की, शासन सेवेत कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी हे महाराष्ट्र नागरी सेवा नियम तसेच शासनाच्या धोरणांनुसार पूर्णवेळ शासकीय सेवा बजावण्यासाठी बांधील आहेत. त्यामुळे शासकीय सेवेत असताना त्यांना खाजगी वैद्यकीय व्यवसाय करण्याची परवानगी देता येणार नाही.

या निर्णयामुळे राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला बळकटी मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. विशेषतः ग्रामीण आणि शहरी भागातील शासकीय रुग्णालयांमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती वाढून रुग्णसेवा अधिक प्रभावी होण्यास मदत होईल, असे मानले जात आहे.

या प्रकरणात शासनाच्या वतीने सहायक शासकीय अभियोक्ता अतुल काळे यांनी प्रभावीपणे बाजू मांडली. तसेच, आरोग्य विभागाचे विधी सल्लागार ॲड. सतीश भेंडेकर यांनी कायदेशीर मुद्द्यांची मांडणी, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता आणि समन्वय साधून शासनाच्या बाजूला सहकार्य केले.

कायदेतज्ज्ञ आणि आरोग्य क्षेत्रातील जाणकारांच्या मते, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या बळकटीकरणाच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. शासकीय सेवेतील शिस्त, उत्तरदायित्व आणि रुग्णहिताला प्राधान्य देणारा हा ऐतिहासिक निर्णय असल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे.

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Posts

arogya vibhag employee latest update

NHM कर्मचारी समायोजन, रिक्त पदभरती आणि पदोन्नतीला गती देण्याचे मंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश

August 8, 2026
public-health-department-state-training-policy-maharashtra-2026

महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागासाठी नवीन राज्य प्रशिक्षण धोरण; सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण बंधनकारक

August 8, 2026
ERO AERO Annual Honorarium

मतदार नोंदणी अधिकारी कर्मचाऱ्यांना वार्षिक मानधन देण्यास मंजूरी, शासन निर्णय जारी

August 7, 2026
nps-ups-pran-contribution-gr-2026

NPS-UPS कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! PRAN खात्यात अंशदान वेळेत जमा करण्यासाठी राज्य सरकारची नवी यंत्रणा

August 5, 2026
nhm-contract-employees-salary-pay-scale-gr-2026

NHM कर्मचाऱ्यांना 7 व्या वेतन आयोगानुसार कोणती वेतनश्रेणी लागू होणार? चेक करा

August 4, 2026
samagra shiksha contractual employees Regularization gr

राज्य सरकारचा कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी दूसरा मोठा निर्णय! समग्र शिक्षा कर्मचाऱ्यांचे शासन सेवेत समायोजन करण्याबाबत शासन निर्णय जारी

August 4, 2026

Leave a Comment